Diwali 2022 : धनतेरसपासून ते भाऊबीजपर्यंत यंदाची दिवाळी आहे खास, 'या' ५ दिवासांचे महत्त्व व पूजा विधी जाणून घ्या

दीपावली म्हणून ओळखला जाणारा दिव्यांचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
Diwali 2022
Diwali 2022Saam Tv
Published On

Diwali 2022 : दिवाळी म्हटलं की, सर्वत्र रोशनाई आपल्याला पाहायला मिळते. या दिवसात फटाके, रांगोळी, दिव्याची आरास व सणासुणीदीचा काळ आपल्याला पहायला मिळतो. हिंदू धर्मात दिवाळीला विशेष महत्त्व आहे.

वाईटावर चांगल्याचा विजय, अंधारावर प्रकाश आणि निराशेवर आनंद म्हणून दरवर्षी हिंदू दिवाळी साजरी करतात. दीपावली म्हणून ओळखला जाणारा दिव्यांचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवसात दिवे, रांगोळी, दागिने यांनी घरे सजवली जातात तसेच स्वादिष्ट मिठाई आणि फराळ देखील खातात, नवीन पारंपारिक कपडे घालतात, विधी पाळतात, पूजा करतात (Latest Marathi News)

Diwali 2022
Diwali 2022 : यंदाची दिवाळी शुगर फ्री, मधुमेहांचे रुग्ण देखील चव चाखू शकतात

हिंदू पौराणिक कथेनुसार, रावणाचा पराभव करून आणि वनवासात 14 वर्षे पूर्ण केल्यानंतर प्रभू राम अयोध्येला परतले हे दिवाळीचे प्रतीक आहे. लोक देवी लक्ष्मी, भगवान गणेश आणि भगवान कुबेर यांना आरोग्य (Health), संपत्ती आणि समृद्धीचे आशीर्वाद देण्यासाठी प्रार्थना करून प्रकाशाच्या उत्सवाचे स्मरण करतात.

धनत्रयोदशीपासून सुरू होणारी आणि भाऊबीजेपर्यंत संपणारी दिवाळी पाच दिवसांपर्यंत असते. महाराष्ट्रात दिवाळी एक दिवस आधी गोवत्स द्वादशीला सुरू होते. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरपासून या उत्सवाला सुरुवात होणार आहे. दरम्यान, हिंदू पंचांगानुसार दिवाळीचे पाच दिवस 22 ऑक्टोबरला सुरू होऊन 25 ऑक्टोबरला संपणार आहेत.

दिवाळी 2022 -

दिवाळी (Diwali) चंद्रसौर हिंदू कॅलेंडरनुसार साजरी केली जाते आणि सामान्यतः ऑक्टोबरच्या मध्यात आणि नोव्हेंबरच्या मध्यात येते. दीपावलीचे हे पाच दिवस आहेत खास

22 ऑक्टोबर - धनतेरस किंवा धन त्रयोदशी

23 ऑक्टोबर - नरक चतुर्दशी किंवा काली चौदस

24 ऑक्टोबर - छोटी दिवाळी आणि बडी दिवाळी

25 ऑक्टोबर - गोवर्धन पूजा

26 ऑक्टोबर - भाऊबीज

Diwali 2022
Diwali 2022 : दिवाळीत देवी लक्ष्मीची पूजा केल्यास होईल प्रसन्न, पडेल पैशांचा पाऊस !

मुहूर्त

1. धनतेरस किंवा धन त्रयोदशी (Dhanteras 2022 )

धनत्रयोदशी पूजेचा मुहूर्त 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 07.00 ते 08.17 या वेळेत असेल.

2. नरक चतुर्दशी (Narak Chaturdashi)

चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान, ज्याला नरक चतुर्दशी असेही म्हणतात, सकाळी 05:05 वाजता सुरू होईल आणि 06:27 वाजता समाप्त होईल.

3. दिवाळी आणि लक्ष्मी पूजन (Laxmi Pujan)

लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त 06:53 वाजता सुरू होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी रात्री 08:15 वाजता समाप्त होईल. याशिवाय, अमावस्या तिथी 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05:27 ते 25 ऑक्टोबर रोजी 04:18 पर्यंत राहील.

4. गोवर्धन पूजा (Govardhan Puja)

गोवर्धन पूजेचा मुहूर्त सकाळी 06:28 ते 08:43 पर्यंत आहे.

5. भाऊबीज (bhai dooj)

भैया दूज, ज्याला भाऊ बीज, भात्र द्वितीया, भाई द्वितीया आणि भातृ द्वितीया असेही म्हणतात, २६ ऑक्टोबर रोजी येते. या दिवशी पूजेची वेळ दुपारी ०१:१२ ते दुपारी ३:२६ पर्यंत राहील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com