Tamannaah Bhatia Birthday : सौंदर्याची खान तमन्ना भाटियाच्या ग्लोइंग त्वचेचे रहस्य काय? व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिल्या टिप्स

Tamannaah Bhatia Beauty Secret : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तमन्नाचा जगभरात मोठा चाहता वर्ग आहे. वयाच्या ३५व्या वर्षी तमन्ना एवढी ब्युटिफूल कशी जाणून घ्या.
Tamannaah Bhatia Beauty Secret
Tamannaah Bhatia BirthdaySAAM TV
Published On

बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) नेहमी तिच्या लूकसाठी चर्चेत राहिली आहे. आज तमन्ना ३५ वर्षांची झाली आहे. वयाच्या ३५व्या वर्षी तमन्ना एवढी सुंदर कशी दिसते? हा प्रश्न कायमच चाहत्यांना पडतो. चला तर आज आपण तमन्ना भाटियाच्या सौंदर्याचे सीक्रेट जाणून घेऊयात. तमन्नाने एका व्हिडीओमध्ये आपल्या ग्लोइंग त्वचेचे रहस्य सांगितले आहे.

तमन्ना भाटिया स्कीन केअर प्रोडक्ट सोबतच घरातील घरगुती उपायही फॉलो करते. ज्यामुळे तिची त्वचा एवढी हाटड्रेट आहे. तमन्नाने व्हिडीओत सांगितले की, "दिवसातून अधिक काळ आपण चेहऱ्याला मेकअप लावून असतो. मेकअपमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असते. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक पोषण देणे महत्त्वाचे ठरते. अशावेळी मी आईने सांगितलेला घरगुती स्क्रब वापरते. "

घरगुती स्क्रब साहित्य

घरगुती स्क्रब कृती

घरगुती स्क्रब बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये चंदन, मध आणि कॉफी घालून मिश्रण एकजीव करून घ्या आणि तयार झालेला फेसपॅक चेहऱ्याला लावा.चंदनाच्या स्क्रबमुळे कोरडी त्वचा हायड्रेट होते. कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी यात मधाचे प्रमाण वाढवावे. हे स्क्रब 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवून त्यानंतर चेहरा स्वच्छ करावा. या फेसपॅकमुळे चेहरा हायड्रेट आणि मॉइश्चरायझ होतो.

तमन्ना भाटियाचे सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इंस्टाग्रामवर 27.8 मिलियन फॉलोवर्स आहेत. तमन्ना भाटिया सिंधी कुटुंबातील आहे. तिचे 'स्त्री-2' चित्रपटातील 'आज की रात' हे गाणे खूप गाजले आहे. तमन्ना भाटिया अभिनेता विजय वर्माला डेट करत आहे. तमन्नाने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. ती तेलगू, तमिळ आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तमन्ना भाटियाची संपत्ती 115 कोटींच्या वर आहे. तसेच तिच्याकडे आलिशान कार देखील आहेत.

Tamannaah Bhatia Beauty Secret
Govinda Birthday : 'हिरो नंबर १' किती कोटींचे मालक? आकडा ऐकून डोळे फिरतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com