Digital Eye Strain yandex
लाईफस्टाईल

Digital Eye Strain: डोळे जळजळणं किंवा खाज येणं याला थकवा समजू नका; या गंभीर समस्यांचा असू शकतो इशारा

Causes of burning eyes after screen use: सतत स्क्रीन वापरणे, अपुरी झोप आणि वाढते प्रदूषण यामुळे डोळ्यांची जळजळ, कोरडेपणा आणि लालसरपणा वाढू शकतो. तज्ज्ञांच्या मते, डिजिटल आय स्ट्रेन आणि ड्राय आय सिंड्रोम टाळण्यासाठी २०-२०-२० नियम, पुरेशी झोप आणि पाणी आवश्यक आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आजकालची जीवनशैली म्हणजे तासनतास लॅपटॉपसमोर बसून राहणं, चुकीचा आहार आणि अपुरी झोप.... अशातच वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांची जळजळ, खाज सुटणं आणि पाणी येणं या गोष्टी सामान्य झाल्या आहेत. स्क्रीनच्या वापरल्यानंतर होणारी सौम्य जळजळ सामान्य वाटू शकते. मात्र जर तुमच्या डोळ्यांमध्ये वारंवार लालसरपणा, कोरडेपणा किंवा डोळ्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटत असेल तर ती एक गंभीर समस्या असू शकते.

फरिदाबादच्या अमृता हॉस्पिटलमधील नेत्ररोग विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. रश्मी मित्तल यांनी जागरण वेबसाईटला माहिती देताना डोळ्यांच्या जळजळीमागचं नेमकं कारण काय असू शकतं हे सांगितलंय.

आपल्या डोळ्यांचा पृष्ठभाग अश्रूंच्या पातळ थराने संरक्षित असतो. ज्यामध्ये पाणी, तेल आणि म्यूकसचा समावेश असतो. हा थर डोळे ओलसर ठेवण्यास आणि त्यांना बाह्य इन्फेक्शनपासून वाचवण्यास मदत करतो. जेव्हा हा थर अस्थिर होतो तेव्हा डोळे थेट हवेच्या संपर्कात येतात ज्यामुळे कोरडेपणा आणि जळजळ होते.

डिजिटल आय स्ट्रेन

डोळ्यांमध्ये जळजळ होण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम. जेव्हा आपण बराच वेळ स्क्रीनकडे टक लावून पाहतो तेव्हा आपल्या पापण्यांची उघडझाप करण्याची गती ५०-६०% ने कमी होते. पापण्यांची उघडझाप कमी झाल्यामुळे डोळ्यांतील अश्रू लवकर सुकतात. परिणामी डोळे कोरडे पडतात आणि जळजळ झाल्यासारखं वाटतं.

ड्राय आय स्ट्रेनची लक्षणं

  • डोळ्यांची जळजळ होणं

  • धुसरं दिसणं

  • डोळ्यात जास्त पाणी येणं

  • डोळे सुकणं

  • लाईट सेंसिव्हीटी

पर्यावरणाची समस्या

भारतातील शहरी भागांमध्ये वायू प्रदूषण ही एक गंभीर समस्या आहे. हवेतील प्रदूषक, धूर आणि रसायनं यांचा आपल्या डोळ्यांच्या बाहुल्यांवर थेट परिणाम होतो. प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे डोळ्यांच्या पृष्ठभागावर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो.

निरोगी डोळ्यांसाठी काही सूचना

२०-२०-२० नियम

प्रत्येक २० मिनिटांच्या स्क्रीन टाईमनंतर २० फूट दूर असलेल्या एखाद्या गोष्टीकडे २० सेकंदांसाठी पाहा.

शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि झोप

शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका आणि पुरेशी झोप घ्या .

डोळे मिचकावणं

काम करताना जाणीवपूर्वक डोळे मिचकावण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

भाजप नेत्यावर जीवघेणा हल्ला; अज्ञातांकडून पुणे जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर दगडफेक

विहिरीत बुडून 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू,अंदाज चुकला अन् विपरित घडलं!

पालघर पाण्यात, मृतदेह छतावर, मृत्यूनंतरही नरकयातना थांबेनात

SCROLL FOR NEXT