Dental Health : पिवळ्या दातांमुळे मनमोकळं हसता येत नाही? फळांची साल करेल जादू, होतील पांढरेशुभ्र, मजबूत दात

Teeth Whitening Tips : वेगवेगळ्या प्रकारच्या टूथपेस्ट वापरूनही दातांना चमक येत नसेल किंवा दातांचा पिवळेपणा जात नसेल. तर, फळांच्या साली मिनिटांत तुम्हाला पांढरेशुभ्र, मजबूत दात देतील. तुम्ही मनमोकळं हसू लागाल.
Teeth Whitening Tips
Dental HealthSAAM TV
Published On

आपले चांगले व्यक्तिमत्व दिसावे यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. त्यात कपड्यांच्या स्टाईल पासून ते मेकअप पर्यंत सर्व गोष्टी येतात. तसेच आपण कसे बोलतो, कसे वागतो आणि कसे हसतो. यावरही लोकांचे लक्ष असते. चारचौघात बोलताना, वावरताना काही गोष्टींची विशेष काळजी घेतली जाते. त्यात विशेषताः हसताना. कारण सुंदर हास्य लोकांना तुमच्याकडे आकर्षित करते. पण त्यात तुमचे दात पिवळे असतील तर चारचौघात तुम्हाला लाज वाटते. त्यामुळे चारचौघातही मनमोकळं हसण्यासाठी दातांचा पिवळेपणा घालवणे गरजेचे असते.

आपण दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक टूथपेस्टचा वापर करतो. पण त्यातून दातांचा पिवळेपणा दूर न होता, उलट आरोग्याचा धोका वाढतो. कारण यात केमिकल्सचे प्रमाण जास्त असते. जे दातांना हानी पोहोचवू शकते. त्यामुळे घरगुती उपाय बेस्ट ठरतात.

लिंबाची साल

लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असते. जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असतात जे दातांचा पिवळेपणा दूर करण्यास मदत करतात. लिंबाच्या साल दातांचे आरोग्य चांगले करते. दातांवर लिंबाची साल चोळून दात कोमट पाण्याने धुवून घ्या. असे काही दिवस नियमित केल्यास तुम्हाला फरक दिसेल. लिंबाची सालं सुकवून त्याची पूड करा आणि दातांना चोळा. यांमुळे दातांचा पिवळेपणा दूर होण्यास आपल्याला मदत होते.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रस एकत्रित करून त्यांची पेस्ट बनवा. या पेस्टने दात स्वच्छ करा. यामुळे दातांचा पिवळेपणा दूर होऊन दात मजबूत होतील. काही दिवसात दातांच्या रंगात फरक दिसेल.

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरी हे फळ दातांवरील पिवळेपणा काढण्यासाठी महत्त्वाचे आहे. स्ट्रॉबेरीचे दोन तुकडे करून त्याचा एक भाग दातांवर चोळा. यामुळे दात नैसर्गिकरित्या पांढरे होतील. कारण स्ट्रॉबेरीमधील अँटीऑक्सिडंट्स दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.

Teeth Whitening Tips
Rising Early Morning : पहाटे लवकर उठण्याचा कंटाळा येतो? मग 'या' टिप्सने चुटकीसरशी जाग येईल

केळीची साल

केळीची साल अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरते. केळ्याच्या सालीमध्ये पोटॅशिअम , मॅग्नेशिअम हे घटक दातांचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतात. केळीची सालीमध्ये ब्लीचिंग एजंट असल्यामुळे आपल्या दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची साल उपयोगी पडते. ताजी केळीची सालं केळ खाल्ल्यावर टाकून न देता दातांवर चोळा.

नारळ तेल

दात स्वच्छ करण्यासाठी नारळ तेल रामबाण उपाय आहे. कारण नारळ तेल सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असते. फक्त पाच मिनिटांसाठी पिवळ्या दातांवर नारळाचे तेल लावा. त्यानंतर टूथपेस्टने ब्रश करून कोमट पाण्याने तोंड धुवा. कोमट पाण्याने तोंड धुतल्यास तोंडातील जंतू निघून जातील. असे जर तुम्ही नियमित केलात तर दातांवरील पिवळेपणा लवकर कमी होईल.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Teeth Whitening Tips
Weight Loss : जास्त नाही तर कमी खाल्ल्याने वाढते वजन, वाचा वेट लॉस करण्याचे सिक्रेट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com