Heart Attack Symptoms saam tv
लाईफस्टाईल

Heart Attack Symptoms : केवळ छातीतील वेदनांना हार्ट अटॅकचं लक्षण समजू नका; शरीराच्या 'या' भागातील वेदनाही असतात संकेत

Heart Attack Symptoms : चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. यापैकी एक समस्या म्हणजे हृदयासंदर्भातील आजार. शरीराच्या इतर भागांमध्ये होणाऱ्या वेदना हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण असू शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

हृदय हा आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असतो. त्यामुळे हृदयाचं आरोग्य जपणं फार महत्त्वाचं आहे. सध्या आपल्यापैकी अनेकांची लाईफस्टाईल खराब झाली आहे. या चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार आपल्या मागे लागतात. यापैकी एक समस्या म्हणजे हृदयासंदर्भातील आजार. यामध्ये हार्ट अटॅकचा धोका अनेकांना असतो.

केवळ वयस्कर किंवा प्रौढ व्यक्ती नव्हे तर आजकाल तरूण मुलांना देखील हार्ट अटॅकचा त्रास मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर तुम्हाला काही संकेत देतं. मात्र आपल्यापैकी बहुतेक लोकं याकडे दुर्लक्ष करतात. पण या व्यतिरिक्त शरीराच्या इतर भागांमध्ये होणाऱ्या वेदना हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण असू शकतं.

खांदा आणि हातामध्ये वेदना होणं

हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान, खांदा आणि हातांमध्ये वेदना होणं खूप सामान्य आहे. या वेदना अनेकदा डाव्या खांद्यामध्ये आणि हातामध्ये होतात. प्रत्येक रूग्णानुसार या वेदना वेगळ्या असू शकतात. काही रूग्णांना या दोन्ही ठिकाणी वेदना होऊ शकतात. या वेदनेचं कारण हृदयाच्या धमन्यांमध्ये अडथळा येतो.

हार्ट अटॅकची इतर लक्षणं काय आहेत?

श्वास घेण्यास त्रास होणं

जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो त्यावेळी तो व्यक्ती घाबरतो. अशावेळी रूग्णाला श्वास घेण्यास त्रास होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशावेळी रुग्णाला ताबडतोब डॉक्टरांकडे नेले पाहिजे, कारण थोडासा विलंब देखील घातक ठरू शकतो.

चक्कर येणं

सायलेंट हार्ट अटॅक येण्यापूर्वी रूग्णाला कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत. त्याच्या सौम्य लक्षणांमध्ये काही वेळा चक्कर येणं किंवा अस्वस्थ वाटणं यांचा समावेश असू शकते. रूग्णांनी याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.

उल्टी होणं

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी एखाद् रूग्णाला मळमळ आणि उल्टीसारखं वाटण्याची शक्यता असते. काही रुग्णांना क्रॅप्म्स देखील येऊ शकतात. याचं कारण म्हणजे पोट आणि हृदयाच्या नसांचं कनेक्शन आहे.

अचानक घाम येणं

जर तुम्हाला अचानक घाम येत असेल किंवा काहीही शारीरिक हालचाल न करता घाम येत असेल तर हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. त्यामुळे जर तुमच्यासोबत असं घडलं तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Solapur Police : सालार गँगला लावला 'मोक्का'; पोलिसांची वर्षातील तिसरी कारवाई

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

SCROLL FOR NEXT