Rainy season skincare ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Rainy season skincare: पावसाळ्यात त्वचा निस्तेज दिसतेय? फक्त या 5 काही सवयी बदलल्यास चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Monsoon skincare: पावसाळ्यात त्वचेची योग्य काळजी कशी घ्यावी? तेलकट, कोरडी, संवेदनशील आणि सामान्य त्वचेसाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या सोप्या स्किनकेअर टिप्स, योग्य सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आणि फेस वॉशची माहिती जाणून घ्या. त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी हे उपाय उपयुक्त ठरू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

जसा पावसाळा सुरू झाला की आपण कपडे, खाण्यापिण्याच्या सवयी आणि दैनंदिन दिनक्रमात बदल करतो तसाच बदल त्वचेच्या काळजीतही करणं गरजेचं असतं. हवामान बदलल्यामुळे त्वचेच्या गरजाही बदलतात. त्यामुळे रोजच्या स्किनकेअरमध्ये काही छोटे बदल केल्यास त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. पावसाळ्यात प्रत्येकाची त्वचा वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देते. त्यामुळे आपल्या त्वचेचा प्रकार ओळखून त्यानुसार काळजी घेतली तर त्वचा चांगली राहू शकते.

'जॉय पर्सनल केअर' यांच्या मुख्य विपणन अधिकारी पौलोमी रॉय यांनी पावसाळ्यात त्वचेची योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यावी, याबाबत काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

पावसाळ्यात त्वचा जास्त तेलकट होते का?

पावसाळ्यात हवेत आर्द्रता वाढल्यामुळे अनेकांची त्वचा नेहमीपेक्षा अधिक तेलकट दिसू लागते. अनेक जण ढगाळ वातावरण पाहून सनस्क्रीन लावत नाहीत. मात्र अतिनील (UV) किरणांचा प्रभाव वर्षभर असतो. त्यामुळे SPF 50 असलेलं हलकं आणि मॅट फिनिशचं सनस्क्रीन वापरणं योग्य ठरू शकतं.

हवेत ओलावा असला तरी त्वचा कोरडी वाटते?

पावसाळ्यात वातावरणात ओलावा असतो पण तरीही कोरड्या त्वचेला पुरेसा ओलावा मिळत नाही. बाहेरच्या दमट हवेतून सतत एसी असलेल्या जागेत गेल्याने त्वचा कोरडी, निस्तेज वाटू शकते. अशावेळी हलकं जेल मॉइश्चरायझर वापरणं फायदेशीर ठरतं. असे मॉइश्चरायझर त्वचेतील ओलावा ४८ तासांपर्यंत टिकवून ठेवण्यास मदत करतं.

त्वचा कधी तेलकट तर कधी कोरडी वाटते?

अशा त्वचेची काळजी घेणं पावसाळ्यात थोडं अवघड असतं. कारण चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागांवर हवामानाचा परिणाम वेगळा दिसतो. अशावेळी त्वचेचा समतोल राखणारी उत्पादनं वापरणं महत्त्वाचं असतं. लिंबू असलेला सौम्य फेस वॉश अतिरिक्त तेल आणि घाण साफ करण्यास मदत करतो.

थोड्याशा हवामान बदलानेही त्वचा लगेच रिएक्शन देते?

संवेदनशील त्वचेवर ऋतू बदलल्याचा परिणाम लवकर दिसून येतो. पावसाळ्यातील आर्द्रता, घाम आणि वातावरणातील बदलांमुळे त्वचेला जळजळ होणं, खाज येणं किंवा अस्वस्थ वाटणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अशावेळी पपई असलेला सौम्य फेस वॉश वापरणं चांगला पर्याय ठरू शकतो. तो त्वचेला शांत ठेवण्यास मदत करतो आणि त्वचा ताजी व सुरक्षित ठेवतो.

नैसर्गिक चमक कायम ठेवण्यासाठी काय कराल?

सामान्य त्वचा पावसाळ्यात इतर प्रकारच्या त्वचेपेक्षा चांगली राहते. पण म्हणून तिची काळजी घेणं थांबवू नये. हवेत होणाऱ्या आर्द्रतेतील बदलामुळे त्वचेच्या दिसण्यात आणि जाणवण्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे त्वचेची नियमित काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi Paratha: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एकदा असा बनवा मेथीचा पराठा, चहासोबत मस्त गरमागरम पर्याय

8th Pay Commission: पगार, DA, HRA आणि पेन्शनवर होणार मोठा परिणाम, पाहा 2.1, 2.5 आणि 3.0 फिटमेंट फॅक्टरचे संपूर्ण गणित

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा झटका! आणखी ५ लाख लाभार्थींना ₹१५०० येणं झालं बंद; यादीत तुमचं नाव तर नाही ना?

फ्रोजन मटार खावे की नाही? शरीरावर होणारे परिणाम जाणून घ्या

Accident News : भयंकर अपघात! रेल्वेची स्कूल व्हॅनला धडक, ३ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT