दिवाळीच्या फराळा बनवणारा आणखी एक पदार्थ नानकटाई. परंतु, काही वेळेस हे बिस्किट इतके कडक होते की दात दुखण्याची वेळ येते. तर यात असणारे तुप टाळूला किंवा दाताला चिकटून बसते.
घराच्या घरी रेडिमेडसारखी नानकटाई तुम्हालाही बनवायची आहे. दरवर्षी फसते म्हणून यंदा न बनवण्याच्या विचारात असाल तर आम्ही तुम्हाला सोपी रेसिपी सांगणार आहोत. घरातल्या पिठापासून बनवा नानकटाई अतिशय चवदार आणि तोंडात टाकताच विरघळेल अशी पाहूया रेसिपी ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. साहित्य
कृती
सर्वप्रथम मोठ्या ताटात तूप काढून घ्या. तूपाला बोटांनी घासत राहा. पातळ आणि रंग बदलेपर्यंत फेटत राहा.
नंतर त्यात पिठीसाखर घालून मिक्स करुन चांगली फेटून घ्या. व्यवस्थित फेटल्यानंतर मैदा, बेसनाचे पीठ आणि बेकिंग सोडा घाला.
मैदा या तूपात हलक्या हाताने दाबत मळा. त्याचा चांगला मोठा गोळा होईल.
गॅसवर कढई ठेवून त्यात एक स्टॅड गरम करायला ठेवा. सात ते आठ मिनिटे फास्ट गॅसवर कढई गरम होण्यास ठेवा.
नानकटाई बेक करण्यासाठी ताटाला बटर पेपर ठेवून थोडस तूप लावून घ्या. तयार पीठाचे गोळे करुन त्याला नानकटाईचा आकार द्या. वरुन ड्रायफ्रूट्सने (Dry fruits) सजवा.
गरम झालेल्या कढईवर नानकटाईचे ताट ठेवून गॅस मंद आचेवर ठेवावा. झाकण ठेवून २० ते २२ मिनिटे बेक करुन घ्या.
त्यानंतर मध्यम गॅसवर २ मिनिटे पुन्हा ठेवा. तयार होईल कढईत बनवलेली टम्म फुगलेली अशी बिस्किटांपेक्षाही मऊसुत नानकटाई.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.