ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कारल्याला बिटर गार्ड सुध्दा म्हटले जाते. कारले शरिराकरिता अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारल्यापसून अनेक प्रकारच्या डिशेस तुम्ही बनवू शकता.
कारल्याला बारीक चिरून घ्या, त्यात मसाले टाका आणि तळून घ्या आणि मसालेदार चटपटीत भजी बनवा.
कारल्याला मध्ये चिर पाडून आतमधील बिया काढून घ्या. आता आतमधील पोकळ भागात केलेले मसाल्यांचे सारण भरा आणि पॅक करुन मंद आचेवर तवा ठेवून भरलेले कारले सोनेरी होई पर्यंत तळा.
आरोग्याकरिता कारले फायदेशीर मानले जाते. कारल्याचा रस मिक्सरमध्ये बारीक करा आणि गाळून घेऊन प्या.
कारल्याला बारीक पातळ काप करा, यात तेल आणि मीठ-मसाला टाकून स्नॅक्स बनवा.
कापल्याची रस भाजी बनवा. कांदा टॉमेटो सोबत कारले मिक्स करुन चविष्ट भाजी बनवा.
कारल्याचा कडूपणा घालवण्यासाठी कारल्याला मीठ लावून ठेवा आणि धुवून घ्या असे केल्यास कडवटपणा कमी होतो.
या कारल्याच्या डिशेसचा आस्वाद घ्या आणि त्याच्या अनोख्या चवींचा आनंद घ्या.