Body Stretching After Workout
Body Stretching After Workout Saam Tv
लाईफस्टाईल

Body Stretching After Workout : एक्सरसाइज नंतर अशाप्रकारे करा बॉडी स्ट्रेच, अनेक दुखणी होतील गायब !

कोमल दामुद्रे

Daily Exercise : दररोज सकाळी उठल्यानंतर पळायला जाणे ही तुमच्या शरीरासाठी अत्यंत चांगली एक्सरसाइज आहे. यामुळे अप्परपासून लोवर बॉडी ऍक्टिव्ह होते. काही गोष्टींकडे लक्ष देऊन तुम्ही कुठल्याही वयात पळण्याची एक्सरसाइज करू शकता. परंत पळल्यानंतर लगेचच झोपायची किंवा बसायची चुकी करू नका.

असं केल्याने तुमच्या शरीरावर (Health) विपरीत परिणाम होऊ शकतो. अशातच चांगल्या रिझल्टसाठी पळल्यानंतर स्ट्रेचिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया आता रनिंग (Running) नंतर कोण कोणती स्ट्रेचिंग एक्सरसाइज करावी.

1. रनिंग केल्यानंतर स्ट्रेचिंग गरजेची का आहे ?

रनिंग केल्यानंतर अनेक व्यक्तींना गुडघेदुखी ही समस्या होते. याचे सगळ्यात मोठे कारण म्हणजे रनिंग केल्यानंतर लगेचच बसणे आणि दीर्घकाळ आराम करणे. रनिंग केल्यानंतर लगेचच स्ट्रेचिंग केली पाहिजे नाहीतर तुम्हाला हातपाय अकडणे यासारख्या समस्या होऊ शकतात.

2. पोट्री स्ट्रेच :

या स्ट्रेचमध्ये पोटऱ्या स्ट्रेच केल्या जातात. अशा पद्धतीचे स्ट्रेच करण्यासाठी तुम्ही शिड्यांचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही शिड्यांकडे तोंड करा आणि एका पायाचा पंजा शिड्यांवरती ठेवा. त्यानंतर तुम्ही वरती उठण्याचा प्रयत्न करा. असं केल्याने तुमच्या पोटऱ्या चांगल्या प्रकारे स्ट्रेच होतील. ही एक्सरसाइज तुम्हाला 30 ते 40 सेकंद करायची आहे. एका पायाने करून झाल्यावर हीच प्रक्रिया दुसऱ्या पायाने करा.

3. लो लंज स्ट्रेच :

ही एक्सरसाइज कमरेच्या खालच्या भागांसाठी अतिशय फायदेशीर (Benefits) असते. ही एक्सरसाइज करण्यासाठी एक पाय पाठीमागच्या दिशेला घेऊन दुसरा पाय गुडघ्यामध्ये मोडून करायची आहे. या एक्सरसाइजमुळे तुम्हाला अनेक फायदे होऊ शकतात. पोझिशनमध्ये तुम्हाला बॉडी 30 ते 40 सेकंद होल्ड करायची आहे. त्यानंतर तुम्हीही एक्सरसाइज दुसऱ्या पायाने करत रहा.

Body Stretching After Workout

4. बटरफ्लाय स्ट्रेच :

एक्सरसाइजमुळे तुमच्या थायचे मसल्स स्ट्रॉंग बनतात. ही एक्सरसाइज करण्याआधी तुम्ही सुखासनमध्ये बसा आणि दोन्ही तळव्यांना तुमच्या जवळ घ्या. त्यानंतर तळव्यांना हाताने घट्ट पकडा आणि तुमच्या मांड्यांना वर खाली बटरफ्लाय सारखे करा. ही एक्सरसाइज तुम्ही एक मीनीट करू शकता. या एक्सरसाइजमुळे पाठणीचे आणि कमरेचे त्रास दूर होतात.

5. आर्म्स आणि अॅब्स स्ट्रेच :

आर्म्स म्हणजेच खांदे आणि पोटाची एक्सरसाइज केल्याने तुमचे संपूर्ण शरीर स्ट्रेच होते. त्याचबरोबर तुमच्या संपूर्ण शरीराच्या मांसपेशी ताणल्या जातात. एक्सरसाइज करण्यासाठी तुम्ही सर्वात आधी सरळ उभे रहा. त्यानंतर तुमचे हात वरच्या दिशेला करा आणि वरच्या हाताच्या मनगटाला दुसऱ्या हाताने सपोर्ट द्या. हाताच्या हाताच्या मनगटाला पकडले आहे त्या दिशेने वाका. एक्सरसाइज तुम्हाला 30 सेकंद होल्ड करायची आहे. असं करून तुम्ही दुसऱ्या साईडने सेम एक्सरसाइज करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT