दररोज दोन ते चार कप चहा लिव्हरसाठी सुरक्षित आहे.
रिकाम्या पोटी गडद चहा घेणे टाळावे.
नाश्त्यासोबत चहा घेतल्यास लिव्हरवरील ताण कमी होतो.
सकाळची सुरुवात नेहमी चहाच्या एका घोटाने होते. अनेकांना दिवसात १० ते १२ चहा हवाच असतो. पण तुम्हाला माहितीये का? चहा पिण्याची सवय तुम्हाला एका गंभीर समस्येला सामोरं जायला भाग पाडते. याचा थेट परिणाम तुमच्या लिव्हरवर होत असतो. तज्ज्ञांनी याबद्दल काही महत्वाचे सल्ले आणि आजाराबद्दल सांगितले आहे. जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
BMC Nutrition या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या रिसर्चमध्ये चहा पिण्याची पद्धत आणि प्रमाणानुसार लिव्हर एन्झाइम्समध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास केला गेला. या संशोधनात काही चांगले परिणाम आढळले असले तरी अतिरेकी किंवा चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या चहामुळे उलट परिणाम होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.
चहातील पॉलीफिनॉल्स (polyphenols) आणि कॅटेचिन्स (catechins) या घटकांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणात असतात. हे घटक लिव्हरच्या पेशींना ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात आणि शरीरातील एन्झाइम्सची कार्यक्षमता टिकवण्याचं काम करतात. दररोज प्रमाणात म्हणजे दोन ते चार कप चहा घेणाऱ्यांमध्ये लिव्हरचे एन्झाइम्स ALT (Alanine Aminotransferase) आणि AST (Aspartate Aminotransferase) हे संतुलित पातळीवर राहतात.
या अभ्यासात 6,000 हून जास्त ३५ वयोगटाच्या व्यक्तींचा सहभाग होता. ज्यांनी दररोज 2 ते 4 कप चहा घेतला, त्यांचे लिव्हरचे कार्य व्यवस्थित काम करताना आढळलं. तर जे लोक 5 पेक्षा जास्त कप घेत होते किंवा अजिबात चहा घेत नव्हते, त्यांच्यात लिव्हर एन्झाइम्सचे प्रमाण असंतुलित दिसले. विशेष म्हणजे, चहा जेवणासोबत घेतल्यास लिव्हरवरील ताण कमी होतो, कारण अन्नामुळे कॅफिन आणि कॅटेचिन्सचे शोषण हळूहळू होते.
याउलट, रिकाम्या पोटी गडद चहा घेणाऱ्यांमध्ये लिव्हर एन्झाइम्सची पातळी वाढलेली दिसून आली. संशोधकांच्या मते, यामुळे अचानक कॅफिन आणि इतर सक्रिय घटकांचे प्रमाण शरीरात वाढते आणि लिव्हरवर तात्पुरता ताण येतो. त्यामुळे जमेल तितका चहा टाळणे हा शरीरासाठी घेतलेला मोठा निर्णय असू शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.