Pre-Workout Meal : शरीर सुदृढ किंवा फिगर आटोक्यात ठेवण्यासाठी अनेक जण योगा किंवा व्यायामाला प्राधान्य देतात. काही लोक हा व्यायाम रिकाम्या पोटी करतात. योगाबद्दल जरी ते योग्य मानले जाऊ शकते. पण फिटनेस तज्ज्ञांचा हार्ड कोर वर्कआउट्सबद्दल वेगळा सल्ला आहे.
बहुतेक फिटनेस तज्ज्ञ सहमत आहेत की, हलके जेवणानंतर व्यायाम केल्याने आपल्याला चांगले कार्य करण्यास मदत होते. म्हणूनच हे महत्त्वाचे आहे की तुम्ही जिममध्ये जाण्यापूर्वी किंवा तुमच्या वर्कआउट सत्रापूर्वी हलके जेवण देखील घ्या. तुमच्या सोयीसाठी, येथे एक तज्ज्ञ व्यायामापूर्वीचे जेवण आणि त्यांचे फायदे सांगत आहेत.
1. ओट्स
ओट्स खाणे आरोग्यासाठी फायदेमंद असते.ओट्स मध्ये फायबर आणि व्हिटॅमिनस असतात जे आरोग्यासाठी चागंले असते. वर्कआऊट (Workout) करण्यापूर्वी ओट्स खाल्याने शरीरात ऊर्जा आणि स्फूर्ती रहाते त्यामुळे वर्कआऊट करत असताना चक्कर येणे , अशक्तपणा वाटणे अश्या समस्या येत नाहीत.
2. केळी
केळी मध्ये कार्बोहाइड्रेट आणि पोटॅशियम असते त्यामुळे केळी चे अनेक फायदे होतात.वर्कआऊट करण्यापूर्वी २ केळी वर्कआऊट झाल्यानंतर २केळी नियमित खायला पाहिजे त्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा राहते.
3. प्रोटीन शेक
प्रोटीन शेक हे जिम करणाऱ्या लोकांमध्ये खूप ओळखीचा पदार्थ आहे असे म्हणता येईल. प्रोटीन शेख घेतल्याने आपले शरीर मजबूत राहते त्यामुळे वर्कआऊट करण्याअगोदर प्रोटीन शेक घेणे उत्तम पर्याय आहे.
4. पनीर
पनीर मध्ये प्रोटीन चे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे वर्कआऊटपूर्वी १ तास अगोदर पनीरचे सेवन केले पाहिजे यामध्ये लीनोलिक एसिड असते त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
5. ड्राय फ्रूटस
ज्या लोकांना केळी (Banana) खायला आवडत नाहीत त्यांच्यासाठी ड्राय फ्रूटस हा एक चांगला पर्याय आहे ड्राय फ्रूटस लगेच पचतात त्यामुळे जिम करण्यापूर्वी ड्राय फ्रूटस खाल्यावर तुमच्या शरीरात एनर्जी राहते.
6. पीनट बटर
रोज व्यायाम करण्यापुर्वी १/२ चमचा पीनट बटर खाणे पीनट बटर मध्ये मोनोअनसचुरेट फॅट असते त्यामुळे जिम करताना एनर्जी खूप वेळ राहते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.