Women Health SAAM TV
लाईफस्टाईल

Women Health : महिलांनो 'हे' पदार्थ खाऊन झपाट्याने वाढवा हिमोग्लोबिनची पातळी, ॲनिमिया राहील कोसो दूर अन् नैसर्गिकरित्या होईल रक्त शुद्ध

Shreya Maskar

घर आणि नोकरी सांभाळताना बऱ्याच महिलांचे आपल्या आरोग्याकडे दुलर्क्ष होते. परिणामी त्यांना शरीराच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ॲनिमिया ही महिलांमध्ये आढळणारी कॉमन समस्या आहे. शरीरात रक्ताची कमतरता निमार्ण झाल्यास अ‍ॅनिमिया होतो.

शरीरात लोहाची कमतरता कमी झाल्यामुळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होते. तसेच लाल रक्तपेशींच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. पेशींना ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे मेंदूवर परिणाम होतो. या पदार्थांच्या सेवनामुळे नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध होईल.

तुळशीच्या बिया

तुळशीच्या बिया शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास मदत करतात. एका बाऊलमध्ये हलीम, तुळशीच्या बिया आणि नारळ पाणी घालून मिक्स करून घ्यावे. हे पाणी नियमित प्यावे. यामुळे शरीरातील रक्त शुद्ध होते. हे तिन्ही पदार्थ शरीरातील लोहाची पातळी वाढवते. हे पाणी हिमोग्लोबिनची पातळी वाढवून अ‍ॅनिमियापासून आपले संरक्षण करते.

बीटरूट

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बीटरूट रामबाण उपाय आहे. महिलांनी नियमित सकाळी एक बीटरूट खावे किंवा त्याचा ज्यूज प्यावा. यामुळे रक्त शुद्ध होते. तसेच शरीरातील थकवा त्वरित दूर होऊन आपल्याला ऊर्जा मिळते. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन बी-१२ मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे महिलांची हाडे आणि स्नायू मजबूत राहण्यास मदत करतात. शरीरातीललाल रक्तपेशींची संख्या वाढते. तसेच छातीत जळजळ होत असल्यास आराम मिळतो.

डाळिंब

सर्वांना आवडणारे डाळिंब आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. महिलांनी आपल्या आहारात डाळिंबाचा समावेश आवर्जून करावा. डाळिंब प्रथिने, कार्बोहाइड्रेट, फायबर आणि लोह यांचे समृद्ध स्रोत आहे. रोज सकाळी एका डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढते. लक्षात ठेवा की, यात कोणत्याही प्रकारची साखर घालू नये.

खजूर

खजूर शरीराला त्वरित ऊर्जा देऊन अशक्तपणा दूर करते. रोज किमान दोन तरी खजूर खावे. यामुळे हिमोग्लोबिनची पातळी वाढते. मात्र ज्या स्त्रियांना मधुमेहाची समस्या आहे. त्यांनी खजूरचे सेवन टाळावे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT