चुकीच्या पोझिशनमध्ये झोपणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे पोटावर झोपणे, अर्धे बसणे, अर्धे झोपणे, डोके वरच्या बाजूला टेकवून झोपणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे हाडे आणि स्नायूंना इजा होऊ शकतात. गरोदरपणात चुकीच्या पद्धतीने झोपल्याने गर्भावर विपरीत परिणाम होतो.
तसेच किमान 6-7 तासांची झोप शरीरासाठी खूप महत्त्वाची आहे. चुकीच्या पद्धतीने झोपल्यावर हाडे, स्नायू किंवा मज्जातंतूंना इजा होऊ शकते. अशा अनेक कोणत्या समस्या तुम्हाला होण्याची शक्यता आहे हे पुढील माहितीद्वारे कळेल, त्यासाठी काय करावे? याची सुद्धा माहिती तुम्हाला पुढे मिळेल.
मणक्यावर दबाव, शरीर दुखणे
तज्ज्ञांच्या मते, पोटावर झोपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. असे केल्याने पाठीवर व मणक्यावर शरीराचा दाब पडतो. या स्थितीत झोपल्याने बहुतांश वजन शरीराच्या मध्यभागी येते. अशा परिस्थितीत, पाठीच्या कण्यातील स्थिती बदलत नाही आणि त्यावर दबाव निर्माण होतो. त्यामुळे शरीराच्या इतर भागातही वेदनांच्या तक्रारी दिसू लागतात.
वेदना आणि मुंग्या येणे तक्रार
पोटावर झोपल्याने शरीरात निष्क्रियता जाणवते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना आणि मुंग्या येणे अशा समस्या दिसू लागतात. कधी कधी तर शरीर सुन्न झाल्यासारखे वाटते. जे लोक पोटावर झोपतात त्यांना अनेकदा मानदुखीचा त्रास होतो.
गर्भवती महिलांनी हे करणे टाळा
जर एखादी महिला गर्भवती असेल तर तिने पोटावर झोपणे टाळावे. अशा परिस्थितीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण गरोदरपणात स्त्री पोटावर झोपली तर त्याचा परिणाम मुलावर होतो. तुम्ही वरील सर्व सवयी आत्ताच सोडणे महत्वाचे आहे. अन्यथा तुम्हाला भविष्यात हाडांसंबंधीत मोठ्या समस्येला सामोरे जावे लागेल.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Written By: Sakshi Jadhav