हिवाळ्यात आपली त्वचा खूप कोरडी होते. त्यात तुमची त्वचा तेलकट असो एकदम मऊ ती कोरडी पडतेच. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. कोरडी त्वचा असणाऱ्या लोकांना अनेकदा सनबर्नची समस्या असते. तसेच त्वचा लवकर फाटते आणि प्रचंड वेदना होतात. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. याचेच आम्ही काही सोपे उपाय सांगणार आहोत.
तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखा
थंडीत आपली स्कीन खूप ड्राय होते, त्यामुळे स्कीन ला अनेक इन्फेक्शन होऊ शकतात. त्यावर वेळीच उपचार करणं आवश्यक आहे. मात्र त्याआधी तुम्ही तुमचा स्कीन टाईप ओळखणे महत्वाचे आहे. तो ओळखायला एकदम सोपा आहे. ड्राय स्कीन, ऑयली स्कीन आणि मिक्स स्कीन टाईप असे तीन प्रकारचे स्कीन टाईप असतात. हिवाळ्यात शक्यतो ड्राय स्कीन असलेल्या व्यक्तींना जास्त त्रास होतो. त्यांची ड्राय स्कीन अजून जास्त ड्राय पडते किंवा कोरडी पडते.
ड्राय स्कीन असलेल्या व्यक्तींसाठी रामबाण उपाय
ड्राय स्कीन असलेल्या व्यक्तींनी थंडीत माइल्ड क्लींजिंग लोशनचा वापर केला पाहिजे. त्यात शक्यतो ग्लिसरीन नसेल याची तुम्ही खात्री करा आणि मगच ते विकत घ्या. तुम्ही जर हायल्यूरॉनिक एसिड आणि निआसिनामाइड असे दोन्ही घटक असलेले मॉइस्चराइजर तर तुमची कोरडी आणि डल त्वचा एकदम फ्रेश होते. चमकदार दिसते आणि कोरडेपणा नष्ट होतो.
कोरडी त्वचा असेल तर हे पदार्थ नक्की सेवन करा
तुमची त्वचा कोरडी असेल तर फक्त मॉइस्चराइजरचा वापर करू नका. त्यासाठी तुम्ही खाण्यापिण्याच्या सवयींकडे सुद्धा लक्ष द्या. भरपूर प्रमाणात पाण्याचे सेवन करत राहा. तसेच हिरव्या पालेभाज्या खाणं सुरू ठेवा.याने सुद्धा तुमची त्वचा ग्लोइंग होईल आणि तुम्ही कोरड्या त्वचेला विसराल. तसेच थंडीच्या काळात तुम्ही बाहेरचे थंड पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Written By : Sakshi Jadhav