भारतात फार पूर्वीपासून नाश्त्याला चहा आणि बिस्कीट खाण्याची सवय आहे. सकाळी उठल्यावर बरीच मंडळी रिकाम्या पोटी चहाचे सेवन करतात. कधी कधी चहासोबत बिस्कीट खातात. त्यात लहान मुलांपासून ते वृद्ध आणि तरुण मंडळी चहासोबत बिस्किटे खातात. मात्र ही सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. चला तर जाणून घेऊ चहा आणि बिस्किटांचा शरीरावर काय परिणाम होतो?
रिकाम्या पोटी चहा-बिस्कीट खाल्याने काय होते?
चहामध्ये कॅफिन असते तर बिस्किटांमध्ये भरपूर साखर आणि कॅफिन असते. जर तुम्ही रोज बिस्किटे आणि चहाचे सेवन केले तर शरीरातील चरबी झपाट्याने वाढू शकते. बिस्किटांमध्ये भरपूर प्रक्रिया केलेली साखर आणि गव्हाचे पीठ असते. त्यासह त्यात भरपूर संतृप्त चरबी सुद्धा असते.
आरोग्यावर काय परिणाम होतो?
बिस्किटांमध्ये आढळणाऱ्या गोष्टी वजन झपाट्याने वाढवतातच पण त्या पोटासाठीही चांगल्या नसतात. याचे सतत सेवन केल्याने पोटात गॅस आणि ॲसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सकाळी कधीही रिकाम्या पोटी चहा आणि बिस्किटे खाऊ नका. कारण यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.
डॉक्टरांचे यावर मत काय?
बिस्किटे आणि चहा खाण्यास मनाई आहे, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण त्यात सोडियम मिसळून ते हलके आणि कुरकुरीत बनते. रिकाम्या पोटी सोडियम तुमच्या शरीरात शिरल्यास तुम्ही उच्च रक्तदाबाला बळी पडू शकता. जर तुम्ही रोज रिकाम्या पोटी बिस्किटे खात असाल तर तुम्हाला हृदयाचे गंभीर आजार होऊ शकतात.
बिस्किटांमध्ये आढळणारे सुक्रॅलोज आणि एस्पार्टम हे चयापचयचे काम बिघडवतात. त्यामुळे पाचन समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू शकतात. बिस्किटे अनेकदा गोड असतात. साखर आणि चहासोबत ते पोटात गेल्यावर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. चहासोबत बिस्किटे कधीही खाऊ नका. कारण यामुळे तुम्हाला अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Written By: Sakshi Jadhav