Relationship Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Relationship Tips : पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत चुकूनही करू नका अशी मस्करी, बिघडेल तुमचे नाते

Couple Tips : एकमेकांसोबत मस्करी करणे, हसणे याच गोष्टी नात्यांमध्ये परस्पर बंध वाढवण्याचे काम करतात. 

कोमल दामुद्रे

Husband -Wife Relationship : पती-पत्नी असो किंवा गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असो यांच्यातील नाते नाजूक असते. त्यामुळे त्यांच्यात भांडणे होणे ही सामान्य गोष्ट आहे. एकमेकांसोबत मस्करी करणे, हसणे याच गोष्टी नात्यांमध्ये परस्पर बंध वाढवण्याचे काम करतात. मात्र अनेक वेळा तुमच्या नकळतपणे अशा काही  गोष्टी तुमच्याकडून चेष्टेमध्ये घडतात.

त्या गोष्टी तुमचा पार्टनर (Partner) मनावर घेतो आणि परिणामी तुमचे नातेही बिघडू शकते. त्यामुळे एक छोटासा विनोद नात्यात दुरावण्याचे कारण बनते. म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत ज्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड (Girlfriend) समोर कधीही बोलू नयेत. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल संपूर्ण माहिती.

1. लुक्सबद्दल मस्करी

कोणत्याही स्त्रीला (Women) हे असह्य आहे की तिचा स्वतःचा पार्टनर तिच्या लुक्सबद्दल मस्करी करतो. जर तुम्हाला वाटत असेल की तिला चेष्टेने काहीही बोलले तरी तिची हरकत नसेल, तर हा तुमचा चुकीचा विचार आहे. म्हणून तुम्हाला जर तिच्या फॅशनमध्ये किंवा मेकअपबद्दल काही चुकीचे वाटत असेल, तर तुम्ही त्यांना एकटयात जाऊन  प्रेमाने समजू शकता.

2. कमी समजू नका

जर तुमची पत्नी किंवा गर्लफ्रेंड जॉब नाही करत किंवा घरातील कामांमध्ये एक्सपर्ट नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्या व्यक्तिमत्वाला कमी समजाव. कधीही ती हाउसवाइफ असण्याची किंवा तिला जॉब (Job) नसण्याची खिल्ली उडवू नका. यामुळे तुमच्या जोडीदाराला वाईट वाटू शकते आणि त्यांच्या नजरेत तुमची इमेजही खराब होते.

3. प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारणे

प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की तिचा जोडीदार मोठा विचारांचा असावा. पण जर तुम्ही मस्करीत तिचा अपमान करत राहिलात तर तुमचे नाते बिघडू शकते. त्यामुळे तुमच्या जोडीदाराला टोमणे मारू नका. 

4. कुटुंबाची चेष्टा करू नका

तुमच्यातील नाते चांगले  ठेवण्यासाठी एकमेकांच्या कुटुंबाचा (Family) आदर करणे गरजेचे आहे. हे तुम्हा दोघांचे कर्तव्य आहे. पण कधीच तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांची संभाषणात खिल्ली उडवू नका कारण हे कोणत्याही महिलेसाठी असह्य आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Marathon News : ठाणे मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला; घरी गेल्यानंतर स्पर्धकाचा अचानक मृत्यू

Vande Bharat Express : पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्याहून शेगावला धावणार वंदे भारत एक्सप्रेस, वाचा सविस्तर

Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! ३० वर्षीय तरुणीवर गोळीबार, थेट छातीत गोळी घुसली

Maharashtra Live News Update: डोंबिवलीत हाय प्रोफाईल सोसायटीच्या निवडणुकीत हाणामारी

Independence Day 2025 : स्वातंत्र्याच्या ज्वालेतून पेटलेला प्रगतीचा मशाल...; १५ ऑगस्टसाठी खास प्रभावशाली भाषण, एकदा वाचाच

SCROLL FOR NEXT