भारतात लहान मुलांसाठी आली 14-व्हॅलेंट न्यूमोकोकल व्हॅक्सिन, कसा होणार याचा परिणाम पाहा

हेल्थकेअर कंपनी अॅबॉटने न्यूमोशील्ड १४ (PneumoShield 14) ही ६ आठवड्यांवरील वयाच्या मुलांसाठीची न्युमोकोक्कल कॉन्ज्युगेट व्हॅक्सिन बाजारात दाखल केल्याची घोषणा केलीये.
vaccine
vaccine
Published On

हेल्थकेअर कंपनी अ‍ॅबॉटने एक नवी लस आणली आहे. ६ आठवड्यांवरील वयाच्या मुलांसाठीची न्युमोकोक्कल कॉन्ज्युगेट व्हॅक्सिन बाजारात आणली असून ही लस अधिक व्यापक संरक्षण पुरवणारी असल्याचा दावा करण्यात येतोय.

जागतिक स्तरावरील अग्रगण्य हेल्थकेअर कंपनी अॅबॉटने न्यूमोशील्ड १४ (PneumoShield 14) ही ६ आठवड्यांवरील वयाच्या मुलांसाठीची न्युमोकोक्कल कॉन्ज्युगेट व्हॅक्सिन बाजारात दाखल केल्याची घोषणा केलीये. हे व्हॅक्सिन सध्या दिल्या जाणाऱ्या PCV-10 आणि PCV-13 या लसींच्या तुलनेत जास्त संरक्षण पुरवणारी आहे. त्याचप्रमाणे सर्वाधिक सिरोटाइप्स किंवा स्ट्रेन्ससाठी परिणामकारक ठरणारी असल्याचंही म्हटलंय.

न्युमोकॉक्कल संसर्ग

पाच वर्षांखालील विशेषत: दोन वर्षे आणि त्याहून कमी वयाच्या मुलांना न्युमोकॉक्कल आजाराचा धोका अधिक असतो. हे इन्फेक्शन बॅक्टेरियामुळे होतं. न्युमोकॉक्कल संसर्गांची परिणती न्युमोनिया, मेनेन्जायटिस (मेंदू व मेरुरज्जू अर्थात स्पायनल कॉर्डच्या अवतीभोवतीच्या उतींना सूज येणे), किंवा रक्तातील संसर्ग अशा अनेक प्रकारच्या स्थितींमध्ये होऊ शकतो, यांना एकत्रितपणे इनव्हेजिव्ह न्युमोकॉक्कल डिजिज (IPD) असं म्हटलं जातं ही लस दिल्याने मुलांना यापैकी काही संसर्गांपासून संरक्षण मिळू शकतं

vaccine
Steel vs Aluminum For Tea: स्टील की ॲल्युमिनियम? कोणत्या भांड्यात चहा बनवणं आरोग्यासाठी ठरतं धोकादायक?

व्हॅक्सिन

IPD गटातील आजार हे पाच वर्षांखालील मुलांमधील उच्च मृत्यूच्या दरास कारणीभूत असून भारतामध्ये १४ टक्‍के मृत्यू या आजारांमुळे होत असल्याचं समोर आलं आहे. PCV-14 व्हॅक्सिन सध्या भारतातील खासगी क्लिनिक्स आणि रूग्णालयातून वापरल्या जाणाऱ्या PCV10 च्या तुलनेत आणखी पाच स्ट्रेन्सविरोधात आण PCV13 च्या तुलनेत आणखी दोन स्ट्रेन्सच्या विरोधात संरक्षण पुरवू शकते. लसीकरण वेळापत्रकानुसार ही लस ६व्या, १०व्या आणि १४ आठवड्यात दिली जावी.

vaccine
पित्ताशय काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केव्हा करावी? तज्ज्ञांनी सांगितली दिली योग्य माहिती

अॅबॉट इंडियाच्या मॅनेजिंग डायरेक्टर स्वाती दलाल यांनी सांगितलं की, “मुलांना खासकरून विशेषत: दोन वर्षांहून कमी वयाच्या मुलांना न्यूमोकॉक्कल आजारांचा धोका जास्त असतो. यामुळे त्यांच्या निरोगी वाढीमध्ये आणि विकासामध्ये बाधा येऊ शकते. हे नवं संशोधन सध्या इन्फेक्टेड होत असलेल्या १४ न्युमोकॉक्कल स्ट्रेन्सपासून जास्त संरक्षण पुरवते. याशिवाय हे स्ट्रेन भारतातील बहुतांश न्युमोकॉक्कल संबंधित आजारांना कारणीभूत ठरणारंही आहे.

vaccine
Breast cancer : २० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर धोका? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

मुंबईतील येवाले रूग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. विजय येवाले यांनी सांगितलं की, “लसीकरणामुळे मुलांमध्ये विशेषत्वाने आढळून येणाऱ्या न्युमोनिया, मॅनेन्यायटिससारख्या न्युमोकॉक्कल-संबंधी आजारांशी लढून त्यांना परतवून लावणारा एक महत्त्वाचा संरक्षणात्मक उपाय मिळतो. या आजाराच्या निदान आणि उपचारांतील चॅलेंजेस लक्षात घेता न्युमोकॉक्कल बॅक्टेरिया स्ट्रेन्सच्या समूहाला सामावून घेणाऱ्या प्रगत लसींची गरज आहे.

vaccine
सावधान! हिवाळ्यात Vitamin D ची कमतरता तुमच्या हाडांना बनवतेय खिळखिळं? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

न्युमोकॉक्कल व्हॅक्सिन देशातील बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा भाग आहे. लस योग्य वेळी दिली जात असल्याची खातरजमा करण्यासाठी डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com