Blood Sugar Level Saam tv
लाईफस्टाईल

Blood Sugar: जेवल्यानंतर पायी चालल्याने ब्लड शुगर लेवल कमी होते? तज्ज्ञांनी सांगितलं सत्य

Blood Sugar: जेवल्यानंतर पायी चालल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होऊ शकतं. यासाठीच प्रत्येकाला जेवणानंतर पायी चालण्याचा सल्ला दिला जातो.

Surabhi Jayashree Jagdish

चालणं हा अतिशय फायदेशीर व्यायाम मानला जातो. पायी चालल्याने अनेक आजार आपल्यापासून दूर जातात असं म्हटलं जातं. असा दावा केला जातो की, पायी चालल्यानंतर तुमची ब्लड शुगर म्हणजेच रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं. पण असं खरंच आहे का? जाणून घेऊया तज्ज्ञांनी याबाबत काय माहिती दिलीये.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रक्तातील साखरेच्या प्रमाणात दिवसभर सहज चढउतार होऊ शकतो. जेवल्यानंतर पायी चालल्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होऊ शकतं. यासाठीच प्रत्येकाला जेवणानंतर पायी चालण्याचा सल्ला दिला जातो.

डोंबिवलीच्या इंटेन्सिव्हिस्ट एम्स हॉस्पिटलचे डॉ कुशल बांगर यांनी सांगितलं की, रक्तातील साखरेची पातळी सामान्यतः जेवणानंतर वाढते आणि नंतर हळूहळू कमी होते कारण शरीर ऊर्जेसाठी ग्लुकोज वापरते किंवा पुढील वापरासाठी साठवते. निरोगी किंवा फिट व्यक्तींसाठी रक्तातील साखरेची पातळी जेवणानंतर दोन तासांनी 140 mg/dL (मिलीग्राम प्रति डेसीलीटर) च्या खाली असली पाहिजे.

ही पातळी जर जास्त असेल तर ती धोक्याची घंटा ठरते. जेवणानंतर चालणे तुमची रक्तातील साखर आणिइन्सुलिन स्थिर ठेवण्यास मदत करू शकते. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार दुपारचे किंवा रात्रीचे जेवण घेतल्यानंतर, बसून राहणे किंवा झोपण्याऐवजी, 2 ते 5 मिनिटे हलके चालणे रक्तातील साखरेची पातळी सुधारू शकते, असंही डॉ. बांगर यांनी सांगितलं.

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, दररोज 10,000 पावले किंवा किमान 30 मिनिटं चालणं आपल्याला साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकते. तुम्हाला एकावेळी 30 मिनिटे चालणे कठीण वाटत असल्यास, दिवसभर सकाळी, दुपार आणि संध्याकाळी 10 मिनिटे चालण्याचा प्रयत्न करा. अधिक सक्रिय राहिल्यास डायबिटीसचा धोका कमी असतो. तुम्ही जितकं जास्त चालाल तिचकंच शुगर लेव्हल कमी राहण्यात मदत होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्याचा मार्ग मोकळा! e-KYC पूर्ण; 'एवढ्या' महिलांना मिळणार लाभ

Maharashtra News Live Update: पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार

Abhijeet Dipke: तू भाजपात ये नाही तर तुला गोळ्या घालू, अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप

ITR filing: ITR भरण्यासाठी उरले २४ तास; फक्त १० मिनिटांत घरबसल्या रिटर्न भरा, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Railway Accident : नागपुरात भयंकर दुर्घटना! रेल्वे रुळावर २ भावांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले; नेमके काय घडले?

SCROLL FOR NEXT