Water Scarcity : एक किलोमीटरचा घाट रस्ता चढून आणावे लागते पाणी; खैरखेडा येथे पाणीटंचाईचे भीषण चित्र

Washim News : गतवर्षी पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईच्या झळा राज्यात जाणवत आहेत. तलाव, धरणात असलेला पाणीसाठा देखील बाष्पीभवनामुळे कमी झाल्याचे दिसत आहे.
Water Scarcity
Water ScarcitySaam tv

मनोज जयस्वाल 

वाशीम : यंदा पाणी टंचाईचे भीषण चित्र राज्यात पाहण्यास मिळत आहे. हेच चित्र वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खैरखेडा या आदिवासी आणि बंजाराबहुल गावात दरवर्षीच पाहण्यास मिळते. उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईचा सामना या भागात करावा लागत असतो. ते चित्र यंदाही कायम असून घाट रस्ता चढून एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणून तहान भागविली जात आहे. 

Water Scarcity
Ahmednagar Crime : चैन स्नॅचिंग करणारी टोळी ताब्यात; २० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

गतवर्षी पाऊस (Rain) कमी झाल्याने पाणी टंचाईच्या झळा राज्यात जाणवत आहेत. तलाव, धरणात असलेला पाणीसाठा देखील बाष्पीभवनामुळे कमी झाल्याचे दिसत आहे. यामुळे आता राज्यातील सर्वच भागात पाणी टंचाईची (Water Scarcity) समस्या निर्माण झाली आहे. डोंगर परिसरात असलेल्या वस्त्या, वाडा या भागात तर भर उन्हात पायपीट करत डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. हे चित्र खैरखेड्याच्या परिसरात पाहण्यास मिळत आहे. 

Water Scarcity
Jalgaon Crime News : जळगाव जिल्हा हादरला; जुन्या वादातून तरुणाचा खून, रात्रीची घटना

दरवर्षी होतो योजनांवर खर्च 

खैरखेड्याचा बहुतांश भूभाग डोंगरदऱ्या आणि कडाकपारींसह खडकाने व्यापलेला आहे. स्वातंत्र्यानंतरही या गावात रस्ते, पाणी, आरोग्यासह विजेची समस्या कायम असून पाणी अडवा पाणी जिरवा, जलयुक्त शिवार, पेयजल यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनांवर शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो. मात्र खैरखेडा येथील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करणे प्रशासनाला शक्य झाले नसल्याचे वास्तव यंदाही कायम आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com