Govinda Birthday : 'हिरो नंबर १' किती कोटींचे मालक? आकडा ऐकून डोळे फिरतील

Govinda Net Worth : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या गोविंदा यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांची एकूण मालमत्ता जाणून घेऊयात. गोविंदा यांचे जगभरात चाहते आहेत.
Govinda Net Worth
Govinda BirthdaySAAM TV
Published On

80 आणि 90च्या दशकातले सुपरहिरो गोविंदा (Govinda) हे आज 61 वर्षांचे झाले आहेत. गोविंदा हे आपल्या टायमिंग आणि विनोदी शैलीसाठी ओळखले जातात. गोविंदा यांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. आजवर गोविंदा यांनी अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. गोविंदा हे अभिनयासोबतच त्यांच्या डान्ससाठी देखील ओखळले जातात. लग्जरी कार

गोविंदा मालमत्ता

मीडिया रिपोर्टनुसार, गोविंदा यांची संपत्ती (Govinda Net Worth) 150 कोटींहून अधिक आहे. जगभरात गोविंदा हे 'हिरो नंबर 1' या नावाने ओळखला जातो. गोविंदा यांच्याकडे अनेक आलिशान कार आहेत. तसेच बंगले देखील आहेत. अभिनयासोबतच गोविंदा हे ब्रँड आणि रिअल इस्टेटमधून पैसा कमावतात. गोविंदा हे ब्रँडमधून अंदाजे 2 कोटी रुपये कमावतात. त्याच्याकडे मित्सुबिशी लान्सर, फोर्ड एंडेव्हर या लग्जरी कार आहेत. ते एक ग्जरी लाइफस्टाइल जगत आहेत.

गोविंदा यांचा मंबईत मड आयलंडमध्ये आलिशान बंगला आहे. तसेच त्यांचा अमेरिका आणि कोलकाता येथे देखील बंगला आहे. गोविंदा राहत असलेल्या बंगल्याचे नाव जल दर्शन आहे. तसेच गोविंदा यांचे दोन फार्महाऊस देखील आहेत. गोविंदा यांना राजकीय पार्श्वभूमी देखील आहे. गोविंदाचे चित्रपट आजही मोठ्या उत्साहाने पाहिले जातात.

गोविंदा यांचा 'कुली नंबर 1' चित्रपट खूप गाजला होता. गोविंदा हे अनेक डान्स शोचे देखील परीक्षक राहिले आहेत. गोविंदा यांनी 1987मध्ये सुनीता आहुजा यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलं आहेत. मुलगा यशवर्धन आहुजा आणि मुलगी टीना आहुजा. गोविंदा यांना पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात.

Govinda Net Worth
Pushpa 2 Collection : 'पुष्पा 2'चा तिसऱ्या आठवड्यातही धमाका, 1000 कोटींचा टप्पा पार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com