
सध्याच्या तरुणी होम रेमिडीज फार कमी प्रमाणात करतात. पुर्वी याचं प्रमाण जास्त होतं. पुर्वी महिला हळद, कोरफड, घरगुती दही, अंड या पदार्थांचा वापर करून चेहऱ्याला सुंदर ठेवायचा प्रयत्न करायच्या. आता अनेक प्रोडक्ट्स आली आहेत त्यात तुम्हाला हे पदार्थ मिसळून मिळतात. त्यापैकी काही महिला किंवा तरूणी अजूनही होम रेमिडीज ट्राय करतात. त्यात त्या तांदळाचा वापर जास्त प्रमाणात करतात.
आजकाल त्वचेची काळजी घेणारी विविध महागडी उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. परंतू तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने उपचार घ्यायचे असतील तर तुम्ही स्वयंपाक घरातला एक पदार्थ वापरून हिवाळ्यात सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवू शकता. तो पदार्थ म्हणजे तांदूळ. तांदळाचे पाणी तुम्ही चेहऱ्याला नियमित लावत असाल तर तुमच्यासाठी ते फायदेशीर आहे. त्याने एकदम चमकदार त्वचा किंवा कोरिन मुलींसारखी त्वचा तुम्ही तयार करू शकता.
तांदळाचे पाणी का फायदेशीर आहे?
तांदूळ धुताना जे पाणी बाहेर पडतं त्याला राईस वॉटर म्हणतात. यामध्ये व्हिटॅमिन बी, ई, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे अनेक प्रकारचे पोषक असतात. हे सर्व घटक तुमची त्वचा निरोगी ठेवतात. तुमच्या त्वचेवर असलेला मळ काढतात आणि चमकदार गुळगुळीत त्वचा देतात. पुढे आपण तांदळाच्या पाण्याचा उपयोग आणि विविध फायदे सांगणार आहोत.
दिवसातून दोनदा तांदळाच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे
त्वचेला ग्लो मिळतो
तांदळाच्या पाण्यात असलेले स्टार्च तुमच्या त्वचेला पोषक बनवते. शिवाय तुमची त्वचा चमकदार करते.
त्वचेवरील मुरूमे कमी होतात
तांदळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. त्यामुळे चेहऱ्यावरचे मुरूम आणि जळजळ कमी होतात.
चेहऱ्यावरील छिद्र कमी करण्यास फायदेशीर
तांदळाच्या पाण्याचा नियमित वापर केल्याने चेहऱ्यावरचे छिद्र कमी होतात आणि त्वचा घट्ट होते.
त्वचेचा टोन सुधारतो
तुम्ही तांदळाचे पाणी चेहऱ्याला नियमित लावत असाल तर तुमचा रंग उजळतो आणि चेहऱ्यावरचे डाग कमी होतात.
वृद्धत्वाची चिन्हे कमी करते
तांदळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुशे मुक्त रॅडिकल्सशी लढण्यासाठी ते फायदेशीर असते. त्याने सुरकुत्या कमी कमी होतात.
तांदळाचे पाणी कसे वापरावे?
फेशियल क्लिन्जर
तुम्ही तांदळाचे पाणी एका कापसावर घेऊन चेहरा क्लिन करा.
टोनर
तुम्ही तांदळाचे पाणी टोनर म्हणून एका स्प्रे बाटलीत ठेवून वापरू शकता.
फेस मास्क
तुम्ही तांदळाचे पाणी सुती कापडात भिजवून चेहऱ्यावर लावून ठेवू शकता.
बर्फाचे तुकडे
तुम्ही तांदळाचे पाणी बर्फाच्या ट्रे मध्ये ठेवू शकता. त्याचा वापर दिवसातून किमान दोनदा करू शकता.
Written By : Sakshi Jadhav
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.