Surabhi Jayashree Jagdish
आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे स्वतःचे एक कार्य आणि महत्त्व असते.
अशा परिस्थितीत निरोगी राहण्यासाठी या अवयवांचं हेल्दी असणे अत्यंत आवश्यक आहे.
यापैकीच एक अवयव म्हणजे यकृत, ज्याचं आरोग्य त्याच्या रंगावरून ओळखता येतं. तुम्हाला माहितीये का हेल्दी लिव्हरचा रंग नेमका कसा असतो.
आपल्या शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करण्यामध्ये लिव्हरची महत्वाची भूमिका असते.
निरोगी लिव्हरला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा झाल्यामुळे तो लाल-तपकिरी रंगाचा दिसतो.
लिव्हरचा हा रंग आपल्याला सांगतो की लिव्हर आरोग्यदायी असून नीट कार्य करत आहे.
लिव्हरचा रंग पिवळा होणे हे फॅटी लिव्हरचे लक्षण असते, तर रंग हिरवट-निळसर होणं म्हणजे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाल्याचे संकेत असतात.
लिव्हरचा रंग बदलणे हे दिसायला जरी साधं वाटत असलं तरी ते एखाद्या मोठ्या धोक्याचं सूचक ठरू शकतं.