Diwali Wishes 2022  Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Wishes 2022 : 'या' दिवाळीला पाठवा तुमच्या प्रियजनांना खास शुभेच्छा ! WhatsApp, Facebook च्या माध्यमातून

घराबाहेर तोरण, अंगणात रांगोळी, आकाश कंदीलने सजवण्यापासून ते लक्ष्मी पूजेपर्यंत हा सण अगदी थाटामाटात साजरा केला जातो.

कोमल दामुद्रे

Diwali Wishes 2022 : दिवाळी ही अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या दिवसात सगळीकडे जोरदार तयारी सुरु आहे. भारतात साजऱ्या केल्या जाणार्‍या प्रमुख सणांपैकी एक. दिवाळी हा सण अनेकांसाठी अत्यंत महत्त्वाचा. या दिवसात आपले घर लख्ख प्रकाशाने उजळून निघते.

घराबाहेर तोरण, अंगणात रांगोळी, आकाश कंदीलने सजवण्यापासून ते लक्ष्मी पूजेपर्यंत हा सण अगदी थाटामाटात साजरा (Celebrate) केला जातो. यावर्षी 24 ऑक्टोबरला दिवाळी आणि 23 तारखेला छोटी दिवाळी (Diwali) साजरी होणार आहे.

या दिवसात आपल्या प्रियजनांना आपण दिवाळीच्या शुभेच्छा देतो. त्यासाठी काही शुभेच्छा संदेश, कोट्स

1. चंद्राचा कंदील घरावरी,

चांदण्यांचे तोरण दारावरी..

क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,

दिवाळीचे स्वागत घरोघरी..!!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

Diwali Wishes 2022

2. स्नेहाचा सुगंध दरवळला..

आनंदाचा सण आला..

एकच मागणे दिवाळी सणाला..

सौख्य, समृद्धी लाभो सर्वांना..

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..!

3. घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,

माळोनी गंध मधुर उटण्याचा..

करा संकल्प सुंदर जगण्याचा,

गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..

दीपावली शुभेच्छा!

दिवाळीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !

Diwali wishes

4. यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,

मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!

येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!

दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

5. फटाक्यांची माळ,

विजेची रोषणाई,

पणत्यांची आरास,

उटण्याची आंघोळ,

रांगोळीची रंगत,

फराळाची संगत,

लक्ष्मीची आराधना,

भाऊबीजेची ओढ,

दिपावलीचा सण आहे खूपच गोड.

दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!

Diwali Wishes

6. फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,

चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,

नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

7. पुन्हा एक नवे वर्ष,

पुन्हा एक नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा

नवे स्वप्न, नवे क्षितीज,

सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali wishes

8. पहीला दिवा आज लागला दारी,

सुखाची किरणे येई घरी,

पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

Manikrao Kokate : कोकाटेंचे मंत्रिपद, आमदारकी जाणार? अंजली दमानियांनी सांगितले कारण

New Year Celebration : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराचे अशा पध्दतीने करा भन्नाट डेकोरेशन

Manikrao Kokate : कोकाटेंची खाती कोणाला द्यायची ते सांगा?, मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना थेट सवाल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! नोव्हेंबर- डिसेंबरचा हप्ता लांबणीवर जाण्याची शक्यता; खात्यात ₹३००० कधी येणार?

SCROLL FOR NEXT