Chandrakant Jagtap
स्वयंपाकघरातील टॉवेल ओला झाल्यावर बॅक्टेरियाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरतो.
याशिवाय मांसाहारी पदार्थ बनवल्यानंतर टॉवेल व्यवस्थित स्वच्छ केला नाही तर संसर्गाचा धोकाही वाढतो.
इतकेच नाही तर अस्वच्छ किचन टॉवेल बॅक्टेरियाच्या वाढीस मदत करतो आणि त्यातून फूड पॉयझनिंग देखील होऊ शकते.
स्वयंपाकघरात वापरलेले टॉवेल नेहमी स्वच्छ आणि कोरडे ठेवा. एक टॉवेल फक्त एका कामासाठी किंवा एका व्यक्तीसाठी ठेवा.
यासोबतच तुमचे टॉवेल नियमितपणे धुण्याचा प्रयत्न करा आणि दर महिन्याला ते बदला.
टॉवेल दर्जेदार डिटर्जंटने धुतल्यानंतर उन्हात वाळवा. अन्यथा त्यात बॅक्टेरिया राहण्याचा धोका असू शकतो.
यासोबतच टॉवेलला ३० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. यामुळे त्यात तयार होणारे बॅक्टेरिया नष्ट होतील.
किचनसाठी नेहमी कॉटनचे टॉवेल वापरा, कारण ते स्वच्छतेच्या दृष्टीने सर्वोत्तम आहेत. सिंथेटिक कपड्यांमध्ये बॅक्टेरिया झपाट्याने पसरतात.
दर तिसऱ्या दिवशी किचन टॉवेल गरम पाण्यात डिटर्जंट घालून धुवा. तुम्ही ते ब्लीच देखील करू शकता. याशिवाय व्हिनेगर घालूनही स्वच्छ करू शकता.