Makeup Hacks
Makeup Hacks  Saam Tv
लाईफस्टाईल

Makeup Hacks : तुम्हालाही मेकअप करण्याचा कंटाळा येतो? 'या' सोप्या टिप्स फॉलो करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Makeup Hacks : आपली त्वचा नैसर्गिक रित्या सुंदर दिसावे असे आपल्या सर्वांनाच वाटत असते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या त्वचेची खूप काळजी घेणे गरजेचे आहे. परंतू असे होऊ शकते की तुमच्याकडे त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ नाही.

तुम्हाला त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. फार कमी वेळात जास्ती मेहनत न करता त्वचेची काळजी कशी घ्यायची आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मल्टी-टास्किंग स्किन केअर प्रॉडक्ट वापरा -

त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी मार्केटमध्ये अनेक प्रकारचे प्रॉडक्ट (Product) उपलब्ध असतात पण बऱ्याच वेळा आपल्या आळसपणामुळे उत्पादनाची लेअरिंग करायची असते. त्यामुळे तुमची त्वचा तेवढी छान दिसत नाही अशा वेळेस मल्टी टास्किंग स्किन केअर प्रॉडक्ट चा वापर केला पाहिजे. बेबी किंवा सीसी क्रिमचा वापर तुम्ही करू शकता.

बेबी पावडर हॅक -

जर तुम्हाला केस धुण्याचा आळस येत असले तर तुम्ही हे हॅक वापरू शकता.त्यासाठी तुम्हा फक्त बेबी पावडर केसांच्या मुळापर्यंत शिंपडा आणि कंगवा फिरवा. त्यामुळे तुमचे केस न धुता ताजे टवटवीत दिसतील बेबी पावडर केसांमधील अतिरिक्त तेल काढून टाकते.

भरपूर पाणी प्या -

जास्ती पाणी पिल्याने तुमची त्वचा निरोगी राहते. तुम्ही खूप आळशी असाल आणि त्वचेच्या काळजी घेण्यासाठी तुम्हाला काही करण्याची इच्छा नसेल तर तुम्ही हे हॅक वापरू शकता यात तुम्हाला फक्त दिवसभर आठ ते दहा ग्लास पाणी प्यायचे आहे जास्त पाणी पिल्याने शरीराला आतून हायड्रेट करते आणि त्वचा नैसर्गिक रित्या छान दिसते. त्वचेसाठी वेगळा वेळ काढायची गरज तुम्हाला पडणार नाही.

गोठलेले वाटाणे वापरा -

बहुतेक भारतीय घरांच्या फ्रिजमध्ये मटार गोठलेले असतात. अशावेळी तुम्ही त्याचा वापर करून तुमच्या त्वचेच्या समस्या दूर करू शकता त्यासाठी तुम्हाला एक स्वच्छ आणि मऊ कापडात हे वाटणे गुंडाळून डोळ्यांना लावा त्यामुळे ते सुजन दूर होण्यास मदत मिळेल.

डोळ्याचे सुजन दूर करण्यासाठी तुम्ही बटाट्याचे स्लाईस फ्रिज करून वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला जास्ती मेहनत करायची गरज नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मुंबईतील खार दांडा परिसरात शिवसेना भाजपा कार्यकर्ते आमने-सामने

Delhi Metro: अगोदर बाचाबाची मग थेट हातच उचलला; मेट्रोमध्ये जोडप्याचं कडाक्याचं भांडण, VIDEO व्हायरल

Night Skin Care: मुलायम त्वचेसाठी रात्री झोपण्यापुर्वी करा 'या' गोष्टी

Rohit Pawar News | अजित पवारच नाटकं करतात, रोहित पवारांचा घणाघात

T-20 World Cup 2024: विराट,रोहितसह हे स्टार खेळाडू खेळणार आपला शेवटचा टी -२० वर्ल्डकप

SCROLL FOR NEXT