Diwali 2022 : यंदा ऑफिस मधून दिवाळीत सोन पापडी Gift मिळाली की मिम्स ?

ऑफिस किंवा मित्र परिवाराला दिवाळी मध्ये हमखास दिली जाणारी सोनपापडी नेहमीच सगळ्यांना आठवते.
Diwali 2022
Diwali 2022Saam Tv
Published On

Diwali 2022 : दिवाळी म्हटलं की, सर्वत्र रोषणाई, रांगोळी, दिवे, आतेषबाजी व फराळाची चव तोंडावर सतत रेंगाळत असते. या काळात आपल्याला अनेक गोडाचे पदार्थ खायला मिळतात. त्यातील अधिक भेटवस्तू असतात तर काही आपल्याला पाहायला मिळतात.

ऑफिस (Office) किंवा मित्र परिवाराला दिवाळी मध्ये हमखास दिली जाणारी सोनपापडी नेहमीच सगळ्यांना आठवते. सहज मिळणारी व बजेटमध्ये असणारी सोनपापडीचा पर्याय प्रत्येक ठिकाणी ठरवला जातो. सध्या या सोनपापडीचा ट्रेंड इतका वाढला आहे की, प्रत्येक दिवाळीला मिठाईच्या रुपात सोनपापडी मिळेल का? हा प्रश्न साऱ्यांना सतावत असतो. (Latest Marathi News)

Diwali 2022
Diwali 2022 : दिवाळीच्या रात्री लोक पत्ते का खेळतात? जाणून घ्या यांचे रंजक किस्से

ऑफिस किंवा आपल्या खास व्यक्तींने हिच सोन पापडी गिफ्ट केली तर त्यावर मिम्सचा पाऊस देखील पडतो. त्यावर काही खास मिम्स हे हमखास शेअर केले जातात ते पाहूया.

  • काल मित्राने मला सोन पापडी म्हटलं. याला मी प्रेम समजू की, नकार? असं एका मुलीने ट्वीट केलं. त्यावर वाचकांनी हसणाऱ्या स्माईली टाकत प्रतिसाद दिला.

    Today he gave me a nickname "soan papdi" Should i consider it a love language or hate language

— Puja 🥂 (@winnie_the_puja) October 14, 2022

दिवाळीच्या काळात ऑफिसेस मधून दिल्या जाणाऱ्या मिठायांमध्ये बहुतांश वेळा सोनपापडी असल्याने त्यावर हे मिम करण्यात आलं आहे.

  • HR कर्मचाऱ्यांना गिफ्ट देण्यासाठी व्हेंडरचा तपास करतना गिफ्ट आयडिया काय असू शकतात हे पण तपासत असतात. इतना स्ट्रेस मत लो HR जस्ट चील, काही नाही मिळालं तर सोन पापडी आहेच ना! असं ट्वीट करण्यात आलं आहे.

    HR is thinking about this only

    Asking for vendors, and scrolling through multiple social media platforms to get ideas some of us are also noticing people in metro to crack a useful gift for the employees.

Diwali 2022
Diwali 2022 : धनतेरसपासून ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी आहे खास, 'या' ५ दिवासांचे महत्त्व व पूजा विधी जाणून घ्या
  • दोस्तों मे आ रही हु - आपकी पिछले साल की Sonpapdi

दिवाळीच्या (Diwali) काळात बाजारपेठेत सोन पापडीची खरेदी वाढते. जवळपास सर्वच कार्यालयांमध्ये मिठाईच्या नावाने सोनपापडी दिली जाते. कदाचित त्यामुळेच दिवाळी जवळ येताच मेट्रो किंवा इतर ठिकाणी कार्यालयातून परतताना लोक सोन पापडीची पाकिटे घेऊन जाताना दिसतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com