उशीरा झोपल्या शरीरातील हार्मोन्स आणि मेटाबॉलिझमवर नकारात्मक परिणाम होतो.
उशीरा उठल्यामुळे भूक वाढते.
व्यायामाची आणि पचनाची नियमित सवय बिघडते.
नियमित झोपेची वेळ पाळल्यास वजन नियंत्रित राहतं आणि आरोग्य सुधारतं.
आजकाल लोक दिवस रात्र एक करुन यश मिळवण्यासाठी धावपळ करत आहेत. त्यामध्ये ट्रेनचा प्रवास, कामाता ताण, घरचे टेंशन या विचारांनी माणूस थकून जातो. अशा वेळी माणसाला सगळ्यात महत्वाची असते झोप. यामुळे आजकाल अनेक लोक उशिरा झोपण्याची आणि सकाळी उशिरा उठण्याची सवय लावून घेतात. कामाचा ताण, मोबाईलचा वापर, सोशल मीडियावर वेळ घालवणं किंवा इतर कारणांमुळे झोपेची वेळ पुढे ढकलली जाते. पण ही सवय तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.
तज्ज्ञ सांगतात की, लेट उठण्यामुळे शरीराचा बायोलॉजिकल क्लॉक बिघडतो. त्यामुळे हार्मोन्स असंतुलित होतात, विशेषत: भूख आणि मेटाबॉलिझम नियंत्रित आणणारे हार्मोन्स बदलतात तेव्हा जास्त भूक लागते आणि आपण सारखे किंवा जे वाटेल ते पदार्थ खातो. त्यामुळे कॅलरी इंटेक वाढतं याचाच परिणाम तुमच्या वजनावर होतो.
फक्त एवढंच नाही तर लेट उठल्यामुळे रोजचं ठरलेलं वेळापत्रक विस्कळीत होतं. व्यायामाला वेळ मिळत नाही, शारीरिक हालचाल कमी होते. पुढे याचा परिणाम शरीरात जास्त कॅलरी जमा झाल्यावर आपल्याला कळतं. हाच कॅलरीचा साठा पुढे जाऊन लठ्ठपणाचं कारण ठरतो. उशिरा उठल्यामुळे शरीरात ताण वाढतो, झोपेची कमतरता भासते आणि त्यामुळे देखील वजन वाढण्याची शक्यता वाढत जाते.
लेट उठण्याचे आणखीही तोटे आहेत. सकाळच्या वेळी बद्धकोष्ठतेला त्रास होतो. पोट साफ न झाल्यास शरीराला डिटॉक्स होण्यास अडथळा येतो. त्यामुळे रक्तात वेस्ट प्रोडक्ट्स साचतात आणि ते हळूहळू त्वचेवरही दिसू लागतात. काही अभ्यासानुसार, लेट उठल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल वाढू शकतो आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. तसेच हार्मोनल बदलामुळे मूड स्विंग्स, तणाव आणि मायग्रेनसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवायचं असल्यास वेळेवर झोपणे आणि सकाळी वेळेवर उठणे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे दररोज झोपण्याची आणि उठण्याची ठरलेली वेळ पाळल्यास वजन नियंत्रित राहतं आणि एकूण आरोग्य सुधारतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.