
बेस्ट को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
एकूण 15,090 मतदारांपैकी 12,360 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
हे मतदान मुंबईतील तब्बल 33 डेपोमध्ये पार पडले.
या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे समर्थित उत्कर्ष पॅनल यांच्यात तसेच भाजपाचे प्रसाद लाड यांच्या पॅनलमध्ये थेट लढत रंगली आहे.
निकालावर सर्वांचे लक्ष लागले आहे.
लातूरच्या अहमदपूरमधून जाणाऱ्या मन्याड नदीला पूर
नदीपलीकडील अनेक गावांचा संपर्क तुटला
सलग तीन दिवसापासून लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय
त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे
: जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे.जालन्यातील बदनापूर तालुक्यात देखील मुसळधार पाऊस पडला आहे. बदनापूर तालुक्यातील पाडळी शिवारात पावसामुळे शेताला अक्षरशः तलावाच स्वरूप आल असून खरिपातील पिके पाण्याखाली गेली आहे. पाडळी शिवारातील सोयाबीन, मका, कपाशी ही पिके पूर्णता पाण्याखाली गेली असून शेताला तलावाच स्वरूप आल आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवलीतील सर्व शाळांना महापालिका प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. केडीएमसी शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांच्याकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार आज दिनांक १८ ऑगस्ट, २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व लातूर जिल्ह्यांना आँरेज अलर्ट तर परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
ठाणे जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आले असून याच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी यांनी यांनी ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील भिवंडी, शहापूर,मुरबाड तालुक्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गोविंद गंगाधर लोंढे असे या 32 वर्षे तरुणाचे नाव असून इतर पाच मित्रांच्या सोबत तो आज सकाळी पारोळा येथील धबधब्यावर गेला होता दरम्यान सेल्फी घेत असताना अचानक त्याचा तोल घसरला व तो वाहून गेला होता पासाभराच्या शोध मोहिमेनंतर हिंगोली ग्रामीण पोलिसांना त्याचा मृतदेह सापडला आहे.
पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी
वांद्रे कडून बोरिवलीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
जोरदार पावसामुळे दृश्य मानता कमी झाल्यामुळे तसेच रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा
कामावरून घरी परतणाऱ्या मुंबईकरांची वाहतूक कोंडीमुळे अडचण
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली आहे.गेल्या 24 तासात 43 मिलीमीटर पाऊसाची नोंद झाली असून चांदोली धरण 93 टक्के भरले आहे.त्यामुळे चांदोली धरणातून वारणा नदी पात्रात 11 हजार 630 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
कल्याण पूर्वेतील नेतिवली टेकडी परिसरात दरड कोसळण्याची घटना,
नेतिवली पोलीस स्टेशनच्या पाठी असलेल्या जय भवानी नगर मध्ये घडली घटना,
दोन ते तीन घरांचे मोठे नुकसान मात्र, सुदैवाने घरातील लोक कामासाठी बाहेर असल्याने कोणतीही जीवितहानी टळली,
दरडीसोबत विद्युत वाहिनी तुटल्यामुळे परिसरात विजेचा धोका निर्माण झाल्यानंतर रहिवाशांमध्ये घबराट आणि भीतीच्या वातावरण,
अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे,
अग्निशामक दल आणि पालिकेकडून या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशाला सुरक्षित ठिकाणी हटवण्याचं काम देखील सुरू केलेला आहे,
शनिवारी रात्री संगमनेर शहरालगत घुलेवाडी गावात कीर्तनावेळी झालेल्या गोंधळानंतर राजकीय वातावरण तापले आहे.. बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांनी कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांना मारहाण केल्याचा आरोप केला जातोय.. तर दुसरीकडे कीर्तनकार अभंगाचे निरूपण करण्याऐवजी राजकीय भाष्य करत असल्याचा आरोप होतोय.. आज हिंदुत्ववादी संघटनांनी घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे आमदार अमोल खताळ आणि भाजपा आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन केलंय.. या आंदोलनादरम्यान खताळ आणि भोसले यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करण्यात टिका केलीय.. तर काही शक्तींकडून संगमनेरची संस्कृती बिघडवण्याचे काम सुरू असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे...
० मुंबई गोवा महामार्गावर चोळई गावाजवळ कंटेनर पलटी
० अपघातग्रस्त टँकर रस्तात आडवा झाल्याने वाहतुकीला अडथळा
० एकेरी वाहतुक सुरु
० अपघातामध्येमुळे कशेडी घाट आणि पोलादपुर दरम्यान वाहनांच्या लांब रांगा
० पोलिसांनी घटनास्थळी दाखल
सांगलीच्या शिराळा तालुक्यातील माळेवाडी-कोकरूड मध्ये एका घरामध्ये बिबट्या शिरल्याचा प्रकार घडला होता. बिबट्या घरात शिरलेला पाहताच घराला बाहेरून कडी घालत बिबट्याला घरात कोंडण्यात आले.घरात शिरलेल्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे.
- बांगलादेश बॉर्डरवर कांद्याने भरलेले 400 ते 500 ट्रक अडकून पडले....
- बॉर्डर वरील ट्रकमध्ये बारा ते पंधरा हजार मॅट्रिक टन कांदा खराब होण्याची भीती....
० माणगाव पुणे मार्ग वाहतुकीसाठी बंद
० माणगाव इथून ताम्हिणी घाटातून पुण्याकडे जाणारा मार्ग बंद
० काळ नदीला आलेल्या पुराचे पाणी पोणोसे गावाजवळ रस्त्यावरून वाहतल्याने वाहतूक बंद
० पर्याय म्हणून पाली खोपोली मार्गाचा वापर करावा
० पोलिस प्रशासनाचे आवाहन
० पहाटेपासून रायगड जिल्ह्यात सुरू आहे मुसळधार पाऊस
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील सर्व चार धरणांत मिळून २६.८० टीएमसी म्हणजेच ९१.९४ टक्के पाणीसाठा आहे.
मागील वर्षी याच दिवशी २८.३८ टीएमसी म्हणजेच ९७.३८ टक्के साठा होता.
यावर्षीचा साठा मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा साठा २ टीएमसीने कमी आहे.पण एकूण पाणीसाठा समाधानकारक आहे.
खडकवासला धरणातून आजपर्यंत १२.८४ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले आहे.
गेले काही दिवसात खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची चांगली हजेरी.
मीरा भाईंदर काशिनगर भागात रस्त्याला नद्यांचे स्वरूप रस्त्यावर पाणीच पाणी
काशिनगर भागात अनेक सोसायटी मध्ये शिरले पाणी
सोसायटी मधील टू व्हिलर गाड्या पाण्याखाली
काशिनगर भागातील नागरीक आणि लहान मुलांना करावा लागतोय पाण्यातून प्रवास
गटारातील गहाण पाणी रस्त्यावर आल्याने परिसरात रोगराई पसरण्याची भीती वर्तवली जात आहे.
ठाणे स्टेशन स्थानकात रेल्वे प्रवाशांची तुफान गर्दी...
मध्य रेल्वे लोकल सेवा १० मिनिटे उशिराने धावत आहे
सकाळपासून मुंबई ठाणे परिसरात मुसळधार पाऊस पडत होता..
सकाळी कामाला जाण्यासाठी निघालेले चाकरमानी आता घरी जायला निघत आहे... त्यामुळे ठाणे स्टेशन स्थानकात प्रचंड गर्दी रेल्वे प्रवाशांची वाढली आहे..
प्लॅटफॉर्म नंबर २,३,५ या प्लॅटफॉर्मवर कसारा व कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी...
तब्बल आठ तासानंतर अंधेरी सबवे वाहतुकीसाठी खुला
सकाळी साडेआठ वाजता अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता
मुसळधार पावसामुळे अंधेरी सब वेत पाच फुटापर्यंत साचले होते पाणी
पावसाने उसंत घेतल्यानंतर सबवेतील पाण्याचा झाला निचरा
पाण्याचा निचरा होताच वाहतूक पोलिसांनी सबवे वाहतुकीसाठी केला खुला
कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस,
कल्याण पूर्वेतील चेतना पाईपलाईन रोड गुडघाभर पाण्याखाली, तर कोपर रोडवरील सोसायट्यांतही पाणी शिरले,
कल्याण पूर्व चेतना पाईपलाईन रोडला मुसळधार पावसाचा मोठा फटका, गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ,
तर डोंबिवली कोपर रोडवरील अंबा भवानी मंदिर परिसरात सोसायट्यांच्या आवारात पाणी शिरले,
मुलं व ज्येष्ठ नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण,
० रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत आहे
० माणगाव तालुक्याला पावसाने झोडपले
० रिळे - पाचोळे गावात जाणार्या रस्त्यावर पाणीच पाणी
० पर्यायी मार्ग नसल्याने नागरिकांचे हाल
० पाणी साचलेल्या रस्त्यावरून कंबरभर पाण्यातून मार्गा काढत जाण्याची ग्रामस्थांवर वेळ
० धोकादायक परिस्थितीतून नागरिकांची घराकडे वाटचाल
ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाण्यात १८, १९ ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे. तर, नवी मुंबईतही शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
सायन पनवेल महामार्गावर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे
सकाळपासून नवी मुंबई शहरात मुसळधार पाऊस पडत आहे
नवी मुंबई महानगरपालिकेने सुद्धा विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली आहे
चेंबूर वाशी नाकामध्ये एमएमआरडी संरक्षणभिंत कोसळून 7 झोपड्यांचे नुकसान
मुंबईत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काल दिनांक १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास चेंबूर वाशी नाका मधील न्यू अशोक नगर येथील एमएमआरडी संरक्षणभिंत कोसळून 7 झोपड्यांचे नुकसान झाले आहे यात प्रभावित कुटुंबांची तात्पुरती व्यवस्था मरवली चर्च येथे करण्यात आली आहे सध्या संपूर्ण मातीचा ढिगार काढण्याचे काम पालिका करत आहे या ठिकाणाहून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अविनाश माने यांनी
० रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला
० आंबा आणि कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली तर सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली
० शाळा, महाविद्यालयांना दुपारनंतर सुट्टी
० सखल भागात राहणाऱ्या नागरीकांना दक्षतेचा इशारा
० रायगडच्या निजामपूर भागाला पावसाचा जोरदार फटका
० निजामपूर बाजापेठेतील दुकानांमध्ये शिरलं पावसाचे पाणी
० दुकानात पाणी शिरून वस्तूंचे नुकसान
० माणगाव - पुणे रस्त्यावर पाणीच पाणी
० पावसाच्या तडाख्याने नागरिक हैराण
जामपूर बाजापेठेतील दुकानांमध्ये शिरलं पावसाचे पाणी
दुकानात पाणी शिरून वस्तूंचे नुकसान
माणगाव - पुणे रस्त्यावर पाणीच पाणी
पावसाच्या तडाख्याने नागरिक हैराण
मध्यप्रदेशात झालेल्या पावसामुळे तापी नदीला पूर....
प्रकाशा बेरेज चे 6 दरवाजे 3 मीटरने उघडण्यात आले....
नदी पात्रात नागरिकांनी न जाण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील दोन दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे नदी ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. गडनदीने ईशारा पातळी ओलांडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात पूर्णपरिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्य़ात पावसाच्या अधूनमधून सरी कोसळत आहे.
दौंड तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याची दहशत असल्याचे चित्र आहे.अशातच आता पुन्हा एकदा दौंड तालुक्यातील दहिटणे गावामध्ये बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेच वातावरण असून वनविभागाने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जातेय.
रायगडमध्ये सकाळपासूनच पावसाचा जोर कायम
० सांदोशी गावचा संपर्क तटला
० सांदोशी गावाला जोडणाऱ्या पुला वरून पाणी वाहतानाच दृश्य दिसत आहे
अहिल्यानगर शहरात समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला. शहर परिसरातून शेकडोंच्या संख्येने मुस्लिम समाजबांधव रस्त्यावर उतरले होते. खाटीक समाजाला भेडसावणारे प्रश्न तसेच जळगाव येथे मॉब लिंचिंगच्या घटनेत झालेली सुलेमान पठाण यांची निर्दयी हत्या याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला.
भिमाशंकर मंचर मार्गावर भिमाशंकरजवळ २० किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडलेत अशात धुक्यातुन मार्ग काढत असताना रस्त्यावरील खड्ड्यातुन भाविकांना प्रवास करावा लागतोय
- विधानसभा निवडणुकानंतर हेमलता पाटील काँग्रेसमधून पडल्या होत्या बाहेर
- काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात देखील त्यांचा झाला होता प्रवेश, मात्र सेनेतून देखील त्यांनी बाहेर पडण्याचा घेतला निर्णय
- उद्या मुंबईत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थित हेमलता पाटील करणार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश
- आदिवासी बांधवांचा निघणार विराट मोर्चा
- गेल्या 40 दिवसांपासून नाशिकमध्ये सुरू आहे आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन
- सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने आदिवासी संघटना संतप्त
जिल्ह्यातील सर्वच नदी नाल्यांना मोठा पूर.
नांदेड जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी.
किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर असलेल्या सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्र रूप.
धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी.
सध्या ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे
ठाण्यातील सकल भागात पाणी भरायला सुरुवात
आपातकालीन यंत्रणा सज्ज...
बीडच्या परळी तालुक्यातील कौडगाव हुडा गावाजवळ रविवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली. ममदापूर-बोरखेड मार्गावरील कौडगावहुडा जवळ पुलावरून जात असताना चारचाकी गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. या कारमध्ये चार तरुण होते. त्यापैकी तिघांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर, एक तरुण अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. परळी मतदार संघाचे आ. धनंजय मुंडे रात्रीपासून प्रशासनाच्या संपर्कात असून त्यांच्या सूचनेनुसार बचावकार्यासाठी पुणे येथून एनडीआरएफचे पथक तातडीने बोलावण्यात आले आहे.
श्रावण मास म्हणजे हिंदू धर्मातील पवित्र महिना,श्रावणी सोमवार च्या शेवटच्या सोमवारी भगवान महादेवाची आराधना करून त्यांचा आशीर्वाद घेण्याचा हा सुवर्णकाळ असतो.याच अनुषंगाने गेल्या अनेक वर्षांपासून पुणे महानगरपालिका शासन नियुक्त सदस्य शांताराम कटके आणि माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चनाताई कटके, ज्येष्ठ नागरिक संघाचे राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब सातव यांच्या माध्यमातून महाकावड यात्रा समारंभ मोठ्या उत्साहात साजरा केला.
रावेर शहर आणि परिसरात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पावसामुळे नागझिरी नदीला पूर आला असून, यामुळे अजंदे गावाचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटला आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.रात्री सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील नाले आणि गटारे तुंबली आहेत.
लेंडी धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ व ढगफुटी ,अतिवृष्टीमुळे लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी, लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे मुखेड तालुक्यातील काही गावांमध्ये नदीचं पाणी घुसले आहे. पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, भिंगेली , हासनाळ या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्यास राहत असल्यामुळे, पुराच्या पाण्यात अडकुण पडले होते,त्यातील काही नागरिकांना काढण्यात एसडीआरएफ जवानांना यश आले आहे,मुखेड तालुक्यातील
रावनगाव येथे अंदाजे 225 नागरिक पाण्याच्या वेढयामध्ये अडकलेले होते , त्यातील काही नागरिकांना एसडीआरएफ च्या टीमकडून रेस्क्यू करण्यात आलेले आहे.7 ते 8 लोक झाडावर अडकले होते त्यांना देखील सुखरुप बाहेर काढण्यात यश आल आहे, मजदीवर 4 नागरीक अडकलेले त्यांचा शोध घेऊन रेस्क्यू करण्यात आल आहे,
खराब हवामान,धुकं आणि पावसामुळे हेलिकॉप्टर दौरा रद्द
एकनाथ शिंदे सहपत्नी भिमाशंकरला बायरोड जाणार..
सततचा पाऊस आणि धुकं पाऊसामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौ-यात बदल दुपारी असणा-या दौ-यात बदल झाल्याने एकनाथ शिंदे संध्याकाळी भिमाशंकरला दाखल होणार
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी मध्य वेतना धरण हा तिसऱ्यांदा ओव्हर फ्लो झाला आहे या धरणाचा एक दरवाजा 10 सेंटिमीटर ने उघडण्यात आला असून यातून कमी प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून कधी रिमझिम तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने डोंगरावरून वाहाणारे झरे पुन्हा एकदा वाहू लागल्याने याचा पाणी मध्य वैतरणा धरणच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येत असल्याने वाढ झाल्याने धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने धरणाचे दोन दरवाजे उघडले गेले आहेत. या मधून 353 क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस
पावसामुळे अनेक सखल भागात साचले पाणी
पश्चिम रेल्वेच्या माटुंगा आणि माहीम रेल्वे स्थानका दरन्यान रुळावर साचले पाणी
मुंबईत आज झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना अर्धा दिवस सुटी देण्यात आली. मात्र दुपारी माटुंगा पोलिस ठाण्याजवळ डॉन बॉस्को शाळेची बस पाण्यात अडकली. या बसमध्ये सहा लहान मुले, दोन महिला कर्मचारी व चालक जवळपास एक तास अडकून पडले होते.
जागरूक नागरिकांनी ही माहिती डीसीपी झोन ४ रागसुधा आर. यांना कळवल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पवार व माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. केवळ दोन मिनिटांत सर्वांना सुरक्षित बाहेर काढून पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
या प्रसंगानंतर मुलांना दिलेले बिस्कीट व पोलीस कर्मचाऱ्यांचे सांत्वन यामुळे त्यांची भीती दूर झाली. डीसीपी रागसुधा आर., वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पवार आणि माटुंगा पोलीस दलाच्या तात्काळ कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
० जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
० जोरदार पावसाचा म्हसळा तालुक्याला फटका
० म्हसळा बाजारपेठेत साचले पावसाचे पाणी
० म्हसळ्यातील ढोरजे पुल पाण्याखाली
दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प
कोल्हापूर-रत्नागिरीला जोडणारा महत्वाचा घाट
मुसळधार पाऊस आणि अपूर्ण कामाचा आंबा घाटाला फटका
ठेकेदार कंपनीकडून दरड बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु
वाहतूक पूर्ववत होण्यास काही कालावधी लागणार
नाशिक च्या सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री-शिर्डी महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो,त्यातच गुरारात मधून येणारी अवजड वाहतूक याच मार्गाने होत अडल्याने खड्ड्यामुळे वाहतूक ठप्प होत असल्याने माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येऊन खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले,जो पर्यंत रस्त्याचे काम होत नाही तो पर्यन्त आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा निर्धार करण्यात आला.
अंधेरी समवेत चार फुटापर्यंत भरले पाणी
उपनगरात सकाळपासूनच पावसाची संततधार
अनेक सखल भागात पाणी साचल्याने मुंबईकरांची तारांबळ
पश्चिम उपनगरातील जयप्रकाश रोड, वीरा देसाई रोड, नवरंग सिनेमा आधी भागात रस्त्यावर दोन ते तीन फुटापर्यंत पाणी
- देवळी तालुक्यातील कोटेश्वरची विदर्भाची काशी म्हणून ओळख
- वर्धा नदीच्या पश्चिम तीरावर हेमाडपंथी मंदिरात दूरवरून भाविक येतात दर्शनार्थ
- उत्तर वाहिनी नदी असल्याने भाविकांची येथे मोठी गर्दी असते
- वाशिष्ट ऋषीनी याठिकाणी शतकोटी यज्ञ केल्याची आहे मान्यता
- मंदिराशी पौराणिक मान्यता जुळल्या असल्याने मोठ्या संख्येत भक्त येतात दर्शनाला
- श्रावण सोमवारसोबतच सण, उत्सवांना भाविकांची मोठी गर्दी असते
- मंदिर परिसरात असलेले सौंदर्य नागरिकांना करतातं आकर्षित
घोरपडीतल्या म्हस्कोबा मंदिराजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांची केली तोडफोड
चार ते पाच गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती
रस्त्यावर पार केलेल्या गाड्यांची तोडफोड केल्याने नागरिक भयभीत
अधिक तपास मुंढवा पोलिस करत आहेत.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईकरांना झोडपले
मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर
मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश
सकाळच्या सत्रात आलेल्या विद्यार्थ्यांना ही सुखरूप घरी सोडण्याचे ही आदेश
बीड जिल्ह्यात रविवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून अनेक नद्या आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सिरसाळा पोलीस ठाणे हद्दीत साबला कवडगाव परिसरात मध्यरात्री 02 वाजता एक जीप पूराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली.
बुलढाणा जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्प 84.38 टक्के भरल्यानं तसेच सतत आवक होत असल्यानं प्रकल्पाची 9 द्वारं 30 सेंटी मीटर ने उघडून त्यातून पैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे .. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावाना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.. सध्या 9 हजार 689 कुसेक्स एवढा पाणी विसर्ग केला जात आहे...
आज पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत सोलापूर, सातारा, पुणे , कोल्हापूर, लातूर, बीड, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मागील तीन दिवसांपासून नवी मुंबईत मुसळधार पाऊस
नवी मुंबईला अक्षरशः पावसाने झोडपून काढलय
सकाळपासून पावसामुळे ढगाळ वातावरण
एमआयडीसी मधील काही सखल भागात पाणी साचलय
नवी मुंबई महापालिकेकडून अधिकचे पंप लावण्यात आलेत
सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांचे आणि कामावर जाणाऱ्या प्रवाश्यांचे मात्र हाल झाले
गणेशोत्सवाच्या कालावधीत पुणे शहरातील मध्यवर्ती पेठांमधील अनेक रस्ते वाहतुकीसाठी उत्पन्न असतात त्यामुळे शहराच्या पश्चिम भागातील उपनगरांना जोडणारा भिडे पूल दुचाकी वाहनांसाठी महत्त्वाचा ठरत आहे. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या सूचनेनुसार महा मेट्रो ने 20 ऑगस्ट पासून बाबा भिडे पुल २० दिवसांसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. महा मेट्रोकडून कडून सदाशिव पेठ ते डेक्कन मेट्रो स्थानक मार्गावरील भिडे पुलावरील पादचारी पुल उभारण्याचे काम सुरू आहे. हा पूल बंद असल्यामुळे मात्र पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. आगामी गणेशोत्सवाच्या काळात वाहनचालकांना त्रास होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पुढील वीस दिवसांसाठी हा पूल तात्पुरत्या स्वरूपात खुला करण्यात आला आहे..
आहे. दुपारच्या सुमारास पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे. पडणाऱ्या पावसामुळे कुठलीही जीवित हानी झालेली नाहीये. पावसाचा जोर अधिक वाढल्यास सखल भागात पाणी साचू शकणार आहे.
मुंबईच्या कांजूर विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस
एल बी एस मार्गावर पाणी
एलबीएस वरून ठाणे कडे जाणारी वाहतूक बंद
पाण्यात रिक्षा देखील बंद
रस्त्याला नदीचे स्वरूप
जालना जिल्ह्यात सर्वदूर काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याने ओढ्यांना नाल्यांना पूर आला आहे. जालना शहरात देखील काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळ शहरातील राजुर रोडवरील श्रीकृपा रेसिडेन्सी परिसरामध्ये रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल असून अनेक नागरिकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरला आहे त्यामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाल आहे. जालना जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने एकीकडे बळीराजा सुखावला आहे तर शेतात पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांची खरीपातील पिके देखील धोक्यात आले आहे...
वसई विरार मध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहरातील सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे विरार पश्चिमेकडील युनिटेक कॉम्प्लेक्स मध्ये 35 ते 40 इमारती असून या इमारतीच्या तळमजल्यावर प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले आहे.
सध्या पाऊस कमी असला तरी या सोसायटीतले पाणी जाण्याचे नाव घेत नाहीये कारण या सोसायटीमधील रस्ते सखल असून बाहेरच्या रस्त्यांची उंची वाढवल्याने हे पाणी जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पंचगंगेची पाणी पातळी २९ फुटांवर
राधानगरी धरणाचे सर्वच स्वयंचलित दरवाजे खुले
राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 29131 cusecs विसर्ग सुरू
पंचगंगा नदी इशारा पातळी 39'00" व धोका पातळी 43'00" फुट
पंचगंगा नदी पात्रातील एकूण 32 बंधारे पाण्याखाली
परभणीतील येलदरी प्रकल्पा बरोबरच सेलूच्या लोअर दुधना धरणातून ही पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय.लोअर दुधना ७०% भरले असुन सध्या धरण क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहे ज्यातुन २६३९ क्युसेक्स वेगाने पाणी दुधना नदीपात्रात सोडण्यात आले आहे.हा विसर्ग अजून वाढण्याची शक्यता असल्याने दुधना नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेला पोडसा पूल पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र-तेलंगणातून वाहतूक सुरु असते. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे वरुर -विरूर मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. वर्धा -वैनगंगा नदी काठावरील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात पाऊस नसला तरी वरच्या भागात झालेल्या पावसाने इकडे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत.
यवतमाळ व आदिलाबाद जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे इसापूर धरणाचे ९ व सातनाला धरणाचे ३ दरवाजे शनिवारी उघडण्यात आले. परिणामी पैनगंगा व वर्धा नदीला पूर येऊन चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात अनेक गावांना धोका निर्माण झाला आहे. धानोरा–भोयगाव पुलासह कोडशी बूज–कोरपना, गांधीनगर–तेजापूर, जेवरा–गाडेघाट आदी मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून शेतशिवार पाण्याखाली जाऊन कापूस, सोयाबीन व तुरीच्या पिकांना धोका निर्माण झाला आहे.
पुणे पोलीसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद केला आहे
कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ तीन मुलींपैकी दोन मुली, श्वेता पाटील आणि अन्य तीन अशा एकूण पाच जणांविरोधात पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला
कलम 132 अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पुण्यातील पोलीस आयुक्तालयात कोथरूड पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करा, या मागणीसाठी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पाच जणांनी आणि त्यांच्यासोबत सहकाऱ्यांनी रात्रभर ठिय्या मांडला होता
- शेवटच्या श्रावणी सोमवारीच त्र्यंबकेश्वरमध्ये भाविक संतप्त
- दर्शनावेळी महिला भविकांसोबत पुरुष सुरक्षारक्षक ग़ैरवर्तवणुक करत असल्याचा आरोप
- महाराष्ट्रासह परराज्यातून आलेल्या भाविकांकडून त्र्यम्बकेश्वर संस्थानच्या कारभाराविरोधात संताप व्यक्त
- भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये झाली बाचाबाची
- दोनच दिवसांपूर्वी भाविकांना मारहाण केल्याची घटना आली होती समोर
पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणारा अंधेरी सब वे देखील पाण्याखाली गेला असून साधारणपणे अडीच ते तीन फुटापर्यंत पाणी सव वेत साचल्यामुळे सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे अंधेरी सब वे परिसरातून आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी घेतलेला आढावा
अनेक जनावर दगावली, शेती पिकाचे मोठे नुकसान
रावणगाव येथे एनडीआरएफची टीम पोहोचली
पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू
एनडीआरएफ टीमच्या वतीने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू.
पुण्यात फसवणुकीचे विविध प्रकार दररोज समोर येत आहेत. आता पुण्यात एका महिलेला रेशन देण्याच्या नावाखाली तिची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने महिलेशी ओळख केली आणि एका कंपनी मध्ये असल्याचं भासवून रेशन आणि इतर वस्तू मिळतील अशी हमी या महिलेला दिली. "आमचे बॉस रेशन व इतर वस्तू देतील. तुम्ही माझ्या बरोबर चला" असं म्हणत त्या व्यक्तीने त्या महिलेला बायफ रोडला नेले. "तुम्हाला गरीब दाखवायचं आहे म्हणून दागिने काढून द्या" असे या व्यक्तीने त्या महिलेला सांगितले आणि तिच्याकडून दागिने स्वतःकडे घेतले आणि फरार झाला. हा सगळा प्रकार १४ ऑगस्ट रोजी पुण्यातील वाघोली भागात घडला असून त्याचा सी सी टिव्ही सुद्धा आता समोर आला आहे.
रायगड जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. काल हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिला होता तर आज पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. पावसाचा जोर कमी असला तरी अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. रस्त्यावर, सखल भागात पाणी साचले असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असली तरी धोकादायक परिस्थिती कुठेही नाही. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे
बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर व सिंदखेडराजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे.. सततधार पावसाने मेहेकर तालुक्यातिल् नागरिक हैराण झाले आहेत.. जानेफळ गावनाजिक खातोडी नदीला महापूर आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे त्यामुळे मेहेकर खामगाव राज्यमार्ग बंद झाला आहे सकाळपासून वाहतूक ठप्प झाली आहे, दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या असून पावसाचा जोर वाढतच आहे...
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सय्यदपूर हे गाव जालना लोकसभा मतदारसंघात येते. हे गाव जालन्याचे खासदार कल्याण काळे यांची सासुरवाटी देखील आहे. लाडसावंगी बाजारपेठेत येण्यासाठी दुधना नदीवर असलेला एकमेव मोठा फूल येथे नव्याने बांधण्यात येत आहे, तोपर्यंत गावात ये-जा करण्यासाठी तात्पुरता पूल एका गुत्तेदाराने बांधून दिला होता. मात्र, 19 जुलै रोजी झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसात हा पूल पूर्णतः वाहून गेला. त्यानंतर नागरिकांच्या आणि रुग्णांच्या हालअपेष्टांमुळे तो परत थातूरमातूर स्वरुपात उभारण्यात आला आणि वाहतूक सुरु करण्यात आली. पण 17 ऑगस्ट रोजी दुधना नदीच्या उगमस्थानी मुसळधार पावसामुळे रात्री दहा वाजता मोठा पूर आला. हा तात्पुरता पूल दुसऱ्यांदा वाहून गेला परिणामी, ग्रामस्थांनी पुढील वाहतुकीसाठी पीव्हीसी पाईपवर लाकडी फळ्या टाकून तात्पुरता रस्ता तयार केला आहे. मात्र, पुन्हा मोठा पूर आल्यास हा रस्ता पूर्णपणे वाहून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तातडीने दाखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
धाराशिव जिल्ह्यात गेली तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलय. जिल्ह्यातील 108 गावातील 38 हजार हेक्टर वरील पिकाचे या अतिवृष्टीमध्ये नुकसान झाले आहे.तर 53 जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याचा प्राथमिक अहवाल महसूल आणि कृषी विभागाने सादर केला आहे, जिल्ह्यात महत्त्वाचं असणार सोयाबीन पिकाच मोठ नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.
अंबरनाथच्या ग्रीन सिटी या सासायटीच्या आवारात आपल्या आई सोबत जाणाऱ्या एका चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ल्या केल्याची घटना घडली, या हल्ल्यात तो चिमुकला गंभीर जखमी झालाय ,सुदैवाने सोसायटीतील रहिवाशांनी तत्काळ धाव घेत त्या चिमुकल्याला त्या भटक्या कुत्र्याच्या तावडीतून सोडवलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली ,ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे, या घटनेने पुन्हा एकदा भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कोकणामध्ये मुसळधार याचा इशारा देण्यात आलाय. त्यानुसार कोकणातल्या बहुतांश भागात मध्यरात्रीपासून पाऊस आहे... किनारी भागांमध्ये देखील वाऱ्याचा वेग असून पाऊस जोराचा आहे... मध्यरात्री जोरदार बॅटिंग केलेल्या पावसाने पहाटेपासून देखील मुसळधार बरसायला सुरुवात केली आहे.
- 5 वर्षीय मंगेश केशव निनावे आणि 32 वर्षीय मनीष कुमार केशव निनावे अशी अटक करण्यात आलेल्या लिपिकांची नावे आहेत
- नागपुरातील दोन वेगवेगळ्या शाळेत या दोन्ही भावांची बनावट शालार्थ आयडीने नियुक्ती करण्यात आल्याचे चौकशीत समोर
- या अटकेनंतर बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 20 झाली आहे
- नागपूरच्या हुडकेश्वर येथील श्रावणजी वाटकर उच्च प्राथमिक शाळेत मंगेश निनावे याची कनिष्ठ लिपिकी पदावर मार्च 2023 मध्ये नियुक्ती झाली होती
- तर मनीष कुमार याची केशवनगर उच्च माध्यमिक शाळेत कनिष्ठ लिपिक पदावर जुलै 2019 मध्ये नियुक्ती झाली होती
- त्यांनी अधिकारी व दलालाच्या माध्यमातून बोगस शालार्थ आयडी तयार करून घेतला होता
आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार... यामुळे अनेक कावडधारी शिवभक्त नांदुरा - जळगाव जामोद दरम्यान असलेल्या पूर्णा नदीतील पवित्र जल घेण्यासाठी मानेगाव येथील धोकादायक पुलावर गर्दी करत आहेत. यातच अकोला, अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने पूर्णा नदीला महापूर आलेला आहे. महापुरातील पाणी घेण्यासाठी धोकादायक पद्धतीने पुलावर कावडधार्यांची गर्दी बघायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी बुलढाणा महसूल किंवा पोलीस प्रशासनाचा कुठलाही कर्मचारी हजर नसल्याने दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जाग होईल का..?असा सवाल उपस्थित राहत आहे.
वाशिमच्या उतावळी नदीला पुर आल्याने छत्रपती संभाजीनगर ते नागपूर या जुन्या महामार्गावरची गेल्या एका तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. वाशिमच्या कुकसा, पिंपरी सरहद्द गावा जवळील पुलावरून उतावळी नदीचे पाणी वाहत असल्याने ही वाहतूक बंद झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनाच्या रांगा लागल्या आहेत. समृद्धी महामार्गावर वाहणारे सर्व पाणी उतावळी नदीत प्रवाहीत करण्यात आले आहे. त्यामुळे उतावळी नदीला नेहमीच पूर परिस्थिती निर्माण होत आहे.
राज्यामध्ये सर्व दूर पावसाने धुमाकूळ घातला असून बीड जिल्ह्यामध्ये गेल्या पाच दिवसापासून पावसाने हाहाकार माजवला आहे.जोरदार पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आला असून माजलगाव च्या सरस्वती नदीला पूर आला आहे.माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदी सिमरी पारगाव, उंब्री,जिवणापूर,मोगरा,डाके पिंपरी ,आनदगाव ,साळेगांव कोथाळा ते पोहणेर रस्ता बंद माजलगाव ते मोगरा रस्ता बंद खडकी नदिवर फुल वाहुन गेला आहे.
जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तलावाचे स्वरूप आला असून यामध्ये कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असून कपाशी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे कपाशी पिकांना अचानक माना टाकले आहेत या मध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात सुद्धा पुण्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची विश्रांती
गेल्या वर्षीच्या तुलनेत पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात ७ टक्के कमी पाणीसाठा
ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वरुणराजा ची पुणे जिल्ह्यात विश्रांती
पुण्यातील चार ही धरणे मिळून एकूण ९० टक्के पाणीसाठा
कुठल्या धरणात किती पाणीसाठा
खडकवासला: ५३.१२ टक्के
पानशेत: ९२.६८ टक्के
वरसगाव: ९२.३७
टेमघर: ९५.९५
बाधित शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी शनिवारी पुण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन मोबदला वाढवावा आणि पुनर्वसनाची हमी द्यावी, अशी मागणी केली.
साखर संकुलात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीही उपस्थित होते.
या प्रकल्पासाठी सात गावांतील जमिनी संपादित होणार असून, १३ हजार ३०० खातेदारांपैकी २,४७१ जणांनी हरकती नोंदवल्या आहेत. काही शेतकरी स्वेच्छेने जमीन द्यायला तयार असले तरी मोबदला अपुरा असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.
सरकारकडून एरोसिटीमध्ये डेव्हलप प्लॉट देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे, मात्र त्याबाबत संभ्रम आहे.
पवार यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी लवकरच चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
राज्य सरकारने जूनअखेर दारूवरील उत्पादन शुल्क वाढवल्यानंतर परिणाम
उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यात ४.९१ लाख लिटर, अहिल्यानगरमध्ये ३० हजार आणि सोलापूरमध्ये २.६७ लाख लिटर विक्री कमी झाली
जूनमध्ये विभागात देशी दारू ३२.९२ लाख, विदेशी दारू ४६.२४ लाख आणि बिअर ५४.५६ लाख लिटर विकली गेली
मात्र जुलैमध्ये अनुक्रमे १४ हजार, ३.१२ लाख आणि १.६५ लाख लिटरने घट झाली
बिअर आणि विदेशी दारूला सर्वाधिक फटका बसल्याची माहिती
शुल्कवाढ, श्रावणातील उपास, तसेच काही दिवस पुरवठा ठप्प राहिल्याने ही घट झाल्याचे कारण समोर आले असून, व्यापारी वर्गात सुद्धा चिंता
मुंबई - बेंगलोर महामार्गवर प्रवासी बसला आग
ही घटना रात्री २ वाजता पुण्यातील नऱ्हे भागात घडली
एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसला भीषण आग
पुणे व पीएमआरडीकडील अग्निशमन दलाकडून सदर बसला लागलेल्या आगीवर नियंत्रण
सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठी दुर्घटना टळली
अकोल्यात ट्रॅक्टर पलटी झाल्याने अपघात होत तब्बल 17 शिवभक्त जखमी झालेये.. गांधीग्राम येथून कावड आणण्यासाठी हे शिवभक्त ट्रॅक्टर द्वारे जात होते.. अचानकपणे वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा ट्रॅक्टर पलटी झालाय.. यात 17 जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आज संपुर्ण अकोला शहर हर-हर महादेव, बम-बम भोले'च्याच्या गजरानं दुमदुमून जाणार आहेये, अशातच आता कावड यात्रापूर्वी डाबकी रोड वासी या कावडमधील शिवभक्तांच्या वाहनांचा अपघात झाला आहे.
पनवेल विधानसभेत तब्बल ८५ हजार दुबार मतदार असल्याचा गंभीर आरोप शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला आहे. याबाबत हायकोर्टात जुलै २०२४ ला रिटपिटीशन दाखल केले होते.
हाय कोर्टाने सुनावणी घेत दुबार मतदारांची नावे वगळण्याचे आदेश दिला होते. मात्र यानंतरही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा करीत नावे वगळली नाहीत. पनवेल विधानसभा मतदार संघांतील मतदारांची नावे ऐरोली , बेलापूर , उरण या बाजूला असलेल्या विधानसभा मतदार संघात आढळली आहेत. दरम्यान पनवेल विधानसभेत ११ हजार ५०० लोकांनी एकाच मतदार संघात दोनदा मतदान केल्याची नोंद आढळली असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने समोर आणले आहे.
भंडाऱ्यात सर्वदूर मुसळधार पावसानं हजेरी लावली. साकोली येथील आठवडी बाजार असल्यानं दुपारी भाजी विक्रेत्यांनी दुकानं सजवली होती. सायंकाळी आलेल्या मुसळधार पावसानं भाजी विक्रेत्यांनी सजविलेल्या दुकानातील भाजीपाला अक्षरश: पावसात वाहून गेला. साकोली येथील मुख्य मार्गालगत आठवडी बाजार भरतो. सखल भाग असल्यानं मुसळधार पावसाचं पाणी तिथून वाहू लागलं, आणि त्यातचं हा भाजीपाला वाहत असल्यानं भाजीविक्रेत्यांना वाहून जाणारा भाजीपाला वाचविताना चांगलीच कसरत करावी लागली. किंबहुना यात अनेक भाजी विक्रेत्यांचा वाहून जाणार भाजीपाला पडताना कसरत करावी लागली. भाजीपाला वाहून गेल्यानं विक्रेत्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मध्ये भाविकांनी प्रभू शिव शंकराच्या दर्शनासाठी सकाळपासून मोठी गर्दी केली होती शासकीय महापूजा आटोपल्यानंतर हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते दरम्यान पोलीस प्रशासन व मंदिर समितीच्या वतीने मंदिर परिसरात भाविकांच्या सेवेसाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती .
धाराशिव मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेला तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला.भारतीय जनता पार्टी कडून प्रकल्पातील पाण्याचे जलपूजनच करण्यात आलं.भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी विधिवत पूजा करत जलपूजन केलं. तेरणा प्रकल्प भरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच धाराशिवसह तेर, ढोकी या गावांचा पाणी प्रश्नही मिटणार आहे.
यवतमाळच्या पुसद येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज १३ प्रयोगशील शेतकरी व दोन कृषी शास्त्रज्ञांना वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात दुपारी १.३० वाजता सन्मान सोहळा पार पडणार आहे.प्रमुख अतिथी म्हणून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पालकमंत्री संजय राठोड, मंत्री डॉ अशोक उईके राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे उपस्थित राहणार आहे.
बुलढाणा शहरवासीयांना पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थाण राज्य स्तर योजनेचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचा अल्टीमेटम आमदार संजय गायकवाड व नगरपालिकेकडून संबंधित कंत्राटदाराला देण्यात आला आहेत.. पाईपलाईनच्या पाच टप्प्यापैकी चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून ठीक ठिकाणी खोदलेल्या ठिकाणी काँक्रीट पॅचेस मारणे सुरू असून पाणीपुरवठा करणाऱ्या नवीन पाइपलाइनची टेस्टिंग देखील सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण योजनेत तब्बल 170 किलोमीटरची पाईपलाईन टाकून शहराला पाणीपुरवठा केला जाणार आहे.. त्यामुळे दिवाळीपूर्वीच बुलढाणा शहर वासियांना नियमित गोड पाण्याचा पुरवठा करून दिवाळी गोड केली जाणार आहे..
तामसा ते हिमायतनगर या महामार्गावरील आष्टी गावाजवळ काही महिन्यापूर्वी मोठ्या पुलाच्या बाजूला छोटा पूल उभारण्यात आला होता. तीन दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पुरामुळे हा पूल दोन दिवसांपूर्वी खचला आहे.त्यामुळे महामार्गावर जात असताना दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्या सोबत असलेलं लहान मुलं किरकोळ जखमी झाले आहे.गंभीर जखमी झालेल्या महिलेवर आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाला असताना कळमनुरी शहरात पालिकेच्या बेजबाबदारपणामुळे आदिवासी प्रकल्प कार्यालय परिसरात कळमनुरी शहरातील नाल्यांचे पाणी शिरल्याने कर्मचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली होती, कार्यालयाच्या प्रांगणात कमरे एवढं पाणी असल्याने कार्यालयात जायचे कसे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर पडला होता.
शेवटचा श्रावण सोमवार असल्याने वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी शिवभक्तांची मोठी गर्दी
बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी देशभरातून शिवभक्त दाखल
बारावे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराचे दर्शन केल्यानंतरच ज्योतिर्लिंग परिक्रमा होते पूर्ण अशी आख्यायिका
आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्यामुळे देशभरातून आलेल्या भाविकांची मंदिरामध्ये मध्यरात्रीपासूनच मोठी गर्दी
जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडतो आहे. बदनापूर तालुक्यातील गेवराई बाजार गावात आणि परिसरामध्ये रात्री जोरदार पाऊस पडला आहे.या पावसाळे परिसरातील ओढ्याना पूर आला आहे.तर काही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहे. मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याला लाखो रुपयाचा आर्थिक फटका बसणार आहे. जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरिपातील पिकाची अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे..
धाराशिव मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेला तेरणा प्रकल्प ओव्हरफ्लो झाला.भारतीय जनता पार्टी कडून प्रकल्पातील पाण्याचे जलपूजनच करण्यात आलं.भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी विधिवत पूजा करत जलपूजन केलं. तेरणा प्रकल्प भरल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच धाराशिवसह तेर, ढोकी या गावांचा पाणी प्रश्नही मिटणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.