
दहीहंडी उत्सवामुळे पुण्यात १५-१६ ऑगस्ट रोजी वाहतूक बदल.
मध्यवर्ती भागातील अनेक प्रमुख रस्ते बंद राहणार.
पोलिसांनी पर्यायी मार्गांची सविस्तर माहिती दिली.
आपत्कालीन सेवांची वाहतूक मात्र सुरळीत राहील.
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुण्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. श्रीकृष्ण जंयती आणि दहीहंडी उत्सवानिमित्त पुण्यात वाहतूक मार्गात हे बदल करण्यात आले आहेत. १५ ऑगस्ट आणि १६ ऑगस्ट या दोन दिवशी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. दहीहंडी उत्सव पुणे शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केले आहेत.
पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील शिवाजीरोड, लक्ष्मीरोड, बाजीराव रोड, टिळक रोडवर दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यावेळी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते. या रस्त्यांवर कुठेही वाहतूकीची कोंडी होऊ नये आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे चालावी याकरीता अत्यावश्यक सेवेतील वाहने म्हणजेच फायरब्रिगेड, पोलिस वाहने, रुग्णवाहिका वगळता आवश्यकतेनुसार आणि तेथील वाहतुकीच्या परिस्थिनुसार वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहेत.
१.तीन तोफा चौक ते ब्ल्यु नाईल चौक ईस्कॉन मंदिरा समोरुन जाणारा रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे.
(पर्यायी मार्ग - ब्ल्यू नाईल चौक ते तीन तोफा चौकाकडे जाणारा मार्ग हा दुतर्फा वाहतूक करण्यात येईल.)
२. गगण उन्नती चौक येथील यु टर्न बंद करण्यात येत आहे.
३. केसर लॉज जवळील यु टर्न बंद करण्यात येत आहे.
४. खडीमशीन पोलीस चौकी ते श्रीराम चौक या रोड वरील वाहतूक बंद करण्यात येत आहे.
( पर्यायी मार्ग -सदर मार्गावरील वाहनांनी खडी मशिन चौकातुन यु टर्न घेवुन इस्कॉन मंदिराचे पार्किंग कडे जावे व इतर वाहनांनी इच्छित स्थळी जावे. मंतरवाडी फाटा खडीमशिन चौक कात्रज चौक दरम्यानचे मार्गावरील जड वाहतूक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.)
५. शिवरकर रोड वरील वाहतूक बंद करण्यात येत आहे.
(पर्यायी मार्ग - सदर मार्गावरील वाहनांनी सविधान चौकातुन डावी कडे वळुन सनग्रेस स्कुल मार्गे साळुंखे विहार रोडने इच्छित स्थळी जावे व येणारी वाहतूक त्याच रोडने येईल.)
२. सविंधान चौकाकडून उजवीकडे जाणारी वाहने ही फ्लॉवर व्हॅली लेन कडून केदारी पेट्रोल पंप पुढे इच्छित स्थळी जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.