Energy Drink  SaamTvNews
लाईफस्टाईल

अति प्रमाणात एनर्जी ड्रिंक पिणे जीवावर बेतले!

तुम्ही जर अति प्रमाणात एनर्जी ड्रिंक पीत असाल तर सावधान!

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : तुम्ही जर अति प्रमाणात एनर्जी ड्रिंक (Energy Drink) पीत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण अति प्रमाणात एनर्जी ड्रिंकचं पिण्याचं व्यसन तुमच्या जीवावर बेतू शकतं. ब्रिटनमधील (Britain) एका व्यक्तीचा एनर्जी ड्रिंकच्या अति सेवनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलंय. सध्या बाजारात अनेक एनर्जी ड्रिंकची रेलचेल असून एनर्जी ड्रिंकची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढलीय. बरेच जण एनर्जी ड्रिंक आवडीने पितात.

हे देखील पहा :

मात्र, शारीरिक थकवा दूर करण्यासाठी, अतिरिक्त काम अथवा कामाचा ताण घालवण्यासाठी, जागरण करण्यासाठी सेवन केल्या जाणाऱ्या या एनर्जी ड्रिंकचं व्यसन तुम्हाला महागात पडू शकतं. कारण नेहमीच्या सॉफ्ट ड्रिंकपेक्षा एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफेनचं प्रमाण अधिक असतं, जे एक प्रकारचं केमिकल कंपाऊंड असल्यानं याचं अधिक सेवन शरीरासाठी घातक ठरू शकतं. ब्रिटनमधील एका 25 वर्षीय तरुणासोबत असाच प्रकार घडलाय. स्वतःला बिझी ठेवण्यासाठी आणि इतर मेहनतीची कामं करण्यासाठी या तरुणाला एनर्जी ड्रिंक पिण्याचं व्यसन लागलं. हे व्यसन इतकं वाढलं की सतत एनर्जी ड्रिंकचं सेवन केल्यानं या तरुणाचा हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला.

एका अभ्यासानुसार ब्रिटनमध्ये 3 पैकी 1 मुलगा आठवड्यातून किमान एकदा तरी एनर्जी ड्रिंकचं सेवन करतो. मात्र, एनर्जी ड्रिंकचे दुष्परिणाम देखील आहेत. एनर्जी ड्रिंकचं जास्त प्रमाणात सेवन केल्यास ब्लड प्रेशर वाढणं, झोप लागण्यात समस्या, डोकेदुखी, डायबेटिससारख्याही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे एनर्जी ड्रिंकच नाही तर कुठल्याही सॉफ्ट ड्रिंक अथवा पेयाचं व्यसन, अतिरिक्त सेवन टाळायला हवं. त्यामुळे तुम्हालाही सातत्याने एनर्जी ड्रिंक पिण्याचं व्यसन लागलं असेल, तर सावधानता बाळगा.. कारण व्यसन कोणतंही असलं, तरी ते तुमच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

SCROLL FOR NEXT