Manasvi Choudhary
ह़ॉटेलमध्ये सुरूवातीला स्टाटर म्हणून मसाला पापड खाण्याची मज्जा वेगळी आहे.
मात्र तुम्हाला माहितीये का? घरच्या घरी तुम्ही अत्यंक सोप्या पद्धतीने मसासा पापड बनवू शकता.
मसाला पापड बनवण्यासाठी पापड, मसाला, चाट मसाला, लिंबू, कांदा, कोथिंबीर आणि मीठ हे साहित्य एकत्र करा.
सर्वप्रथम तुम्हाला पापड भाजून घ्यायचा आहे नंतर त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मिश्रणात मिकस करा.
तुम्हाला हवा असल्यास मसाला पापड भाजून किंवा तळून दोन्ही प्रकारे करा.
चटपटीत मसाला पापड तयार झाल्यावर आवडीने त्यावर तुम्ही शेव देखील घालू शकता.