Overcoming fear of spine surgery saam tv
लाईफस्टाईल

Spine surgery: मणक्याच्या शस्त्रक्रियेला घाबरुन जाऊ नका; भिती कमी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

Overcoming fear of spine surgery: मणक्याची शस्त्रक्रिया म्हटलं की, अनेकांच्या मनात भीती आणि चिंता निर्माण होते. शस्त्रक्रियेचा धोका, वेदना आणि त्यानंतरच्या रिकव्हरीबद्दल अनेक गैरसमज समाजात पसरलेले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

तुम्ही मणक्याची शस्त्रक्रिया करत आहात का? बरं, त्यामुळे तुम्हाला ताण आणि चिंता वाटू शकते! शिवाय, अनेकांना परिणामाची भीती देखील असेल. जर तुम्ही शस्त्रक्रिया करून घेण्याबद्दल काळजी करत असाल तर तुम्ही एकटे नाही आहात. जर तुम्हालाही मणक्याच्या शस्त्रक्रियेची भीती वाटत असेल तर तज्ज्ञांनी तुमच्यासाठी काही टीप्स दिल्यात.

सध्या मणक्याच्या समस्यांनी ग्रस्त व्यक्तींची संख्या वाढत आहे. या समस्या त्यांच्या दिनचर्येत व्यत्यय आणू शकतात. जर मणक्याच्या समस्यांमुळे गतिहीनता निर्माण होत असेल, तर जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला जातो.

स्लिप डिस्क, स्पाइनल स्टेनोसिस, नर्व्ह कॉम्प्रेशन, फ्रॅक्चर किंवा दीर्घकालीन पाठदुखी यासारख्या समस्यांसाठी मणक्याची शस्त्रक्रिया केली जाते जी इतर उपचारांनी बरी होत नाही. याची अनेकांना भिती वाटते कारण लोकांना शस्त्रक्रियेचे धोके, संभाव्य गुंतागुंत, बरं होण्यासाठी लागणारा वेळ याची भीती वाटते आणि ते सामान्य हालचाल आणि स्वातंत्र्य परत मिळवतील की नाही याची काळजी वाटते.

मला खरोखर मणक्याच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे का, की शस्त्रक्रियेशिवाय देखील मी बरे होऊ शकतो?

जसलोक हॉस्पिटलमधील स्पाइन सर्जन डॉ. अमित शर्मा यांनी सांगितलं की, कमीत कमी आक्रमक आणि प्रगत मणक्याच्या शस्त्रक्रिया सारख्या प्रक्रियांमुळे समस्या दूर करता येणं शक्य आहे. मग ती स्लिप डिस्क असो, मज्जातंतूवर येणारा दाब असो अथवा अस्थिरता असो. रुग्णांना सहसा पाय दुखण्यापासून, शारीरिक हालचाली आणि जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर दीर्घकाळ बेड रेस्ट गरजेची आहे का?

हा एक सर्वात मोठा गैरसमज आहे. पूर्वी, रुग्णांना मणक्याच्या शस्त्रक्रियेनंतर काही आठवडे आणि महिने बेड रेस्टचा सल्ला दिला जात असे. आज, बहुतेकांना शस्त्रक्रियेनंतर काही तासांत चालण्यास प्रोत्साहित केलं जातं. रुग्णालयात राहण्याचा कालावधी सहसा 1 ते 3 दिवस इतका असतो आणि बहुतेक रुग्ण काही दिवस ते आठवड्यात कामावर परततात.

मणक्याच्या शस्त्रक्रियेची भिती कमी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

शस्त्रक्रियेबद्दल माहिती करून घ्या

शस्त्रक्रियेमध्ये काय समाविष्ट आहे, बरे होण्याचा कालावधी आणि शस्त्रक्रियेनंतर काय अपेक्षित आहे याबद्दल डॉक्टरांना प्रश्न विचारा. ऑनलाइन उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढू नका. कधीही डॉक्टरांना भेटून सर्व शंका दूर करणं योग्य राहणार आहे. यामुळे तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.

सकारात्मक रहा

नेहमी सकारात्मक विचार करा आणि उपचारांवर लक्ष केंद्रित करा. ध्यान किंवा खोल श्वास घेण्यासारख्या श्वासोच्छावासाच्या तंत्रांचा सराव करा ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारणार आहे.

योग्य वातावरण निर्मिती करा

तुमच्यासोबत कोणीतरी असावं जेणेकरून तुम्हाला घरातील कामांमध्ये मदत मिळू शकते. ज्याच्याशी तुम्ही मोकळेपणाने गप्पा माराल. वेदनांपासून मुक्त होणं आणि निरोगी जीवन जगणं हे ध्येय उराशी बाळगा.

आत्मविश्वास बाळगा

प्रेरणादायी कथा वाचणं, प्रगतीचे टप्पे साजरे करणं आणि स्वतःशी संवाद साधणं गरजेचं आहे. स्वतःला शिक्षित करा, मन शांत करा,शस्त्रक्रियेपूर्वी, दरम्यान आणि नंतर शांत राहण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT