Lasun Shev Recipe: नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत अन् झणझणीत लसूण शेव, सोपी रेसिपी वाचा

Siddhi Hande

लसूण शेव

लसूण शेव ही प्रत्येकाच्या घरात असतेच. लसूण शेव ही लहान मुलांना खूप आवडते.

sev | yandex

घरी लसूण शेव कशी बनवायची?

ही लसूणी शेव तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात. कमी तेलकट आणि टेस्टी शेव बनवण्याची रेसिपी वाचा.

Lasun Shev Recipe | Google

लसूण पेस्ट बनवून घ्या

लसूण शेव बनवण्यासाठी सर्वात आधी खूप लसूण सोलून घ्या. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात लसूण, जिरे आणि ओवा बारीक करा.

Lasun Shev Recipe | Google

बेसन पीठ

यानंतर एका भांड्यात बेसन पीठ, थोडं तांदळाचं पीठ, तिखट, हळद टाकून मिक्स करा. यात लसूणची पेस्ट टाका.

Lasun Shev Recipe | Google

गरम तेल टाका

या मिश्रणात तुम्ही कडकडीत तापलेलं गरम तेल टाका. जेणेकरुन शेव कुरकुरीत होतील.

Lasun Shev Recipe | Google

कणीक मळून घ्या

यानंतर पीठात पाणी टाकून कणीक घट्ट मळून घ्या. कणिक जास्त पातळ नसावे.

Lasun Shev Recipe | Google

शेव बनवण्याचा साचा

यानंतर तुम्ही शेव बनवण्याचा साचा घ्या. त्याला आतून तेल लावा. त्यात हे पीठ टाका.

Lasun Shev Recipe | Google

तेल

एका बाजूला कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवा. तेल चांगलं गरम झाल्यावर त्यात शेव पाडा.

Lasun Shev Recipe | Google

शेव कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या

ही शेव दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. त्यानंतर शेव थंड झाल्यावर हवाबंद डब्ब्यात ठेवा.

Lasun Shev Recipe | Google

Next: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Masala Papad | Canva
येथे क्लिक करा