Cancer Cell  Saam Tv
लाईफस्टाईल

Cancer Cell : हिवाळ्यात खा 'हे' पदार्थ कर्करोगाच्या पेशी वाढण्याआधीच दूर होतील

कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचं नाव सगळ्यांनी ऐकताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणाव निर्माण होतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Cancer Cell : कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचं नाव सगळ्यांनी ऐकताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणाव निर्माण होतो. या आजाराचे कारण कळू शकत नाही, परंतु असे काही पदार्थ आहेत जे त्याच्या पेशी तयार होण्यापासून रोखू शकतात. जाणून घ्या हे कोणते पदार्थ.

टोमॅटोसह अनेक पदार्थ असे आहेत, ज्यात कर्करोगाच्या पेशी वाढण्यापूर्वीच काढून टाकण्याची क्षमता असते. खरं तर, या पदार्थांमध्ये (Food) फायटोन्यूट्रिएंट्स असतात, ज्यामुळे कर्करोगाचा (Cancer) धोका कमी होऊ शकतो. जाणून घ्या या पदार्थांविषयी.

टोमॅटो -

हे सुपरफूडपेक्षा कमी नाही आणि त्याचे सेवन केल्याने कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. एनसीबीआयमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, जर असे पदार्थ नियमित खाल्ले तर केवळ कॅन्सरच नाही तर अनेक आजारांचा धोका कमी होऊ शकतो.

हळद -

घरी सहज उपलब्ध होणारी हळदही कॅन्सरपासून आपला बचाव करू शकते. कॅन्सरला एका गोष्टीने दूर करता येत नाही हे खरे, पण हळदीसारख्या इतर पदार्थांची दिनचर्या पाळली तर फरक नक्कीच दिसू शकतो.

बीन्स -

फायबरचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ कोलोरेक्टल कर्करोगापासून आपले संरक्षण करू शकतात. संशोधनानुसार, बीन्समध्ये फिनोलिक अॅसिड आणि अँथोसायनिन्स असतात, जे आपल्याला कर्करोगापासून वाचवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

लसूण -

आरोग्यासाठी खजिन्यापेक्षा कमी नाही. लसूण शरीरात कर्करोगाच्या पेशी तयार होण्यास प्रतिबंधित करते आणि ते मॅक्रोफेज वाढवते, जे पेशी काढून टाकण्याचे कार्य करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Spray For Hair Growth: दुप्पट वेगाने वाढतील केस, हा घरगुती हेअर स्पे एकदा नक्की वापरुन पाहा

Dussehra 2025: दसऱ्याला सोनं चांदी का खरेदी केलं जातं?

Maharashtra Live News Update: मुरुडजवळ एसटी बसची पिकअप टेम्पोला धडक

नवरात्रौत्सवाला गाळबोट, दांडिया खेळताना महिलेचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

Bride Skin Care: प्रत्येक नव्या नवरीच्या स्किनकेअर किटमध्ये असायलाच हव्यात या ७ आवश्यक वस्तू

SCROLL FOR NEXT