उभं राहून पाणी पिण्याने गुडघ्यांना त्रास होत नाही.
गुडघ्यांच्या समस्येचे मुख्य कारण वजन आहे.
बसून पाणी प्यायल्याने पचन सुधारते.
बाहेरून आल्यानंतर अनेकदा आपण कोणताही विचार न करता पटकन उभं राहूनचं पाणी पितो. मात्र उभं राहून पाणी पिणं योग्य आहे का? आपल्या घरात किंवा आसपास अनेकदा विविध गोष्टी ऐकायला मिळतात. त्यातच एक गोष्ट म्हणजे उभं राहून पाणी प्यायलं तर गुडघ्यांना त्रास होतो. पण खरंच यात किती तथ्य आहे आणि किती गैरसमज? चला जाणून घेऊया.
वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास, उभं राहून पाणी पिण्याचा गुडघ्यांवर थेट काहीही वाईट परिणाम होत नाही. या सवयीमुळे संधिवात किंवा हाडांशी संबंधित आजार होतात असं कोणत्याही अभ्यासात सिद्ध झालेलं नाही.
गुडघ्यांना त्रास होण्याचं खरं कारण पाणी उभं राहून पिणं नसून वाढलेलं वजन, शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता आणि हाडांची ताकद कमी होणं हे असतं. यामुळे हळूहळू गुडघ्यांवर ताण येतो.
उभं राहून पाणी प्यायल्यास पाणी पटकन पोटात जातं ज्यामुळे पचनसंस्थेवर थोडासा ताण पडू शकतो. उलट, बसून पाणी प्यायल्यास शरीर आरामात असतं आणि पाणी हळूहळू जातं. त्यामुळे पचन सुधारतं आणि पोषणद्रव्यांचे मिश्रण अधिक चांगलं होतं.
आजवर झालेल्या वैज्ञानिक संशोधनात उभं राहून पाणी प्यायल्याने गुडघ्यांना थेट त्रास होतो, असा कोणताही पुरावा आढळलेला नाही. त्यामुळे संधिवातासारख्या आजाराशी या सवयीचा काहीही संबंध नाही.
सतत उभं राहून काम करणं, जड वस्तू उचलणं किंवा चुकीच्या पद्धतीने शरीरावर ताण येणं यामुळे गुडघ्यांच्या समस्या वाढतात. पण त्याचा उभं राहून पाणी पिण्याशी थेट काहीही संबंध नाही.
उभं राहून पाणी पिण्याने गुडघ्यांना त्रास होतो का?
नाही, वैज्ञानिक दृष्टीने असा कोणताही पुरावा नाही.
गुडघ्यांच्या त्रासाचे खरे कारण काय आहे?
वाढलेले वजन, जीवनसत्त्वांची कमतरता आणि हाडांची कमकुवतपणा.
पाणी पिण्याच्या स्थितीचा पचनावर काय परिणाम होतो?
बसून पाणी प्यायल्याने पचन सुधारते.
उभं राहून पाणी पिणे पचनासाठी का हानिकारक ठरू शकते?
पाणी पटकन पोटात जाऊन पचनसंस्थेवर ताण येतो.
गुडघ्यांना घातक कोणत्या सवयी आहेत?
सतत उभे राहणे, जड वस्तू उचलणे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.