Diwali Special : इन्स्टाग्रामची बंपर दिवाळी ऑफर; आता Reels बनवून करा लाखोंची कमाई

: तुम्ही जर इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया अॅप वापरत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Instagram Reels Play Bonus Offer
Instagram Reels Play Bonus Offer Saam TV

Instagram Reels Play Bonus Offer : तुम्ही जर इन्स्टाग्राम हे सोशल मीडिया (Social Media) अॅप वापरत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टाग्रामने आपल्या वापरकर्त्यांसाठी दिवाळीनिमित्त (Diwali) एक खास ऑफर आणली आहे. ज्याचा वापर करून तुम्ही घरबसल्या तुमची दिवाळी गोड करू शकता. नेमकी काय आहे ही ऑफर? त्यासाठी नेमकं काय करावं लागेल जाणून घेऊया थोडक्यात...

टिकटॉक नंतर आता नेटकऱ्यांनी आपला कल इन्स्टाग्रावर (Instagram) रील बनवण्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग अ‍ॅप Instagram वापरणाऱ्या यूजर्सची संख्या कोट्यावधींची घरात आहे. भारतात देखील इंस्टाग्राम लोकप्रिय अ‍ॅप आहे.

Instagram Reels Play Bonus Offer
T20 World Cup 2022 : कोणते संघ प्लेऑफमध्ये पोहोचणार? सचिन तेंडुलकरने केली भविष्यवाणी

दररोज कोट्यावधी वापरकर्ते इन्स्टाग्रावर रील्स बनवत असतात. त्यातच रील्स फीचर रोल आउट केल्यानंतर अ‍ॅपची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. आता दिवाळीनिमित्त इन्स्टाग्रामने वापरकर्त्यांसाठी Reels Play Bonus Offer सुरू केली आहे. या ऑफर अंतर्गत, रील बनवणाऱ्या निर्मात्यांना 5000 डॉलर्स (सुमारे 4 लाख रुपये) पर्यंत बोनस मिळण्याची संधी आहे.

कोणत्या देशातील वापरकर्ते घेऊ शकतात फायदा?

आत्तापर्यंत इंस्टाग्रामची ही ऑफर अमेरिकेत सुरू होती पण आता ही ऑफर भारतीय निर्मात्यांसाठीही सुरू झाली आहे. याचा अर्थ असा की संलग्न कार्यक्रम आणि ब्रँड प्रायोजकत्व व्यतिरिक्त, सामग्री निर्मात्यांना आता मेटा वरून थेट पैसे कमविण्याची संधी आहे.

कंपनीची ही ऑफर अधिकाधिक लोकांना रील बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम करेल. ज्या देशात टिकटॉकवर अद्याप बंदी नाही, तिथे इन्स्टाग्रामने आपल्या प्लॅटफॉर्मवर उपस्थित कंटेंट निर्मात्यांना आकर्षित करण्यासाठी अशी ऑफर आणली आहे.

Instagram Reels Play Bonus Offer
Viral Video : भावानं बादच केलं की...गर्लफ्रेंडला असा काय प्रपोज केला की नकार देण्याचा सवालच न्हाय!

कशी आहे रील प्ले बोनस ऑफर?

आता तुम्ही विचार करत असाल की या इंस्टाग्राम ऑफर अंतर्गत बोनस कोणत्या आधारावर अवलंबून असेल? माहितीनुसार, रील बनवल्यानंतर, बोनस रिल्सवरील प्लेच्या संख्येवर अवलंबून असेल. या ऑफर अंतर्गत बोनस मिळविण्यासाठी, कमीतकमी 150 रील असणे आवश्यक आहे, पहिली रील बनवल्यानंतर, वापरकर्त्याला 1 महिन्यापर्यंतचा वेळ मिळेल.

ऑफर कधीपासून अ‍ॅक्टिव्हेट करू शकता?

तुम्ही इन्स्टाग्रामवर रील्स देखील बनवत असाल, तर ही ऑफर 11 नोव्हेंबर 2022 पर्यंत सक्रिय केली जाऊ शकते. येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ज्या निर्मात्यांच्या रीलला 30 दिवसांत 1000 हून अधिक व्ह्यू मिळाले असतील, त्यांनाच पैसे मिळतील. एकूणच, इंस्टाग्रामची ही ऑफर इन्स्टाग्राम वापरकर्त्यांना लाखो रुपये कमावण्याची संधी देत ​​आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com