Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

Pune News : पुण्यातील मध्यवर्ती एस.एम. जोशी पुलावर गेल्या चार दिवसांपासून कचऱ्याचे ढीग साचले असून महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप
Pune newsSaam Tv
Published On

अक्षय बडवे (पुणे)

संस्कृती नगरी, शिस्तप्रिय नागरिकांची ओळख असलेलं पुणे शहर गेल्या काही वर्षांत झपाट्याने बदलतं आहे. पण या बदलामध्ये स्वच्छतेच्या बाबतीत पुणेकरांची उदासीनता आणि प्रशासनाची निष्क्रियता पुन्हा एकदा उघड झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला एस.एम. जोशी पूल सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे अक्षरशः कचराकुंडी बनला आहे.

पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेला आणि हजारो वाहनचालक तसेच पादचाऱ्यांचा रोजचा मार्ग बनलेला एस. एम. जोशी पूल सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्याने व्यापला गेला आहे. गेल्या चार दिवसांपासून या पुलावर घरगुती कचरा, प्लास्टिक पिशव्या, मोठमोठे खोके, निर्माल्य आणि इतर घाण टाकली जात आहे. मात्र, पुणे महापालिकेने हा कचरा उचलण्यासाठी काहीही कारवाई केली नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

हा पूल मुठा नदीवर असून आबासाहेब गरवारे महाविद्यालय आणि शास्त्री रस्ता जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ हजारो वाहनं या मार्गावरून धावतात. वाहनचालकांबरोबरच सकाळी वॉक करणारे नागरिक, मित्रमंडळींच्या गप्पांचे ग्रुप, तरुणाईचे कट्टे आणि अगदी वाढदिवस साजरे करणारे मुलं-मुली या पुलावर रोज जमून असतात. पण इतक्या गर्दीतही कोणीतरी नागरिक बेशिस्तपणे कचरा टाकतो आहे. यामुळे "नेहमी शिस्तीचा अभिमान बाळगणारे पुणेकरच आता इतके बेशिस्त झालेत का?" असा सवाल उपस्थित होतो आहे.

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप
Pune News: पुणे पोलिस ताफ्यात ५ ‘दृष्टी’ वाहनांची भर; एआय कॅमेऱ्याने ३६० डिग्री नजर|VIDEO

पुलाच्या दोन्ही बाजूंना फूटपाथ आहेत. मात्र या फूटपाथवर आता अक्षरशः कचराच कचरा दिसतो. पादचाऱ्यांना चालताना नाक दाबून जावं लागतं. कचऱ्यामुळे डास, माशा, कीटक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पावसाळ्यात या घाणीमुळे डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो सारखे आजार पसरण्याचा धोका वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आसपास राहणाऱ्या लोकांना दुर्गंधीमुळे श्वास घेणंही कठीण झालं आहे.

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप
Pune : पुण्यात भयंकर घडलं, कंपनीतील ३ कर्मचाऱ्यांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू

या पुलावर कुठलाही सीसीटीव्ही कॅमेरा नसल्यामुळे कचरा कोण टाकतो आहे हे शोधणं प्रशासनासाठी अशक्य झालं आहे. त्यामुळे महापालिकेची कारवाई करण्याची ताकद कमी पडते आहे. गेल्या चार दिवसांपासून कचरा पडून असूनही महापालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याची नाराजी नागरिक व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर देखील अनेकांनी या घाणीचे फोटो टाकून महापालिकेवर ताशेरे ओढले आहेत.

Pune PMC News : पुण्यातील नामांकित 'जोशी' पुलावर घाणीचे साम्राज्य, महापालिकेच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप
Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, आज-उद्या वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

दरम्यान, या पुलावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने कचरा टाकणाऱ्यांना कुणी रोखत नाही हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे. प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना होणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांनी पुलावर सीसीटीव्ही बसवून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com