Relationship Tips : तुमचाही जोडीदार प्रेमात असल्याचे नाटक करत आहे का? कसे कळेल? जाणून घ्या

Couple Tips : तुमच्या पार्टनरचे तुमच्यावर खरच प्रेम आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे असते.
Relationship Tips
Relationship TipsSaam tv
Published On

Why Your Partner Is Pretending To Be In Love With You : रिलेशनशिपमध्ये दोन्ही बाजूने एकसारखेच एफर्ट्स असल्यास नाते घट्ट दीर्घकाळ टिकून राहते. त्यामुळे तुम्ही जर एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहात. तर तुमच्या पार्टनरचे तुमच्यावर खरच प्रेम आहे की नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे असते.

अशा वेळेस जर तुमचा जोडीदार (Partner) तुमच्यावर प्रेम करत असेल तर तो तुम्हाला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे हे जाणून घेणे गरजेचे आहे की तुमचा जोडीदार तुमच्यावर खरच प्रेम करतो की केवळ नाटक करत आहे. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला अशाच पाच टिप्स (Tips) सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला जाणून घेण्यास मदत होईल, तुमचा पार्टनर खरच प्रेम करतोय की केवळ दिखावा.

Relationship Tips
Reason Why Some Women Stop Doing Oral Physical Relation : 'या' 5 कारणांमुळे महिला देत नाही आपल्या पार्टनरला मुखमैथुनचा आनंद !

1. प्रायॉरिटीझ देणे

तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावर खरोखर प्रेम असेल तर तो तुम्हाला नेहमी प्रायॉरिटीझ देईल. जर तुमचा जोडीदार केवळ कामासाठीच तुम्हाला आठवत असेल तर ते तुम्हाला प्रायॉरिटीझ देत नाहीत. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की ते फक्त तुमच्यावर प्रेम असल्याचा दिखावा करत आहे.

2. फिरण्याचे प्लानिंग

तुमचा जोडीदार तुमच्या सोबत हँग आऊट करण्याचा प्लान करत असेल, तुमच्यासोबत वेळ (Time) घालवण्यासाठी सतत प्रयत्न करत असेल तर तुमच्या जोडीदाराचे तुमच्यावर खरोखरच खूप प्रेम आहे. अन्यथा तो तुमच्या प्रेमात असल्याचे भासवत आहे.

Relationship Tips
Physical Relationship : किचनमधील 'या' 5 पदार्थांमुळे वाढू शकतो स्टॅमिना, जाणून घ्या!

3. भविष्याचा विचार करणे

जोडीदाराचे तुमच्यावर प्रेम असल्यास तुमच्यासोबत भविष्याबद्दल विचार करतात. भविष्यासाठी वेगवेगळ्या प्लानिंग तुमच्यासोबत ठरवत असतात. वैवाहिक जीवनाबद्दल तुमच्याशी संभाषण करतात. पण तुमचा पार्टनर या सर्व गोष्टी करत नसेल तर याचा अर्थ त्याचे तुमच्यावर प्रेम नसून तो केवळ प्रेमाचे नाटक करत आहे.

4. खोटे बोलणे

जर तुमचा जोडीदर तुमच्याशी सतत खोटे बोलत असेल. प्रत्येक गोष्टीत बहाणे करत तुम्हाला टाळत असेल, विश्वासार्ह नसेल तर वेळेत सावध झालेले बरे. असे जोडीदार फक्त प्रेमात असण्याचे आव आणत असतात.

Relationship Tips
Physical Relation : 'या' 5 मार्गांनी तुमचे लैंगिक जीवन होईल अधिक उत्तम !

5. विनाकारण भांडणे

जर तुमचा जोडीदार विनाकारण तुमच्यासोबत वाद घालून भांडणे वाढवत असेल. त्यासोबतच छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणे आणि भांडण सुरू करणे. याचा अर्थ असा होतो की तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेम करत नाही. तर प्रेमात असण्याचे नाटक करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com