Gum Bleeding Causes saam tv
लाईफस्टाईल

Bleeding Gums: दात घासताना हिरड्यांतून रक्त येतंय? दुर्लक्ष करू नका; असू शकते गंभीर समस्येची सुरुवात

Gum Bleeding Causes: हिरड्यांतून रक्त येणं, दुर्गंधी, सूज आणि दातांची संवेदनशीलता ही हिरड्यांच्या आजाराची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. योग्य दंत स्वच्छता, संतुलित आहार आणि वेळेवर उपचार केल्यास गंभीर समस्या टाळता येऊ शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

तुमच्या दातांमधून रक्त येतं का? रक्तस्त्रावासोबत दुर्गंधी येतं का? तसं असल्यास हे तुमच्या हिरड्यांमधील समस्येचं लक्षण असू शकतं. रक्तस्त्राव ही केवळ एक किरकोळ समस्या नाही हे अनेकदा हिरड्यांच्या आजारांचं सुरुवातीचं लक्षण असतं. बरेच लोक याकडे दुर्लक्ष करतात परंतु हे तुमच्या हिरड्यांना सूज आल्याचं किंवा संसर्ग झाल्याचं लक्षण आहे. लक्ष न दिल्यास ही समस्या हळूहळू गंभीर होऊ शकते आणि तुमचे दात कमकुवत करू शकते.

हिरड्यांना सूज आणि प्लाक जमा होण्याची कारणं

हिरड्यांमधून रक्त येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे हिरड्यांना आलेली सूज. हे तेव्हा घडतं ज्यावेळी तुमच्या दातांवर प्लाक आणि बॅक्टेरियाचा थर जमा होतो. जर हा थर दररोज व्यवस्थित स्वच्छ केला नाही तर त्यामुळे सूज आणि रक्तस्त्राव होऊ शकतो. सुरुवातीला हे फक्त दात घासतानाच लक्षात येतं. परंतु हळूहळू ब्रश न करताही रक्तस्त्राव होऊ शकतो.

दातातून रक्त येण्याची कारणं-

  • चुकीच्या पद्धतीने ब्रश करणं

  • अतिशय कडक ब्रश वापरणं

  • दातांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं

  • व्हिटॅमिन सी आणि के ची कमतरता

  • धूम्रपान

  • मधुमेह आणि हार्मोनल बदल

दातांमधून वारंवार रक्त येत असेल तर या लक्षणंकडे दुर्लक्ष करू नका

ही सर्व चिन्हं हिरड्यांचं इन्फेक्शन वाढत असल्याचं दर्शवतात आणि त्यावर त्वरित लक्ष देणं आवश्यक आहे.

आहार आणि जीवनशैलीत बदल करा

याव्यतिरिक्त, योग्य आहार आणि जीवनशैलीने दातांच्या समस्या कमी करता येतात. आपल्या आहारात व्हिटॅमिन सी आणि के ने समृद्ध असलेले पदार्थ जसं की, संत्री, पेरू, लिंबू आणि हिरव्या भाज्या यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. यामुळे हिरड्या मजबूत होतात. धूम्रपान आणि तंबाखूमुळे हिरड्या कमकुवत होतात ज्यामुळे रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT