Diwali Cleaning Hacks Saam Tv
लाईफस्टाईल

Diwali Cleaning Hacks: मिक्सर - फ्रीजवरील तेलाचे, धुळीचे डाग निघत नाही? या टिप्स फॉलो करा, मिनिटात होतील साफ

Diwali Cleaning Tips : स्वयंपाकघरातील उपकरणे स्वच्छ करताना या टीप्स फॉलो करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kitchen Utensils Cleaning Hacks :

काही दिवसातच दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळी म्हटल्यावर घराची साफसफाई, फराळ, सजावट अशा सर्व गोष्टींना सुरूवात होते. दिवाळीच्या साफसफाईची सुरुवात महिनाभरापासूनच सुरूवात होते. या सफाईत सर्वात जास्त अवघड काम म्हणजे स्वयंपाकघराची स्वच्छता.

किचनमध्ये जेवण बनवताना अनेकदा तेलाच्या फोडणीचे, मसाल्याचे डाग फरशीवर उडतात. तसेच मिक्सर, मायक्रोव्हेव, फ्रिज स्वच्छ करताना खूप काळजी घ्यायची असते. ही उपकरणे खराब होऊ नये याकडे लक्ष द्यावे लागते. ही उपकरणे स्वच्छ कशी करावी याची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मायक्रोव्हेव

खूप लोक मायक्रोव्हेवचा वापर करतात. जेवण गरम करण्यासाठी मुख्यतः मायक्रोव्हेवचा वापर केला जातो. मायक्रोव्हेव हा वेळच्या वेळी स्वच्छ करायचा असतो. मायक्रोव्हेव जास्त वेळ स्वच्छ न केल्यास त्यातून वास येऊ लागतो. मायक्रोव्हेव स्वच्छ करताना लिंबाचा वापर करा. सर्वप्रथम एका वाटीत पाण्यात लिंबाचा रस घ्या. ही वाटी मायक्रोव्हेवमध्ये ठेवा. त्यानंतर मायक्रोव्हेवचे क्लिनिंग बटण सुरू करा. मायक्रोव्हेव बंद झाल्यानंतर आतून कपड्याने स्वच्छ करा.

2. फ्रिज

फ्रिजचा वापर सर्वाधिक केला जातो. दूधापासून ते भाजी अशा सर्व वस्तू फ्रिजमध्ये ठेवतात. त्यामुळे फ्रिज स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. फ्रिज स्वच्छ करताना बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापर करा. एका वाटीत पाणी घ्या त्यात विम जेल आणि व्हाईट व्हिनेगर घाला. हे पाणी एका स्प्रेच्या बॉटलमध्ये भरा. हे पाणी फ्रिज साफ करण्यासाठी वापरा.

3. मिक्सर

सर्वांच्याच किचनमध्ये मिक्सर असतोच. मिक्सर हा सर्वाधिक वापरला जातो. चटणी, मसाले अशा सर्व गोष्टी वाटण्यासाठी मिक्सरचा वापर करतो. त्यामुळे मिक्सर वेळच्या वेळी स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे. मिक्सचे भांडे स्वच्छ करण्यासाठी सर्वप्रथम दोन चमचे व्हिनेगर पाण्यात मिसळा. ते मिक्सच्या भांड्यात टाका आणि मिक्सर चालू करा. त्यानंतर ते धुवून टाका. असे केल्याने मिक्सरचे भांडे स्वच्छ होईल. तसेच मिक्सरचा बाहेरील भाग साफ करण्यासाठी बेकिंग पावडरमध्ये पाणी मिसळा आणि या पाण्याने मिक्सर पुसून घ्या.

4. चिमणी

स्वयंपाकघरातील तेल आणि धूर शोषण्यासाठी चिमणीचा वापर केला जातो. चिमणी सर्वात जास्त घाण असते. चिमणी स्वच्छ कऱण्यासाठी कॉस्टिक सोड्याचा वापर करा. चिमणीच्या फिल्टर टबमध्ये गरम पाणी घाला. त्यात कॉस्टिक सोडा टाका. त्यानंतर ब्रश आणि सर्फच्या साहाय्याने फिल्टर स्वच्छ करा.

5. गॅस

गॅस स्वच्छ करताना नेहमी काळजी घ्यावी. सिलेंडरचे बटण बंद असल्याची खात्री करुनन घ्या. गॅस स्वच्छ करण्यासाठी लिक्वीड सोप आणि बेकिंग सोडा मिक्स करा. ही पेस्ट गॅसच्या पृष्ठभागावर लावा. त्यानंतर स्क्रबने स्वच्छ करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress: 'बिडी-बिहार'च्या पोस्टनं राजकारण तापलं; वादानंतर काँग्रेसचा माफीनामा

Hair Care Tips: हे 'काळे पाणी' तुमच्या केसांच्या सर्व समस्या करतील मूळापासून दूर, एकदा नक्की ट्राय करुन पाहा

Mumbaicha Raja : 'मुंबईचा राजा...' म्हणू नका! रोहित शर्मानं चाहत्यांना रोखलं, VIDEO

Weight Gain : जेवणाच्या या चुकीच्या सवयींमुळे वाढेल वजन; वेळीच व्हा सावध

Sevai Kheer Recipe : सणासुदीला खास बनवा शेवयांची खीर, एक घास खाताच मन होईल तृप्त

SCROLL FOR NEXT