Hair Care Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Hair Care Tips : तुमच्या केसांनाही स्कॅल्प सिरमची गरज आहे का ? कसे ओळखाल, जाणून घ्या

Hair Falls Problem : केसांच्या समस्यांमुळे केसांची वाढ कमी होते. त्यामुळे अशा परिस्थितीत सिरम केसांसाठी एक प्रभावी उपाय करू शकतो.

कोमल दामुद्रे

Hair serum : आपला परफेक्ट लूक दिसण्यासाठी केसांची फार महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे कोरड्या केसांचा त्रास ,केस गळणे, कोंडयाची समस्या या केसांच्या समस्या दूर करण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.

खरे तर केसांच्या (Hair) या समस्यांमुळे केसांची वाढ कमी होते. त्यामुळे अशा परिस्थितीत सिरम केसांसाठी एक प्रभावी उपाय करू शकतो. सिरम केसांच्या लांबीपासून ते मुळापर्यंत लावून केसांच्या अनेक समस्या टाळता येतात.

उजाला सिग्नल्स ग्रुप ऑफ हॉस्पिटल (Hospital) येथील डॉक्टर शुचिन बजाज असे सांगतात की, स्कॅल्प सीरमने केसांचा कोरडेपणा, कोंडा आणि स्कॅल्पचा संसर्ग कमी करता येतो.

सीरम स्पेशली स्कॅल्प स्किन रिपेअर यासाठी तयार करण्यात आले आहे. ज्याचा केसांना खूप फायदा होतो. डॉक्टर बजाज म्हणतात की रोज केस धुतल्याने टाळूची त्वचा कोरडी होते. सोबतच कडकही होते . त्यामुळे अशा परिस्थितीत कोरड्या त्वचेला (Skin) आर्द्रता देण्यासाठी सीरम फार उपयुक्त आहे.

1. मॉइश्चरायझिंग

केसांसाठी वापरले जाणारे सीरम स्कॅल्प हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. त्यासोबतच क्रस्टिंग प्रतिबंधित आणि खाज सुटण्यापासून आराम देते. परिणामी केस निरोगी राहतात.

2. केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते

बायोटेक जीवनसत्वे (Vitamins) आणि खनिजे यासारखे पोषकघटक सीरममध्ये आढळतात. त्यामुळे केस निरोगी राहतात. हेअर रिपेरिंग करिता सीरम हा सर्वोत्तम पर्याय आहे. सीरममुळे केस मजबूत होतात आणि केसांची चमकही वाढते.

3. केस गळणे कमी

सेबमचे प्रॉडक्टस नियंत्रित करण्यासाठी अनेक सीरम मदत करतात. खरेतर, सेबम हे एक तेल आहे जे केसांच्या कूपांना बंद करण्याचे काम करते आणि त्यामुळे केस गळू शकते. अशा वेळेस सीरमचा वापर करून तुम्ही केस गळ्याच्या समस्या कमी करू शकतो.

4. स्कॅल्प सीरम वापरण्याची पद्धत

स्टेप -1

सीरम लावण्यापूर्वी केस ओले आणि शॅम्पूमुक्त असणे गरजेचे आहे. खरेतर, सीरम अप्लाय करण्यापूर्वी केसांवर कोणत्याही प्रोडक्टचा वापर करू नका. केवळ शॉवर घेतल्यानंतर सीरम लावल्याने केसांचे पोषण होते.

स्टेप -2

सीरमचा वापर करण्यापूर्वी कोणत्याही नॅचरल शॅम्पूने केस धुवा आणि त्यानंतर कंडिशनर लावा. आता केस कोरडे करून तुमच्या केसांना सीरम लावू शकता.

स्टेप-3

किंचित ओल्या केसांना दोन्ही हातांनी सीरम लावा. सीरम लावण्यासाठी तळहातांवर सीरमचे २/३ थेंब घुऊन केसांना लावा.

स्टेप-4

नंतर कंगव्याने केसांना दोन भागात विभाग आणि आता संपूर्ण टाळूवर सीरम लावा. हलक्या हातांनी सीरम केसांच्या मध्यभागी लावा.

स्टेप-5

संपूर्ण डोक्यावर सिरम लावावे हे लक्षात ठेवा. आता आपली बोटे केसांमधून सुमारे 10 मिनिटे हलवा जेणेकरून सीरम मुळांमध्ये पूर्णपणे पोहचेल. आता हलक्या हातांनी मालिश केल्यानंतर केस मोकळे सोडा. केस न धुता कोरड्या केसांवर सीरम वापरू शकता. सीरममुळे केस केस तेलकट होत नाहीत आणि तुम्हाला केस धुण्याची गरज नाही. स्कॅल्प सीरम केसांच्या संसर्गाचा धोका कमी करतो. यासोबतच हे केसांना मॉइश्चरायझ ठेवण्याचे काम करते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood : तिने अभिताभ बच्चनशी संबंध... विवाहबाह्य संबंधांवर रेखा यांचे वडील काय म्हणाले?

Maharashtra Rain Live News: पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी

ठाणे, दादर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तोबा गर्दी, VIDEO

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर कंटेनर उलटला; रस्ता ब्लॉक, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Mumbai Vada Pav : मुंबईच्या वडापावला मिळाला दक्षिण भारतीय ट्विस्ट! नवा फ्युजन फ्लेवर सोशल मीडियावर चर्चेत

SCROLL FOR NEXT