Dangerous Medicines: कोणत्याही लक्षणांशिवाय या ५ औषधांमुळे होऊ शकतं तुमचं हार्ट फेल

Surabhi Jayashree Jagdish

औषधं

आपण डोकेदुखी, सर्दी, अंगदुखी किंवा इतर आजारांसाठी सहजपणे औषधं घेतो. पण हीच औषधं शरीरातील दुसऱ्या महत्त्वाच्या अवयवावर म्हणजेच हृदयावर परिणाम करत असतील तर?

Dangerous Medicines

हृदयासाठी घातक

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, काही औषधं सुरुवातीला सुरक्षित वाटतात, कारण ती वर्षानुवर्षे वापरात आहेत. मात्र त्यांचे दुष्परिणाम अनेकदा लगेच दिसून येत नाहीत. यामुळे हृदयाशी संबंधित समस्या हळूहळू वाढू शकतात.

NSAID Side Effects

एनएसएआयडी

एनएसएआयडी प्रकारातील औषधं, जसं की आयबुप्रोफेन आणि नेप्रोक्सेन ही वेदना कमी करण्यासाठी वापरली जातात. डोकेदुखी, सांधेदुखी किंवा अंगदुखीमध्ये लोक ही औषधं सहज घेतात. पण ही औषधं जास्त प्रमाणात किंवा वारंवार घेतल्यास रक्तदाब वाढू शकतो, शरीरात पाणी साचू शकतं.

Naproxen Side Effects

केमोथेरपीची औषधं

कॅन्सरच्या उपचारांमध्ये वापरली जाणारी काही केमोथेरपीची औषधंही हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात. डॉक्सोरुबिसिन आणि ट्रॅस्टुझुमॅब यांसारखी औषधं दीर्घकाळ वापरल्यास हृदयाच्या स्नायूंवर परिणाम होतो. त्यामुळे हृदय कमकुवत होण्याचा आणि हार्ट फेल्युअरचा धोका वाढतो.

Rosiglitazone Side Effects

स्टिम्युलंट

एडीएचडी आणि नार्कोलेप्सी सारख्या आजारांवर दिली जाणारी स्टिम्युलंट औषधंही हृदयासाठी धोकादायक ठरू शकतात. अॅम्फेटामाइन्ससारखी औषधं हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवतात. काही रुग्णांमध्ये यामुळे हार्ट अटॅक येण्याचाही धोका असतो.

Medicines Increasing Blood Pressure

रोसिग्लिटाझोन

डायबिटीज नियंत्रणासाठी पूर्वी वापरली जाणारी काही औषधंही आता धोकादायक मानली जातात. रोसिग्लिटाझोनसारख्या जुन्या औषधांमुळे हृदय फेल होण्याचा धोका वाढू शकतो, असे संशोधनातून समोर आलंय.

Drug Side Effects

डिकंजेस्टंट

सर्दी आणि फ्लूसाठी घेतल्या जाणाऱ्या डिकंजेस्टंट औषधांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. स्यूडोएफेड्रीनसारख्या औषधामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. मात्र याच प्रक्रियेमुळे रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयाच्या ठोक्यांमध्ये बिघाड होऊ शकतो.

Heart Disease Awareness

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Weak heart signs | saam tv
येथे क्लिक करा