

वंदे भारत एक्स्प्रेसच्या स्लीपर ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल
चेअर कार आसन व्यवस्थेनंतर स्लीपर ट्रेन लवकरच लोकांच्या सेवेत येणार
वंदे भारत स्लीपर ट्रेनचा व्हिडिओ वेधतोय अनेकांचं लक्ष
वंदे भारत एक्स्प्रेस भारतात सुरु झाली, तेव्हापासून वंदे भारत ट्रेनचा प्रवाशांना सुखद अनुभव मिळत आहे. वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये केवळ चेअर कार आसन व्यवस्था उपलब्ध होती. आता या ट्रेनचा 'स्लीपर व्हर्जन' देखील तयार झाला आहे. याच वंदे भारत स्लीपर ट्रेनचा एक व्हिडिओ अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
वंदे भारतच्या स्लीपर ट्रेनमध्ये झोपण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. १८० किमी वेगाने धावणाऱ्या ट्रेनचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनेकांची प्रवास करण्याची उत्सुकता वाढली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनची सवाई माधोपूर-कोटा-नागदा या भागात ट्रायल झाली. या ट्रेनचा एक व्हिडिओ लोको पायलटच्या केबिनमधून कैद करण्यात आला. व्हायरल होणारा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. या वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
वंदे भारत स्लीपर ट्रेनची ट्रायल सुरु होती. त्यावेळी लोको पायलटच्या केबिनमध्ये एक कर्मचारी व्हिडिओ तयार करत होता. ट्रेन कॅबिनमध्ये स्पीडोमीटरसमोर पाण्याचे तीन ग्लास ठेवले होते. तिन्ही ग्लासमध्ये पाणी होतं. ही ट्रेन १८० किमी वेगाने धावत असताना ग्लासमधील पाण्याचा एक थेंबही सांडला नाही. या ट्रेनचा वेग स्पीडोमीटरमध्येही दिसत आहे.
व्हिडिओ तयार करताना ट्रेनचा वेग हा ताशी १८० किमी होता. यावेळी ट्रेनमधील तिन्ही ग्लासमधील पाण्याचा एकही थेंब सांडलं नाही. २७ सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आतपर्यंत या व्हिडिओला १ लाख ७० हजार व्ह्यूस मिळाले आहेत. तर ६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर यावर १५० हून अधिक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.