ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आजकाल अॅनिमियाची समस्या भारतीय लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते.
शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते.
शरीरात लोहची मात्रा कमी झाल्यास तुम्हाला अॅनिमिया होऊ शकते.
शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे, तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे नखे तुटणे, केस गळणे आणि त्वचेला खाज सुटणे या सारख्या समस्या होऊ शकतात.
अनेकदा थंड हात पाय हे देखील तुमच्यात रक्ताची कमतरता असल्याचे लक्षण असते.
त्वचा पिवळी पडणे हे देखील तुम्हाला अॅनिमियाने ग्रस्त असल्याचे लक्षण असू शकते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.