दिवाळी म्हटलं की, दिव्यांच्या आरासासोबत आपल्या फराळाची आठवण येते. दिवाळीत चिवडा, लाडू, करंजी, चकली आणि अनारसेशिवाय फराळाचे ताट अपूर्ण वाटू लागते.
अनारसे करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. परंतु ते फसले की आपल्या नाकी नऊ येतात. कधी इतके कडक होतात की, तुटता तुटत नाही. पण जर तुम्हाला न चुकता, सोप्या पद्धतीने जाळीदार मऊ खुसखुशीत अनारसे बनवायचे असतील तर रेसिपी कशी बनवायची ते पाहूया ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अनारसे म्हंटलं की ते सर्वानाच आवडतात पण ते फसतील की काय अशी भिती वाटते. अनारसे चुकतात याचे कारण गुळाचे चुकीचे प्रमाण आणि तांदूळ कसा भिजवला पाहिजे, जर गूळाचे प्रमाण जास्त झाले तर अनारसे तेलात विरघळतात आणि तांदूळ नवीन असतील किंवा जुने नसतील तर जाळीदार होत नाहीत.
2. कृती
सर्वप्रथम तांदळाची पिठी २ कप घ्या. नंतर त्यात १ वाटी गूळ घाला.
तयार मिश्रण एकत्र करुन मळून घ्या आणि लाडूसारखे गोळे तयार करा.
त्यानंतर तयार गोळे हवाबंद डब्यात १ दिवस ठेवा, डब्याला बाहेरून सुती कापडात गुंडाळून ठेवा.
दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याला व्यवस्थित मळून घ्या आणि हवाबंद डब्यात ठेवा.
तिसऱ्या दिवशी अनारसे बनवताना पिठाचे एकसारखे गोळे तयार करून घ्या. वाटीत साजूक तूप घेऊन एका बाजूने खसखस लावा.
बोटाला साजूक तूप लावून हळूहळू पुरी सारखे फिरवा. तेल गरम झाल्यावर मंद आचेवर तळून घ्या.
तयार होतील खमंग खुसखुशीत जाळीदार अनारसे
3. अनारसे बनवण्यासाठी खास टिप्स :-
तांदूळ जुने वापरावे, इंद्रायणी तांदूळ वापरू नये.
तांदूळ कमीत कमी 3 दिवस 3 रात्र संपूर्ण भिजत घालावेत
रोजच्या रोज तांदूळ मधील पाणी बदलावे
तांदूळ खूप कोरडा सुकवू नये किंवा अगदी ओला नसावा.
तांदूळ पीठ एकदम बारीक दळणे, आणि मैद्याचा चाळणी ने चालून घ्यावे
एका वाटीने तांदळाच्या पिठ 3 वाटी घेऊन त्याच वाटीने 1 वाटी गूळ घ्यावा.
गूळ जास्त झाल्यास अनारसे तेलात विरघळतात.
पीठ मळायला खूप जड जात असल्यास थोडेसे साजूक तूप / केळी मिसळावे.
अनारसे तळताना मंद आचेवर तळून घ्यावेत आणि चाळणी वर निथळत ठेवावेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.