Diabetes Control In Summer Season Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Control In Summer Season : उन्हाळ्यात शुगर लेव्हल खरेच वाढते का? जाणून घ्या डॉक्टरांकडून, लगेच होईल कंट्रोल

Diabetes Health : ऋतूमानानुसार बदलेल्या जीवनशैलीत आपले खाणपाण देखील बदले जाते. अशावेळी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण करणे कठीण होते.

कोमल दामुद्रे

How To Control Sugar Level : भारतातील ९० टक्के असे लोक आहेत ज्यांना मधुमेह हा आजार जडला आहे. हा आजार एकदा जडला की, यातून लवकर सुटका होत नाही. ऋतूमानानुसार बदलेल्या जीवनशैलीत आपले खाणपाण देखील बदले जाते. अशावेळी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रण करणे कठीण होते.

जेव्हा आपण कार्बोहायड्रेडयुक्त पदार्थांचे सेवन करतो तेव्हा त्यापासून पोटात (Stomach) ग्लूकोज तयार होते. हे ग्लुकोज रक्तामार्फत शरीरात पसरते. याच ग्लुकोजपासून ऊर्जा तयार केली जाते आणि त्यामुळे शरीर योग्यरीत्या काम करु शकते.

शरीरातील इन्सुलिन कमी होते तेव्हा ग्लुकोज शोषण कमी होऊ लागते त्यामुळे साखरेचे प्रमाणा शरीरात वाढते. याचा परिणाम रुग्णाच्या हृदय, मुत्रपिंड, डोळे (Eye) आणि इतर अवयवांवर होतो. सोबतच इतर आजारांचा धोका देखील बळावतो.

मधुमेहामध्ये रक्तातील साखर कायम वर-खाली होत असते. त्यामुळे मधुमेही रुग्णांना डॅाक्टरांकडून त्यांच्या आहारावर (Food) विशेष लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. अनेकदा उन्हाळ्याचा रक्तदाबावर परीणाम होतो असे म्हटले जाते. जाणून घेऊया डॉक्टरांकडून.

1. उन्हाळ्यात खरंच शुगर लेव्हल वाढते का?

रक्तातील साखर वाढण्याची आणि कमी होण्याची अनेक कारणे आहेत. आपला आहार, दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या वेळा चुकीच्या असतील तर रक्तातील साखर वाढणे साहजिकच आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या आहारात आणि जीवनशैलीत एकसमानता ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

उन्हाळ्यात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याचा कोणताही पुरावा अद्याप उपलब्ध नसल्याचे डॉक्टरांचे मत आहे. काही लोकांना उन्हाळ्यात रक्तातील साखर वाढण्याचा त्रासाला सामोरे जावे लागते.

काही संशोधनात उन्हाळ्यात काही परिस्थितीत काही मधुमेही रुग्णांना रक्तातील साखर वाढीचा त्रास होऊ शकतो. मात्र, हे संशोधन अद्याप पूर्णपणे प्रमाणित झालेले नसून यानंतर संशोधनाचे काय परिणाम येतात हे पाहाणे महत्वाचे ठरेल. त्यामुळेच सध्या उन्हाळ्यात मधुमेही रुग्णाची साखर वाढली तर त्याची आणखीही काही कारणे असू शकतात असे डॉक्टरांचे मत आहे.

2. कोणत्या परिस्थितीत रक्तातील साखर वाढते.

डॉक्टरांच्या मते जर आपण मधुमेही आहात आणि नियमित स्वरुपात व्यायाम आणि पाौष्टीक आहार करत नसाल तर तुमची शुगर लेव्हल वाढू शकते. दुसरं म्हणजे आपण इंसुलिन वरील मधुमेही आहात आणि इंसुलिन घेतल्या-घेतल्या लगेच उन्हात बाहेर पडलात तर इंसुलिनचा प्रभाव लवकर कमी होऊ शकतो आणि शूगर लेव्हल कमी-जास्त होऊ शकते. पण जर आपण मधुमेही आहात आणि सर्वकाही योग्यरीत्या करत असाल तर तुम्हाला उन्हाळ्याचा त्रास होणार नाही.

3. उन्हाळ्यात साखर नियंत्रणात ठेवण्यासाठीचे नियम

  • डॉ. म्हणतात की मधुमेही रुग्णाला कोणत्याही ऋतुत आपल्या पथ्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

  • डॉक्टरांनी सांगितलेल्या पदार्थांचे वेळेत सेवन केले पाहिजे. त्याबरोबर नित्याने व्यायाम आणि औषधे घेतली पाहिजे.

  • शारीरिक हालचालींमुळे देखील साखरेची पातळी वाढू शकते.

  • सकस आहार व दिनचर्येत एकसमानता असावी.

  • पुरेशी झोप आणि तणावापासून दूर रहावे.

  • तणाव दूर करण्यासाठी योगा, मेडिटेशनचा वापर करावा. आहारात हंगामी भाज्यांचा वापर जास्त करावा.

  • तळलेले पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, सॅच्युरेटेड फूड, प्रक्रिया केलेले अन्न खाऊ नये.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

Health: शरीरासाठी आवश्यक पदार्थ कोणकोणते? जाणून घ्या एका क्लिकवर

Abhijeet Kelkar: 'धुरळा उडाला, सूर्य पुन्हा एकदा तळपला...' देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर मराठी अभिनेत्याची जबरदस्त पोस्ट, म्हणाला...

Amravati Assembly Election 2024: बच्चू कडूंना पराभवाचा धक्का, अमरावतीच्या प्रत्येक मतदारसंघाचा निकाल एका क्लिकवर

Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT