Kidney stone symptoms saam tv
लाईफस्टाईल

Kidney stone symptoms: सतत पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका; किडनी स्टोन झाल्यावर शरीर देत असलेली ही 8 लक्षणं ओळखा

Kidney stone prevention: पावसाळ्यात कमी पाणी पिण्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. किडनी स्टोनची ८ सुरुवातीची लक्षणं, कोणाला अधिक धोका असतो, त्याची कारणं काय आहेत ती जाणून घेऊया.

Surabhi Jayashree Jagdish

पावसाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे अनेकजण तहान कमी लागते म्हणून पाणीही कमी पितात. पण हीच सवय किडनी स्टोन होण्याचा धोका वाढवू शकतं. पाठदुखी, लघवी करताना जळजळ होणं किंवा वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणं अशा लक्षणांकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. मात्र ही किडनी स्टोनची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.

मणिपाल हॉस्पिटलचे युरॉलॉजी विभागातील असोसिएट कन्सल्टंट डॉ. सरबजीत मोहापात्रा यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, किडनी स्टोनची सुरुवातीची लक्षणं वेळेत ओळखून योग्य उपचार घेतल्यास पुढे होणाऱ्या गंभीर गुंतागुंती टाळता येऊ शकतात.

पावसाळ्यात किडनी स्टोनचा धोका का वाढतो?

पावसाळ्यात थंड वातावरणामुळे तहान कमी लागते. त्यामुळे अनेकजण दिवसभर पुरेसं पाणी पीत नाहीत. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि लघवीचं प्रमाण कमी होतं. लघवी कमी झाल्यामुळे त्यामधील क्षार आणि इतर खनिजांचं प्रमाण वाढतं. हेच पदार्थ एकत्र येऊन किडनी स्टोन तयार होण्याची शक्यता वाढते.

डॉ. मोहापात्रा सांगतात की, पावसाळ्यातही नियमित आणि पुरेसं पाणी पिणं हा किडनी स्टोन टाळण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. याशिवाय दिवसभर चहा किंवा कॉफी जास्त पिणं, खारट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाणं, लघवी बराच वेळ रोखून ठेवणं आणि लघवीशी संबंधित त्रासांकडे दुर्लक्ष करणं यामुळेही किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो.

खालील कारणांमुळे काही लोकांमध्ये किडनी स्टोन होण्याची शक्यता अधिक असते.

  • दिवसभर पुरेसं पाणी न पिणं

  • आहारात मिठाचं प्रमाण जास्त असणं

  • वारंवार युरिन इन्फेक्शन (UTI) होणं

  • कुटुंबात किडनी स्टोनचा इतिहास असणं

  • लठ्ठपणा किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम असणं

  • यापूर्वी किडनी स्टोन झालेला असणं

किडनी स्टोनची ही 8 सुरुवातीची लक्षणं ओळखा

किडनी स्टोन तयार झाल्यानंतर सुरुवातीला कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. मात्र स्टोन हलू लागला किंवा लघवीचा मार्ग अडवू लागला की, काही स्पष्ट लक्षणं दिसू लागतात.

  • कंबरेच्या बाजूला किंवा पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना होणं

  • पाठीकडून वेदना जांघेच्या किंवा गुप्तांगाच्या दिशेने जाणं

  • लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणं

  • लघवीत रक्त दिसणं

  • वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणं

  • मळमळ किंवा उलट्या होणं

  • संसर्ग झाल्यास ताप आणि थंडी वाजणं

  • लघवी करताना अडचण येणं

किडनी स्टोन टाळण्यासाठी काय केलं पाहिजे?

  • दिवसभर थोड्या-थोड्या प्रमाणात नियमित पाणी प्या. एकाच वेळी खूप पाणी पिण्यापेक्षा ही सवय अधिक फायदेशीर ठरते.

  • लघवीचा रंग फिकट पिवळा किंवा जवळपास पारदर्शक राहील, इतकं पाणी पिण्याचा प्रयत्न करा.

  • मीठाचे प्रमाण कमी ठेवा. चिप्स, लोणचं, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि फास्ट फूडचं सेवन कमी करा.

  • डॉक्टरांचा सल्ला न घेता दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ पूर्णपणे बंद करू नका. आहारातून मिळणारे नैसर्गिक कॅल्शियम काही प्रकारच्या किडनी स्टोनपासून संरक्षण देण्यास मदत करू शकते.

  • संत्री, मोसंबी, लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करा. मात्र फक्त लिंबूपाणी प्यायल्याने किडनी स्टोन विरघळतो, हा समज चुकीचा आहे.

  • लाल मांस आणि इतर प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रोटीनचं अतिसेवन करणं टाळा.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curry Leaves Benefits : केसगळती ते डायबेटिस...रोज कढीपत्ता खाल्ल्यानं होतील ६ जबरदस्त फायदे, वाचा

Maharashtra News Live Update: घरगुती गॅस सिलेंडरची वाहतूक करणारा ट्रक उलटला

Sunetra Pawar : जनाची तरी लाज बाळगा; सुनेत्रा पवारांवर टिप्पणी करणाऱ्या काँग्रेसवर शिंदे कडाडले

Maharashtra Politics: राष्ट्रवादीत मोठी घडामोड! शरद पवार पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या बरखास्त

Crime: ३२ सेकंदात ३४ वेळा चाकूने वार, शिक्षिकेची शाळेबाहेर हत्या; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT