World AIDS Day Google
लाईफस्टाईल

World Aids Day 2024: HIV आणि Aids मधील फरक तुम्हाला माहितीये का? एड्सची सुरुवातीला काय लक्षणं दिसतात, पाहा

World Aids Day 2024: दरवर्षी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून मानला जातो. आज या दिवसाच्या निमित्ताने तुम्हाला एचआयव्ही आणि एड्समधील सामान्य फरक याशिवाय शरीरात दिसणाऱ्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल माहिती देणार आहोत.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या समाजात असे काही आजार आहेत ज्यांच्या बाबत अजून जनजागृती होण्याची फार गरज आहे. यातील एक आजार म्हणजे एड्स. दरवर्षी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून मानला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने यंदाच्या जागतिक एड्स दिनानिमित्त 'योग्य मार्ग निवडा: माझं आरोग्य, माझा हक्क!' अशी थीम स्वीकारली आहे.

आज या दिवसाच्या निमित्ताने तुम्हाला एचआयव्ही आणि एड्समधील सामान्य फरक याशिवाय शरीरात दिसणाऱ्या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल माहिती देणार आहोत. जर ही लक्षणं एखाद्यामध्ये दिसू लागली तर त्याने ताबडतोब स्वतःची तपासणी करून घेणं फायदेशीर आहे. जेणेकरून वेळेवर निदान आणि उपचारांच्या मदतीने आपण सामान्य जीवन जगू शकता.

HIV आणि Aids मध्ये नेमका फरक काय?

HIV म्हणजे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. हा एक व्हायरस आहे जो शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. त्याच वेळी, एड्स म्हणजे ऍक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. जो एचआयव्ही संसर्गाच्या शेवटच्या टप्प्यात होतो. एचआयव्हीचे पहिले दोन टप्पे म्हणजे अक्युट एचआयव्ही संसर्ग आणि क्रॉनिक एचआयव्ही संसर्ग.

Aids ची लक्षणं काय दिसून येतात?

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला एड्स होतो तेव्हा इन्फ्लूएंझा सारख्या रोगाची लक्षणं दिसून येतात. या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, शरीरावर पुरळ येणं आणि घसा खवखवणं यांसारख्या समस्यांचा समावेश होतो. एड्समुळे तुमची इम्युनिटी शक्ती कमकुवत होते. अशा स्थितीत तुम्हाला लिम्फ नोड्सना सुज येणं, अस्पष्ट वजन कमी होणं, ताप, अतिसार आणि खोकला ही लक्षणंही दिसून येतात.

दुर्लक्ष करू नये

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या सांगण्यानुसार, एड्सच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून वेळेवर उपचार न घेतल्याने अनेक गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. यामध्ये क्षयरोग (टीबी), क्रिप्टोकोकल मेनिन्जाइटिस, गंभीर बॅक्टेरियर इन्फेक्सन आणि लिम्फोमा आणि कपोसी सारकोमा यांसारख्या कॅन्सरचा समावेश आहे. वेळेवर उपचार न केल्यास एचआयव्हीमुळे हेपेटायटीस सी, हेपेटायटीस बी हे इन्फेक्शन देखील होऊ शकतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT