Drinking water while standing saam tv
लाईफस्टाईल

Drinking water: तुम्हीही उभं राहून पाणी पिता? आजच बदल ही सवय; ४ आरोग्य समस्या उद्भवू शकतात

Drinking water while standing: आपण अनेकदा घाईगडबडीत उभे राहून पाणी पितो. पण ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार, उभे राहून पाणी पिण्यामुळे शरीरावर नकारात्मक परिणाम होतात.

Surabhi Jayashree Jagdish

पाणी पिणं आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. डॉक्टर सुद्धा दिवसभरात पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला देतात. पाणी आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. ज्यामुळे अनेक आजार आपल्या मागे लागत नाहीत. मात्र कधी तुम्ही विचार केला आहे का की, उभं राहून पाणी प्यायल्याने खरंच तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो का?

तर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, उभं राहून पाणी प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जाणून घेऊया उभं राहून पाणी प्यायल्याने तुम्हाला कोणत्या आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

किडनीशी संबंधीत समस्या

जर तुम्ही उभं राहून पाणी पित असाल तर जास्त दाबाने पाणी थेट पोटात जातं. ज्यामुळे तुम्हाला किडनीच्या समस्या होऊ लागतात. अशातच जर तुम्ही बसून पाणी प्यायलात तर पाणी हळू-हळू अब्जॉर्ब होण्यास मदत मिळते.

पचनकार्य हळू होतं

उभं राहून पाणी प्यायल्याने अन्न पचण्याच्या प्रोसेसवर विपरीत परिणाम होतो. उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी थेट पोटात जातं त्यामुळे ही तक्रार उद्भवते. यामुळे अन्न पचनाची प्रक्रिया मंदावते. यामुळे गॅसचा त्रासही उद्भवतो.

मसल्स आणि सांध्यावर परिणाम

ज्यावेळी तुम्ही उभं राहून पाणी पिता तेव्हा त्याचा नसांवर अधिक परिणाम होतो. ज्यामुळे शरीरात टॉक्सिन्सची मात्र वाढते. यामुळे खासकरून तुम्हाला कंबरदुखी किंवा मणक्याचा त्रास होऊ शकतो.

फुफ्फुसांचं होतं नुकसान

उभं राहून पाणी प्यायल्याने पचनावरच नाही तर फुफ्फुसांवरही याचा विपरीत होत असतो. यामुळे गरजेचं पोषक घटक आणि व्हिटॅमीन्स लिव्हर आणि पाचन तंत्रावर पोहोचू शकत नाहीत. ज्यामुळे तुमचं हृदय आणि फुफ्फुसांच्या आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका असतो.

पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाणी नेहमी बसून किंवा पाठ सरळ ठेऊन प्यायलं पाहिजे. यामुळे पोषक तत्त्व मेंदूपर्यंत पोहोचण्यास मदत होते. या पद्धतीने पाणी प्यायल्यास पचनसंस्था सुधारण्यास मदत होते आणि पोटफुगी सारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे प्रत्येकाने दिवसाला ७-८ ग्लास पाणी प्यायलं पाहिजे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दिवाळीला आपल्या घरची लक्ष्मी कमळावर होती, त्यामुळे जालन्याच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा ही कमळावर येणार आहे- चंदशेखर बावनकुळे

अजित पवारांच्या 6 बैठकांना दांडी; शहांच्या भेटीनंतर धनंजय मुंडे अन् CM फडणवीस एकाच व्यासपीठावर, चर्चांना उधाण

Contrast Colour Matching saree: कोणत्या रंगावर कोणता रंग सर्वात जास्त उठून दिसेल? सध्या 'या' 5 रंगांच्या जोड्या आहेत ट्रेडिंगमध्ये

Snehalata Vasaikar: गिरिजा ओकनंतर ही अभिनेत्री होतेय व्हायरल, सौंदर्याने केलं मार्केट जाम

Plane Crash : ओडिशात भयंकर विमान दुर्घटना, ९ जणांना घेऊन जाणारे प्लेन क्रॅश

SCROLL FOR NEXT