Makeup Hacks : तुमच्या हनीमून ट्रॅव्हल बॅगमध्ये हे मेकअप प्रॉडक्ट जरूर अॅड करा...

बाजारात जे नवीन मेकअप प्रॉडक्ट येईल ते आपण खरेदी करत असतो.
Makeup Hacks
Makeup Hacks Saam Tv
Published On

Makeup Hacks : मेकअप करायला आपल्या सगळ्यांनाच आवडतो. त्याचबरोबर बाजारात जे नवीन मेकअप प्रॉडक्ट येईल ते आपण खरेदी करत असतो. त्याचबरोबर जेव्हा आपण हनिमूनला जातो तेव्हा सेपरेट मेकअप बॅग तयार करतो.

अशातच मेकअपची गोष्ट असेल तर तुम्हाला कमीत कमी प्रॉडक्ट सोबत कॅरी करता यावे म्हणून आज आम्ही तुम्हाला काही प्रॉडक्ट विषयी सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जास्त सामान घेऊन जावे लागणार नाही.

तसं पाहायला गेलं तर आपल्याकडे मेकअप करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रॉडक्ट उपलब्ध असतात. परंतु हनिमूनला गेल्यावर तुम्हाला थोड्याच मेकअप प्रॉडक्टची गरज असते. जाणून घेते प्रॉडक्ट नेमके कोणते आहेत.

प्रायमर -

प्रायमर हे मेकअप मधील सर्वात महत्त्वाचे प्रॉडक्ट आहे. प्रायमर शिवाय तुमचा मेकअप अपूर्ण हे. मेकअप लॉंग लास्टिंग बनवण्यासाठी त्याचबरोबर ट्रॅव्हल करताना मेकअप टिकण्यासाठी सर्वात आधी प्रायमर वापरतात. म्हणून तुम्ही जय भवानी म्हणून ट्रॅव्हलला जात असाल तर तुम्ही कोणतेही हायड्रेटींग प्रायमर वापरू शकता.

कन्सीलर -

जास्त करून आपण कन्सिलरचे दोन ते चार शेड वापरतो, परंतु ट्रॅव्हल करताना तुम्हाला कमीत कमी प्रॉडक्ट स्वतः जवळ ठेवायला पाहिजे. कारण ट्रॅव्हलिंग करताना तुम्हाला कमीत कमी प्रॉडक्ट कॅरी करता येईल. त्याचबरोबर तुम्ही कन्सिलर घेतल तर, फाउंडेशन सोबत घ्यायची गरज नाही. तुम्ही फक्त कन्सिलर ने फाउंडेशनचे काम देखील करू शकता.

कॉम्पॅक्ट -

ट्रॅव्हल करताना तुम्ही लूज पावडरच्या ऐवजी लाईट वेट फॉर्मुला असणारा कॉम्पॅक्ट कॅरी करू शकता. त्याचबरोबर असा प्रयत्न करा की तुमच्या कॉम्पॅक्टला आरसा असेल. जेणेकरून तुम्ही आरामात तुमचा चेहरा आरशामध्ये पाहून कॉम्पॅक्ट करू शकता.

ब्लश आणि हायलाईटर -

ब्लश आणि हायलाईटर हे मेकअप मधील सर्वात महत्त्वाचे प्रॉडक्ट आहे. ब्लश आणि हायलाईटरने तुमचा मेकअप आणखीन खुलून दिसतो. अशातच तुम्ही एकाच पॅलेट मधील हायलाईटर आणि ब्लश निवडा. जेणेकरून ट्रॅव्हलिंग करताना तुम्हाला व्यवस्थित कार्य करता येईल.

लिपस्टिक -

लिपस्टिक आजकाल सगळेच लावतात. लिपस्टिक शिवाय आज कोणी बाहेर पडत नाही. मेकअप केला नाही तरी नुसती लिपस्टिक लावून देखील तुम्ही तुमचे सौंदर्य फुलवू शकता. लिपस्टिक साठी तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही लिपस्टिक कॅरी करू शकता. त्याचबरोबर लिपस्टिकचा वापर तुम्ही आय मेकअप करताना देखील वापरू शकता.

इतर टिप्स -

  • तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेकअपचे सामान घेऊन जा. त्याचबरोबर तुमच्या आऊटफिट नुसार मेकअप प्रॉडक्ट्स निवडा.

  • यासाठी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मेकअप लूकला आधीच डिसाईड करून ठेवा. कारण ऐन वेळेला तुमचा मेकअप प्रॉडक्ट घेण्यासाठी गोंधळ उडणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com